प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात सर्वप्रथम देशवासियांना खर्च कमी करण्याचे आवाहन केले, हे आवाहन राष्ट्रहितासाठी जीवनशैली बदलण्याचे आहे. 'जितकी बचत, तितकी राष्ट्रसेवा' हा संदेश त्यांनी अत्यंत स्पष्टपणे दिला आहे. अनावश्यक इंधन वापर टाळणे, सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करणे, ‘वर्क फ्रॉम होम’ला प्रोत्साहन देणे, स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार वाढवणे, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणे, ऊर्जा बचत करणे अशा अनेक बाबींवर त्यांनी भर दिला. या सूचनांचा विचार करता महाराष्ट्र शासनानेही तातडीने व्यापक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 20 May 2026
चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया
चला ! देशापुढे महाराष्ट्राच्या बचतीचा आदर्श ठेवूया !
ज्या ज्या वेळी देशावर संकट येते, त्या त्या वेळी महाराष्ट्र हा दिल्लीच्या मदतीला धावून जातो. “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला ” ही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासूनची आपली भूमिका आजही तितकीच जिवंत आहे. युद्ध असो, टंचाई असो, महापूर असो की महामारी-महाराष्ट्राने प्रत्येक संकटात देशाच्या पाठीशी उभे राहत मदतीचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पश्चिम आशियातील वाढते तणाव आणि त्यातून निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आज देश पुन्हा एका मोठ्या आव्हानासमोर उभा आहे. या संकटाचा कालावधी किती असेल हे आपल्या हातात नसले, तरी या अशा काळात संयम, शिस्त आणि बचत यामधून देशाच्या अर्थकारणाला बळ देण्याचे मोठे काम महाराष्ट्र करु शकतो.
कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे
कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे
कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
मुंबई, दि. २० : मे. न्यूदाई अभियांत्रिकी प्लास्टिक इंडस्ट्रीज प्रा. लि., आय.पी. २७ निमगाव इंडस्ट्रियल एरिया, खेड (ता. खेड, जि. पुणे) या कंपनीतील नोंदणीकृत ०८ माथाडी कामगारांना ‘गुड बिहेव्हिअर बॉण्ड’ घेऊन पुन्हा सेवेत घेण्यात यावे, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.
कामावर घेण्याबाबतच्या प्रश्नांवर कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील वादावर तोडगा काढताना हा निर्णय घेण्यात आला. नरिमन भवन येथे ही बैठक घेण्यात आली. दुरदृश्य प्रणालीद्वारे आमदार सुरेश धस व संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रत्यक्ष बैठकीस कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी उपस्थित होते.
दरम्यान, भारतीय मजदूर संघाचे रायगड जिल्हा सचिव अशोक निकम यांच्याकडून कोरस इंडस्ट्रीज लि., एमआयडीसी धाटाव, (ता. रोहा, जि. रायगड) येथे पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या प्रकरणातही ‘गुड बिहेव्हिअर बॉण्ड’च्या अटीवर कामगारांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्देश कामगार मंत्री यांनी दिला.
या प्रकरणाबाबत संबंधित दोन्ही कंपन्यांना कामगारांचे हित लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये
सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार
मुंबई, दि. २० : राज्यातील टियर-२, टियर-३ आणि वंचित भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना उदयोन्मुख दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी तेजस नेटवर्क्स आणि महाआयटी यांच्यात आज सामंजस्य करार करण्यात आला. हा करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव परिमल सिंह, महाआयटीच्या आयुक्त भुवनेश्वरी एस., महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच सीएसआर सहभागी यांच्या उपस्थितीत हॉटेल प्रेसिडेंट येथे आयोजित ‘टेकमहा इम्पॅक्ट २०२६’ परिषदेत करण्यात आला.
या कराराअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञान विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. उद्योग-शैक्षणिक सहकार्य, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाधारित क्षमता वृद्धी यांसाठीही दोन्ही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.
स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा
स्थानिक बेरोजगार युवकांच्या रोजगारासाठी विशेष मोहीम राबवा
- कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर
मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करावी. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. महिन्याच्या कालावधीत याबाबत कार्यवाही पूर्ण व्हावी, असे निर्देश, कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.
नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित
शिक्षणसंस्था, शासन आणि सीएसआर संस्थांमधील सहकार्यामुळेच
ईवाय इंडियाचे हरीश पोरवाल यांनी उद्योग, शिक्षणसंस्था, शासन आणि सीएसआर संस्थांमधील सहकार्यामुळेच रोजगारक्षमता आणि रोजगाराच्या संधींमधील दरी कमी होऊ शकते, असे सांगितले. अभ्यासक्रम रचना, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि कौशल्याधारित प्रशिक्षणामध्ये सीएसआरची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. आदिवासी भाग, आकांक्षीत जिल्हे, महिला आणि वंचित घटकांवर विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
२५ वर्षांत डिजिटल साक्षरता आणि रोजगारक्षमतेसाठी संस्थेच्या
व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी मागील २५ वर्षांत डिजिटल साक्षरता आणि रोजगारक्षमतेसाठी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. एमएस-सीआयटीसह ३०० हून अधिक कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण, आदिवासी आणि लहान शहरांमधील ५ हजारांहून अधिक केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “क्रांती” या एआय आधारित चॅटबॉटची माहिती देताना त्यांनी सांगितले की, तो प्रादेशिक भाषांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून डिजिटल शिक्षण आणि मार्गदर्शनासाठी मदत करतो.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...