*रोज नामस्मरण*
*केल्यावाचून राहू नकोस*,
*गुरु पाहताहेत तुला,*
*नामस्मरण मात्र विसरु नकोस.*...
*तुझ्या वाटेत आडवे खूप येतील*...
*पायात पाय घालून* *पाडतील*....
*त्यांना घाबरून तुझं*
*उभं राहणं सोडू नकोस*..
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु* *नकोस*....
*तुझं कौतुक प्रत्येकाला इथं*
*रुचेलच असं नाही*...
*कौतुकासाठी तुझं नांव*
*सूचेलच असं नाही*...
*तू मात्र इतरांचं कौतुक*
*करण्यास कचरु नकोस*...
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*तुलासुद्धा मन आहे*
*हे माहीत आहे मला*.....
*पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी तुला*....
*इतरांना भरभरून देणं मात्र*
*कधी सोडू नकोस* ...
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*रडावंसं वाटतं तेव्हां*
*रडून तू मोकळा हो*...
*कार्यासाठी लढावंसं वाटतं तेव्हां*,
*लढून तू मोकळा हो*....
*रडण्यामध्ये मात्र तुझे*
*कार्य विसरू नकोस*
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
*तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे*
*द्यायची गरज नाही...*
*कुणासाठी तुला कार्य*
*सोडायची गरज नाही*....
*गुरु संकल्पासाठी पुढे*
*चालणं तू सोडू नकोस*.......
*गुरु पाहताहेत तुला*,
*नामस्मरण मात्र विसरु नकोस*....
🌹🙏 *ll श्री स्वामी समर्थ ll* 🙏🌹
No comments:
Post a Comment