Thursday, 4 June 2026

मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा

 मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा

- परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक

·         आकृतीबंध, सेवा प्रवेश नियम, पदोन्नती आणि आश्वासित प्रगती योजनेसह विविध मागण्यांवर चर्चा

मुंबई, दि. ३ : मोटार वाहन विभाग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर कायद्याच्या चौकटीत राहून मार्ग काढण्यात यावा, तसेच प्रलंबित विषयांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

बैठकीत मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी विभागाच्या आकृतीबंधाची तातडीने अंमलबजावणी, विविध संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करणे, पदोन्नती प्रक्रियेला गती देणे तसेच आश्वासित प्रगती योजनेचे लाभ देण्याबाबतच्या मागण्या मांडल्या. या सर्व विषयांवर शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले.

संघटनेने सर्व संवर्गांसाठी सेवा प्रवेश नियम तयार करण्याची मागणी केली. विशेषतः वर्ग-२ प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच वर्ग-३ संवर्गातील पदांसाठी सेवा प्रवेश नियम निश्चित करण्याची मागणी करण्यात आली. विभागाचे कामकाज अधिक प्रभावी आणि सुरळीत होण्यासाठी ही प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री.सरनाईक यांनी सांगितले. तसेच वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयीन अधीक्षक पदावरील पात्र कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या.

याशिवाय, प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदलीचा प्रश्न, प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा २००५ लागू करण्याची मागणी; तसेच अन्य प्रलंबित प्रशासकीय विषयांवरही संघटनेने सविस्तर मांडणी केली. त्यावर सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अप्पर आयुक्त भरत कळसकर, सह आयुक्त संजय मैत्रेवार, सह आयुक्त रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पाटील तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल

राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

 राज्याचे क्वांटम व डीप टेकधोरण लवकरच आणण्यात येणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरणआणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली असून संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.

मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी

 मालाड येथील प्रसार भारतीच्या एकूण 278 एकर जागेपैकी सुमारे 150 एकर क्षेत्रावर चित्रपट नगरीसोबत संयुक्त विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी प्रसार भारती, एमआयडीसी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. आकाशवाणीचे बहुतांश प्रसारण एफएम प्रणालीवर स्थलांतरित होत असल्याने उपलब्ध जागेचा प्रभावी वापर मीडिया व मनोरंजन क्षेत्राच्या विस्तारासाठी करण्यात येणार आहे.

            या प्रस्तावित मीडिया हबमध्ये अत्याधुनिक चित्रपट स्टुडिओ, साऊंड स्टेजेस, हॉस्पिटॅलिटी, आयटी व आयटीईएस क्षेत्राशी संबंधित सुविधा, पर्यटन विकास प्रकल्प; तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म आणि संगीत प्रशिक्षण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यासाठी परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांशी सहकार्य करण्यात येणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार

 राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची

तिकिटे तिकीटालयॲपवर उपलब्ध होणार

                                                                             - मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 4: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच अंतिम फेरीस 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने तिकीटालयॲपवरुन या स्पर्धेतील नाटकाची तिकिे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य,  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले.

            राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. 8 जून रोजीठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतरसविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमीआणिशंकर जयकिशनहे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

            मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

            स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर रुपये 50 आणि रुपये30 निश्चित करण्यात आले आहे.  प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी 10.00 वाजल्यापासून तिकीटालयया ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. या सुविधेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

000

सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा · हाफकिन संस्था आणि घानाच्या

 सर्पदंशावरील संशोधनासाठी भारत-घाना सहकार्याची नवी दिशा

·         हाफकिन संस्था आणि घानाच्या सीपीएमआर संस्थेमध्ये धोरणात्मक सहकार्याबाबत चर्चा

मुंबई, दि.4 : सर्पदंशावरील प्रभावी उपचारपद्धती विकसित करण्यासह जागतिक आरोग्य संशोधनाला चालना देण्यासाठी मुंबईतील हाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्था (एचआयटीआरआय) आणि घाना सरकारच्या सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) यांच्यात धोरणात्मक सहकार्याची दिशा निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत दोन्ही संस्थांनी वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींचा आढावा घेण्यात आला.

हाफकिन संस्थेचे संचालक डॉ. सुवर्णा खरात तसेच संस्थेतील अजित जगताप, मृणाल घाग सावंत  यांच्या समवेत झालेल्या बैठकीत घानाच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सहभाग घेतला. या शिष्टमंडळात सीपीएमआरचे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू आणि तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता.

बैठकीत विशेषतः सर्पदंशामुळे होणाऱ्या विषबाधेच्या वाढत्या समस्येवर सखोल चर्चा करण्यात आली. आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण व वंचित भागांमध्ये सर्पदंश हा गंभीर सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न बनला असून त्यावरील स्वस्त, प्रभावी आणि सहज उपलब्ध उपचारांची गरज अधोरेखित करण्यात आली. दोन्ही संस्थांनी वनस्पतीजन्य औषधांच्या आधारे सर्पदंश व्यवस्थापनासाठी नवीन उपचारपद्धती विकसित करणे, झेब्राफिश आधारित प्रीक्लिनिकल मॉडेल्स तयार करणे, संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणे, आंतरराष्ट्रीय संशोधन अनुदानांसाठी प्रस्ताव सादर करणे आणि वैज्ञानिक क्षमतावृद्धीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ. सुवर्णा खरात यांनी सांगितले की, जागतिक आरोग्यविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक भागीदारीमुळे नवोन्मेषी संशोधनाला चालना मिळेल, वैज्ञानिक क्षमता अधिक बळकट होईल आणि जगभरातील लोकांसाठी उपयुक्त ठरणारे आरोग्यविषयक उपाय विकसित करण्यास मदत होईल.

प्रस्तावित सहकार्याअंतर्गत संशोधक आणि विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त अभ्यास, तंत्रज्ञान हस्तांतरण यासंदर्भात संयुक्त प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यामुळे युवा वैज्ञानिकांना जागतिक दर्जाच्या संशोधन पद्धती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

ही बैठक भविष्यातील औपचारिक सहकार्याचा पाया रचणारी ठरली असून भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. सार्वजनिक आरोग्य, जैवविविधतेवर आधारित औषध संशोधन, विषशास्त्र आणि ट्रान्सलेशनल सायन्स या समान प्राधान्यक्रमांद्वारे दोन्ही संस्था नाविन्यपूर्ण उपचारपद्धतींचा शोध, संशोधन परिसंस्थेचे बळकटीकरण आणि उष्णकटिबंधीय प्रदेशांतील आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी संयुक्तपणे कार्य करणार आहे.

हाफकिन संस्था आणि सीपीएमआर यांच्यातील हे सहकार्य भारत-आफ्रिका वैज्ञानिक भागीदारीचे आशादायी उदाहरण ठरणार असून जागतिक आरोग्य संशोधन क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करण्यास मदत होणार आहे.

राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची तिकिटे ‘तिकीटालय’ ॲपवर उपलब्ध होणार

 राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीतील नाटकाची

तिकिटे तिकीटालयॲपवर उपलब्ध होणार

                                                                             - मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि. 4: सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच अंतिम फेरीस 8 जून ते 18 जून 2026 या कालावधीत येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने तिकीटालयॲपवरुन या स्पर्धेतील नाटकाची तिकिे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य,  इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड.आशिष शेलार सांगितले.

            राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्यप्रयोगांचे सादरीकरण या अंतिम फेरीत होणार असून रसिक प्रेक्षकांना उत्कृष्ट नाट्यकृतींचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध नामांकित नाट्यसंस्थांचे आणि निर्मात्यांचे नाट्यप्रयोग होणार आहेत. 8 जून रोजीठरलंय FOREVER’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार होईल. त्यानंतरसविता दामोदर परांजपे’, ‘भूमिका’, ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय!’, ‘कुटुंब किरैतन’, ‘एकदा असंच पाहावं करून’, ‘करुणाष्टके- उंबरठ्या पलीकडची गोष्ट’, ‘मीमीआणिशंकर जयकिशनहे नाट्यप्रयोग सादर करण्यात येतील. या सर्व नाट्यकृतींमधून सामाजिक, कौटुंबिक, विनोदी; तसेच समकालीन विषयांचे विविध पैलू रंगभूमीवर उलगडले जाणार आहेत.

            मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील व्यावसायिक रंगभूमीला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट नाट्यनिर्मितींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि नाट्यकलेचा दर्जा उंचावणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.

            स्पर्धेच्या सर्व प्रयोगांसाठी तिकीट दर रुपये 50 आणि रुपये30 निश्चित करण्यात आले आहे.  प्रत्येक प्रयोगाच्या दोन दिवस अगोदर सकाळी 10.00 वाजल्यापासून तिकीटालयया ॲपवर तिकीट विक्री सुरु होईल. या सुविधेचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi