🌹 *आगरी समाजाची लेक ॲड. कु. रुची भगत "जज्ज" (न्यायाधीश) झाली.* 🌹
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
*ऊमलत्या वयात ऊराशी बाळगलेले स्वप्न खरं करीत ॲड. कु. रुची राजन भगत, ही कै. सौ. सुधा राजन भगत, यांची कन्या, वकिल क्षेत्रातील, प्रथमतः L.L.B. नंतर L.L.M. त्यानंतर MPSC -JMFC, या "जज्ज" (न्यायाधीश) होण्याच्या परिक्षेत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होऊन रायगड जिल्ह्यातील, अलिबाग तालुक्यातील, आदर्शनगर-शहापूर, गावची ही सुकन्या, वयाच्या फक्त २५ व्या वर्षी, एवढ्या लहान वयात "जज्ज" होण्याचा बहुमान पटकाविला आहे. हे अतिशय अभिमानास्पद आहे.*
*ती आजपासून "दिवाणी न्यायाधीश" म्हणून ओळखली जाईल, आगरी समाजाची ही लेक, दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी, आईचं छत्र हरवलेलं असतांनाही अतिशय खडतर मेहनत, चिकाटी, जिद्द आणि समाज सेवेचा वसा घेतलेले, तिचे वडील श्री राजन भगत यांच्या पावलावर पाऊल टाकत, आगरी समाजाचा झेंडा अटकेपार करण्यासाठी पुढे निघालेल्या ॲड. "रुची" ने तिच्या यशात आणखीन एक मानाचा तुरा खोवला आहे, तिच्या भगिरथ प्रयत्नांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!*
*तिचे आजोबा श्री जगन्नाथ जोमा भगत, आजी सौ.वसुधा जगन्नाथ भगत (शहापूर- अलिबाग) दोन्हीही सेवानिवृत्त शिक्षक तसेच तिच्या आईकडील आजोबा श्री मारुती रघुनाथ जोशी व आजी कै. सौ. पुष्पलता मारूती जोशी (रामवाडी- पेण) दोन्ही ही सेवानिवृत्त शिक्षक यांची नात उत्तुंग यशाच्या शिखरावर भरारी घेत आहे, हे पाहताना अतिशय आनंदाने कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.*
*कु. रुची भगत व श्री राजन भगत यांनी कोरोना कालावधीच्या अगोदर म्हणजेच दोन वर्षांपूर्वी सद्गुरु सदाशिव खरे महाराज संस्था बोरी-पेण येथे आयोजित केलेल्या "करीयर मार्गदर्शन" शिबिरामध्ये बोरी पंचक्रोशी येथील इयत्ता चौथी ते दहावीच्या मुला- मुलींना अभ्यासाविषयी व "Health is Wealth" तसेच दहावीनंतर पुढे काय करावे, यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन करून रूची भगत हीने बोरी येथे सर्वांची मने जिंकली होती. ॲड. न्यायाधीश "रूची" च्या पुढील प्रवासासाठी सद्गुरु सदाशिव खरे महाराज संस्था बोरी तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.*
*तसेच मंगळवार दिनांक ८ मार्च २०२२ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, ॲड. कु. रूची भगत काम करीत असलेली PCGT संस्था मुंबई व श्री विश्वास नांगरे पाटील अंतर्गत, मुंबई पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने, मुंबई पोलीस निर्भया स्क्वाॅड (पथक) मधील ९८ महिलांना एकत्रित करून, व त्यांच्याशी संपर्क साधून त्या महिलांचा सत्कार व सन्मान करण्यासाठी ॲड. रूची भगत हिने पूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते, व त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही तीनेच (ॲन्करिंग) केले होते, सदरचा कार्यक्रम, B.K.C. मुंबई येथे संपन्न झाला होता. त्यावेळच्या तिच्या मेहनतीला सलाम.*
*तिच्या या आनंदाच्या क्षणी तिचे सर्व कुटुंबीय, मामा - मामी, मावशी- मामा परिवार सहभागी असून, तिच्या या अभिनंदनीय कामगिरीचे कौतुक करीत आहेत.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment