Friday, 15 October 2021

Day special

 माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

 

वाचन प्रेरणा दिनाच्याही दिल्या शुभेच्छा

 

            मुंबईदि. 15 : -  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. डॉ. कलाम यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. 

            'माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. देशप्रेमासोबतचवैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी त्यांनी केलेले कार्य पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक असेच राहील. विचार प्रवण पिढी घडवण्यासाठी वाचन उपयुक्त ठरते. त्यासाठी त्यांचा पुस्तकांवर प्रेम करा हा संदेश महत्त्वाचा आहे. त्यांच्या जयंती निमित्त साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्याही सर्वांना शुभेच्छा,' असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटले आहे.

००००

 

                  ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राज्यपालांचे अभिवादन 

 

           मुंबई, दि. 15 : दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ‍यांनी शुक्रवारी (दि. १५) राजभवन येथे डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

            राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

            राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमारविशेष सचिव राकेश नैथानीउपसचिव प्राची जांभेकरखासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

००००

 

 

Former President Abdul Kalam remembered on 90th Birth Anniversary

The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari offered floral tributes to the former President late Dr
. A P J Abdul Kalam on his 90th birth anniversary at Raj Bhavan, Mumbai on Friday (15th Oct).

Officers and staff of Raj Bhavan also petals to the portrait of Dr. APJ Abdul Kalam on the occasion.
 
Principal Secretary to the Governor Santosh Kumar, Special Secretary Rakesh Naithani, Deputy Secretary Prachi Jambhekar, Private Secretary Ulhas Munagekar and others were present.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन

मंत्रालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

           मुंबई, दि. 15 : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात आज दि. 15 रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.          मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद गवादे यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

          पुढच्या पिढ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होवून सशक्त समाज उदयास यावा, अशी अपेक्षा श्री. गवादे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यास मदत होईल, यासाठी नव्या पिढीने वाचनाची आवड आवर्जून जोपासणे गरजेचे आहे. वाचन प्रेरणा दिनातून आणि डॉ. कलाम यांच्या व्यक्तीमत्त्वातून सर्वांना निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही श्री. गवादे म्हणाले. श्री. गवादे यांनी समर्थ रामदासस्वामी रचित करुणाष्टकांचे अभिवाचन केले.

            मराठी भाषा विभागाचे अवर सचिव अजय भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध पुस्तकांतील उताऱ्यांचे अभिवाचन केले. सर्वांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन त्यांना अभिवादन केले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi