Thursday, 11 June 2026

फूड सेफ्टी ऑन व्हील्स’ हा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता

 फूड सेफ्टी ऑन व्हील्सहा उपक्रम केवळ विशेष मोहिमेपुरता मर्यादित नसून बृहन्मुंबई परिसरात सातत्याने राबविण्यात येत आहे. आगामी काळातही विविध भागांमध्ये अशाच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी आणि अन्न व्यवसायिकांपर्यंत अन्न सुरक्षा विषयक माहिती पोहोचविण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा नियमांचे पालन आणि जनसहभाग यांमधूनच सुरक्षित व निरोगी समाजाची निर्मिती शक्य असल्याने प्रत्येक नागरिकाने अन्न सुरक्षेबाबत सजग राहून सुरक्षित अन्नाचा स्वीकार करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार

 मेडिसिटीद्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी (एनएमआयएमसी) विकसित करण्यासाठी सामंजस्य करार

·         एकात्मिक आरोग्य सेवा परिसंस्था विकसित करण्यासाठी 1.2 अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची बांधिलकी

 

क्लीव्हलँड, ओहायो | 10 : मेडिसिटीही रुग्णसेवा, वैद्यकीय शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि प्रतिभेला एका एकात्मिक केंद्रात एकत्र आणणारी जागतिक दर्जाची आरोग्य सेवा परिसंस्था उभारण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. ही संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या हील इन इंडियाया दृष्टिकोनाशी सुसंगत असून लवकरच ती प्रत्यक्षात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जगातील सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य सेवा परिसंस्थांपैकी एक उभारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्र शासन, क्लीव्हलँड क्लिनिक (सीसी), ब्रुकफिल्ड अॅसेट मॅनेजमेंट आणि आरोधन हेल्थ सिटी (एएचसी) यांनी नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटीच्या विकासासाठी सहकार्य करण्याबाबत सामंजस्य करार केला. या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच ब्रुकफिल्ड आणि एएचसीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

‘फूड सेफ्टी ऑन व्हील्स’द्वारे व्यापक जनजागृती

 फूड सेफ्टी ऑन व्हील्सद्वारे व्यापक जनजागृती

·         अन्न व औषध प्रशासनाचा सुरक्षित अन्न, निरोगी समाजासाठी पुढाकार

मुंबई, दि. 10 :  ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्सया विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात १ ते १५ जून पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे, अन्नभेसळीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे आणि  जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या परिसरांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने जागेवरच तपासण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अन्नविक्रेते आणि अन्न व्यवसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्नपदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व तसेच भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

 राज्यात अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याबरोबरच जनतेमध्ये अन्न सुरक्षेबाबत व्यापक जनजागृती करण्यावर विशेष भर दिला जात आहे. केवळ कारवाईपुरते मर्यादित न राहता नागरिकांना मार्गदर्शन, शिक्षण आणि जनजागृतीच्या माध्यमातून सुरक्षित अन्नाच्या संकल्पनेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविले जात आहे.

कार्यक्रमादरम्यान दुग्धजन्य पदार्थ, मसाले, खाद्यतेले आणि इतर अन्नपदार्थांमधील संभाव्य भेसळ ओळखण्यासाठी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. घरच्या घरी करता येणाऱ्या प्राथमिक चाचण्यांची माहिती नागरिक, विद्यार्थी आणि अन्नविक्रेत्यांना देण्यात आली. त्यामुळे अन्नभेसळीविषयी जागरूकता वाढण्यास आणि सुरक्षित अन्न निवडण्याबाबत मदत होईल.

सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा

 सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. १० :-  राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष अभय योजना-२०२५ ला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याने सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे पट्टे वाटप शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार तातडीने पूर्ण  करावे, असे  निर्देश  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

सिंधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली.

 

बैठकीस महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि सिंधी समाज संघटनेचे  प्रतिनिधी उपस्थित होते. तर  नंदुरबार, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, अमरावती व चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठकी सहभागी झाले होते.

 

राज्य शासनाने सिंधी विस्थापितांना  निवासी व वाणिज्यिक जमिनींच्या शर्तभंगाचे नियमानुकूलन करण्यासाठी १५ मे २०२५ रोजी विशेष अभय योजना-२०२५ लागू केली आहे. या योजनेत नागपूर आणि अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून  इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे या योजनेत काम करावे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.

 


सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत

 सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यांना तातडीने प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित सोलर ऊर्जा कंपनीच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी.  याबरोबरच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र तसेच अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी

 चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. १० : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण व जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 


माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

 माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना

परिक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

 

            मुंबई, दि. 10 : माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पध्दतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.  ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे. 

अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi