Wednesday, 4 August 2021

 [03/08, 21:50] Baby: *इन्फोसिस हेड चा पगार आहे 17 करोड, आणि विराट कोहलीचा 2 महिन्याचा पगार आहे 17 करोड*


*तर एका मुलाने वडिलांना विचारले,मग मी शाळेत जाऊ की खेळायला?*


*तर त्यावर वडिलांनी दिलेले सुंदर उत्तर, स्वतः पुरते पैसे कमवायचे असतील तर खेळायला जा*..

*आणि लोकांना रोजगार द्यायचा असेल तर शाळेत शिकायला जा*


*कारण इन्फोसिस च्या हेड ने दुसऱ्यांन साठी रोजगार निर्माण केला तर कोहली ने स्वतः साठी*...🙏🏻😊

[03/08, 22:58] Baby: *देवाघरी जातानाही हात रिकामा नको.*

💫🌪🌪💫🌪🌪💫🌪🌪💫

*आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही पण असं म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो.*


 *ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग,*


*ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ?*


 *म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना...*


: *किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा।*

*अजून तुला कळला नाही फटका या यमाचा।*

          *मृत्यूची नोटीस नसते,समन्स नसते तर डायरेक्ट पकड वाॅरंट असते.*

       कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते.मृत्यू राजा,रंक, लहान,थोर स्त्री,पुरूष काहीही पहात नाही.

         यमदूत वाॅरंट घेऊन येतात तेंव्हा 

दुस-या कोणाला ते सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही.

कारण *वाॅरंट रिसीव्ह करणे हा प्रश्नच नसतो तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात (फास आवळला जातो) यमस्य करूणा नास्ती:भूकेलेल्याला ताटावरून,तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून,शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून,शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते.

मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.

मग आपल्याला नेतात  कुठे? हा विचार करणारे फार थोडे. (लंडन,अमेरिकेला जाताना पौंड्स,डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते,)

*पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात "पुण्य करन्सी" महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते*

ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.

99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो.         *दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते,*

*गुरे गोठ्यात रहातात.*

*बरोबर काहीच नेता येत नाही*

तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो.

अजगर बेडकाला गिळतअसतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो.

सहस्त्रचंद्रदर्शन झालेले *राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात आणि कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात*.भक्ती बर्वे,पद्मा चव्हाण,मॅरिलीन मनरो,जयश्री गडकर,गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का?पण *यमाग्रजाने वाॅरंटच* काढले होते.

*बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात*

या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्यसंचयासाठी? म्हणून श्रीगुरूचरित्रात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही.ते मातुःश्रींना म्हणाले,

*"आई तू मला सांगतेस की अग्राह्य संन्यास बालपणी,*

     वानप्रस्थानानंतर 

संन्यास घ्यावा

पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?

" मातुःश्री निरुत्तर झाल्या.

*प्रपंचाबरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे ज्ञान व सुरक्षितता लाभते!*


 *"नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा"*


यासाठी *भंगवताला प्रेम , भक्ती द्या.* मग तो तुमच्या आवडीचा देव,संत चालेल पण *एकच संत,गुरु,देव* पाहिजे: अनेक नको; तुमची श्रद्धा, भाव त्यावर पाहिजे.मग बघा चमत्कार होतो कि नाही.

*"हरि नामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा।*

    *ही हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा"

______________________________

*🌹।। श्री स्वामी समर्थ।। 🌹*

_________________________

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi