Sunday, 21 June 2026

अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी

 अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाबीजच्या आकृतीबंधास मंजुरी

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

महाबीजच्या एकूण 723 पदांच्या सुधारित आकृतीबंधास शासनाची मान्यता.

मुंबई, दि.16 : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित (महाबीज), अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे.  हा आकृतीबंध अनेक वर्षापासून प्रलंबित होता. मात्र, कृषी विभागाने याबाबत आज शासन निर्णय जारी केला असून, एकूण 723 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 

शासन निर्णयानुसार महाबीजच्या विद्यमान आकृतीबंधामध्ये सुधारणा करून 560 नियमित पदे, 100 अधिसंख्य पदे आणि 63 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. यामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास, प्रशासकीय व्यवस्था अधिक सक्षम होण्यास तसेच बियाणे उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण व वितरण व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

यावेळी बोलताना कृषी मंत्री म्हणाले, "शेतकऱ्यांना दर्जेदार व प्रमाणित बियाण्यांचा वेळेवर पुरवठा करण्यासाठी महाबीजची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. बदलत्या तांत्रिक गरजा आणि कार्यव्याप्ती लक्षात घेऊन सुधारित आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संस्थेची प्रशासकीय व तांत्रिक क्षमता अधिक बळकट होईल, कार्यक्षमतेत वाढ होईल आणि राज्यातील बियाणे उत्पादन व वितरण व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल. याचा थेट लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे."

यापूर्वी, 30 ऑक्टोबर 2014 रोजी मंजूर करण्यात आलेल्या आकृतीबंधात एकूण 737 पदे होती. नव्या सुधारित आकृतीबंधात संस्थेच्या सध्याच्या गरजा, तांत्रिक बदल आणि कार्यपद्धतीतील सुधारणा लक्षात घेऊन पदरचनेचे पुनर्गठन करण्यात आले आहे. अधिसंख्य पदे रिक्त झाल्यानंतर ती पुन्हा भरण्यात येणार नसून भविष्यात मंजूर नियमित पदांची संख्या 560 इतकीच राहणार आहे.

सुधारित आकृतीबंधात विविध स्तरांवरील प्रशासकीय, तांत्रिक आणि क्षेत्रीय पदांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच वाहनचालक, कनिष्ठ यंत्रचालक, शिपाई, पहरेकरी, लघुलेखक निम्न श्रेणी आदी काही पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची तरतूद करण्यात आली आहे

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्धदहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध

 दहावी-बारावी पुरवणी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा उपलब्ध७२०८४२९३८१, ९४०४७८३९९६ आणि ९९६०६४४४११ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता

मुंबई, दि. २० जून : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) पुरवणी परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मानसिक आधार व मार्गदर्शन मिळावे यासाठी विविध स्तरांवर समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य मंडळाच्या माहितीनुसार, दहावीची पुरवणी परीक्षा दि. ३० जून २०२६ पर्यंत, तर बारावीची पुरवणी परीक्षा दि. ८ जुलै २०२६ पर्यंत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागीय मंडळांमार्फत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षा काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळ स्तरावर समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ७२०८४२९३८१, ९४०४७८३९९६ आणि ९९६०६४४४११ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येणार आहे.

यंदापासून मंडळाच्या वतीने मुक्तांगण मित्र संस्थेमार्फत इयत्ता दहावी व बारावी परीक्षांशी संबंधित विद्यार्थी, पालक आणि इतर घटकांना समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून त्यासाठी ९११२७०९११२ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यरत आहे. तसेच टेलीमानस हेल्पलाईन क्रमांक १४४१६ आणि मनोदर्शन हेल्पलाईन क्रमांक ८४४८४४०६३२ यांवरही समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत ३१५ समुपदेशकांची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली असून त्यांचे संपर्क क्रमांक व पत्ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पुरवणी परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण किंवा संभ्रम न बाळगता उपलब्ध समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी ऑनलाइन स्व-नामांकन सादर करण्याचे आवाहन

 राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी इच्छुक शिक्षकांनी

ऑनलाइन स्व-नामांकन सादर करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. २० : केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ झाला असून राज्यातील पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी स्व-नामांकन प्रक्रिया दि. १५ जून २०२६ पासून सुरू झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे.

पात्र शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर दि. १० जुलै २०२६ पर्यंत स्व-नामांकन नोंदवावे. तसेच अर्जदारांनी आपले स्व-नामांकन अंतिम करून दि. १३ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

राज्यातील अधिकाधिक पात्र शिक्षकांनी राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी अर्ज करून आपल्या शैक्षणिक कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्याची संधी साधावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र लोकभवन में पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस का आयोजन

 महाराष्ट्र लोकभवन में पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस का आयोजन


मुंबई, दि. 20 : पश्चिम बंगाल की उत्कृष्ट सांस्कृतिक प्रस्तुति के लिए राज्यपाल ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय की सराहना की


मुंबई स्थित महाराष्ट्र लोकभवन में शनिवार (20 जून) को पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने महाराष्ट्र सहित देश के विभिन्न भागों में निवास कर रहे पश्चिम बंगाल के नागरिकों को राज्य स्थापना दिवस की शुभकामनाएँ दीं।


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय के मराठी भाषी विद्यार्थियों द्वारा बंगाली गीतों एवं नृत्यों के माध्यम से प्रस्तुत उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम की राज्यपाल ने विशेष प्रशंसा की तथा विश्वविद्यालय और विद्यार्थियों को बधाई दी।


यह कार्यक्रम केंद्र सरकार के ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अभियान के अंतर्गत आयोजित किया गया। कार्यक्रम के प्रारंभ में पश्चिम बंगाल के राज्यपाल आर. एन. रवि का वीडियो संदेश प्रदर्शित किया गया।


इस अवसर पर संबोधित करते हुए राज्यपाल जिष्णु देव वर्मा ने कहा कि महाराष्ट्र और पश्चिम बंगाल भले ही एक-दूसरे से लगभग दो हजार किलोमीटर दूर हों, लेकिन दोनों राज्यों के लोगों की अस्मिता, सांस्कृतिक चेतना और राष्ट्रीय भावना समान है। उन्होंने कहा कि दोनों राज्यों को इतिहास, संस्कृति, अध्यात्म और राष्ट्रवाद की भावना ने एक सूत्र में बाँध रखा है। दोनों राज्यों ने गौरांग महाप्रभु, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर और स्वामी विवेकानंद जैसी महान विभूतियाँ देश को दी हैं।


राज्यपाल ने कहा कि भारत के स्वतंत्रता संग्राम में भी दोनों राज्यों ने देश को महत्वपूर्ण नेतृत्व प्रदान किया। बंगाल ने नेताजी सुभाषचंद्र बोस और बिपिन चंद्र पाल जैसे महान नेता दिए, जबकि महाराष्ट्र ने लोकमान्य बाल गंगाधर तिलक, गोपाल कृष्ण गोखले सहित अनेक राष्ट्रीय नेताओं को जन्म दिया।


उन्होंने कहा कि जिस प्रकार बंगाल साहित्य और संस्कृति के प्रति समर्पित राज्य है, उसी प्रकार महाराष्ट्र भी साहित्य और संस्कृति प्रेमियों की भूमि है। बंगाल ने साहित्य और संगीत के क्षेत्र में अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिया है। यह प्रसिद्ध उक्ति है कि “आज बंगाल जो सोचता है, देश कल वही सोचता है।” उन्होंने कहा कि बंगाल की महान संतानों ने देश को ‘वंदे मातरम्’ और ‘जन गण मन’ जैसे राष्ट्रीय गीत प्रदान किए हैं।


राज्यपाल ने कहा कि मुंबई देश की आर्थिक राजधानी है, जबकि कोलकाता सांस्कृतिक राजधानी के रूप में विख्यात है। उन्होंने बंगाली भाषा को अत्यंत मधुर बताते हुए कहा कि यह रसगुल्ले की तरह मीठी है।

महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

 महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन साजरा

पश्चिम बंगालचे उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्द राज्यपालांकडून

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला कौतुकाची थाप

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र लोकभवन येथे पश्चिम बंगाल राज्य स्थापना दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी यावेळी महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत वास्तव्यास असलेल्या पश्चिम बंगालच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी बंगाली गीत व नृत्याच्या माध्यमातून उत्कृष्ट सांस्कृतिक सादरीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाला व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.

केंद्र शासनाच्या एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत पश्चिम बंगालचा राज्य स्थापना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांचा व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.   

महाराष्ट्र व पश्चिम बंगाल परस्परांपासून दोन हजार किमी दूर असले तरी देखील दोन्ही राज्यांमधील लोकांची अस्मिता समान असल्याचे यावेळी बोलताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी सांगितले.

दोन्ही राज्यांना इतिहास, संस्कृती, अध्यात्म व राष्ट्रवादाच्या जाणिवेने जोडले असून दोन्ही राज्यांनी गौरांग महाप्रभु, संत तुकाराम, अहिल्यादेवी होळकर, स्वामी विवेकानंद यांसारखे महान प्रभृती दिल्या असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात दोन्ही राज्यांनी देशाला नेतृत्व प्रदान केले. बंगालने सुभाषचंद्र बोस व बिपीन चंद्र पाल यांसारखे नेते दिले तर महाराष्ट्राने लोकमान्य टिळक, गोखले यांसह अनेक नेते दिले असल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

बंगालप्रमाणेच महाराष्ट्र देखील साहित्य व संस्कृती प्रेमी राज्य असल्याचे आपण अनुभवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगालने साहित्य - संगीत जगतात फार मोठे योगदान दिले असल्याचे राज्यपालांनी सांगितले. जो विचार बंगाल आज करतो तो विचार देश दुसऱ्या दिवशी करतो असे म्हटले जाते, असे सांगून बंगालच्या सुपुत्रांनी देशाला 'वंदे मातरम' 'जन गण मन' ही दोन्ही राष्ट्रीय गीते दिली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तर कोलकाता ही सांस्कृतिक राजधानी असल्याचे राज्यपालांनी सांगितले. बंगाली भाषा सुमधुर असून रसगुल्ल्याप्रमाणे गोड असल्याचे राज्यपालांनी सांगितले.   

यावेळी सोलापूर येथील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दुर्गा पूजेचे गीत 'हे लो गिरी सून लो खोबोर', पश्चिम बंगालच्या अजरामर व्यक्तिमत्वांची गाथा सांगणारे एकपात्री सादरीकरण, लोकनृत्य तसेच कथक नृत्य सादर केले.   

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगालची सांस्कृतिक परंपरा दाखविणारा संगीत व नृत्याचा कार्यक्रम सादर केला.

राज्यपाल के हस्ते रायगढ़ जिले के आदिवासी विद्यार्थियों के लिए स्कूल बस समर्पित

 राज्यपाल के हस्ते रायगढ़ जिले के

आदिवासी विद्यार्थियों के लिए स्कूल बस समर्पित

मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र के राज्यपाल जिष्णु देव वर्माने शनिवार (20 जून) को महाराष्ट्र लोकभवन में रायगढ़ जिले के आदिवासी एवं ग्रामीण विद्यार्थियों के लिए एक स्कूल बस शिक्षा संस्था को विधिवत समर्पित की।

यह स्कूल बस सुमन रमेश तुलसियानी ट्रस्ट द्वारा रायगढ़ जिले के रातवड स्थित छत्रपति शिक्षण मंडल के माध्यमिक विद्यामंदिर को प्रदान की गई है।

इस अवसर पर ट्रस्ट के विश्वस्त मनीष रुपाणी, नाना पालकर स्मृती समिती के पदाधिकारी कृष्णा महाडिक, छत्रपती शिक्षण मंडल, कल्याण के मानद सचिव डॉ. निलेश रेवगडे तथा संस्था के अन्य पदाधिकारी उपस्थित थे।

बताया गया कि रातवड स्थित यह विद्यालय आठ गांवों तथा चार आदिवासी पाड़ों के 196 विद्यार्थियों को शिक्षा प्रदान करता है। स्कूल बस सेवा शुरू होने के बाद विद्यालय में 42 विद्यार्थियों की अतिरिक्त वृद्धि हुई है।

सुमन रमेश तुलसियानी ट्रस्ट द्वारा अब तक कुल नौ स्कूल बसें प्रदान की जा चुकी हैं। इस अवसर पर यह भी बताया गया कि रमेश तुलसियानी और सुमन तुलसियानी का हाल ही में पंद्रह दिनों के अंतराल में निधन हो गया था। इसके बावजूद उनके ट्रस्ट के माध्यम से समाजसेवा का कार्य निरंतर जारी है।

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक इतिहासाशी घट्ट

 बँकेविषयी थोडक्यात :

            'महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक इतिहासाशी घट्ट नाते असलेली 'कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे.  या बँकेची स्थापना 5 नोव्हेंबर 1962 रोजी  झाली असून 7 फेब्रुवारी 1963 रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

या बँकेने मल्टी-स्टेट स्तरावर एक "आर्थिक मॉडेल' म्हणून सिद्ध केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून 55 शाखा आहेत.

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेच्या 55 शाखांच्या माध्यमातून 85 हजार 835 सभासद, 81 कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल, 2975 कोटींच्या ठेवी व 1894 कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले. स्वयंप्रकाश सोलर कर्ज, कृषी कर्ज, केंद्र शासनाची फूड प्रोसेसिंग योजना कार्यान्वित केली आहे. परदेशी व्यवहाराकरिता लागणारी लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी साठी परकीय चलन विनिमय, एआय चा वापर यासारख्या अनेक सुविधांचा लाभ बँकेने ग्राहकांना दिला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ व कर्ज सुविधा पुरवून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिली.





Featured post

Lakshvedhi