Saturday, 16 May 2026

येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार

 येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • पुढील वर्षी 15 लाख बेघरांना चाव्या सुपुर्द करणार
  • जून अखेर शेतकऱ्यांना कर्ज माफी ; नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन अनुदान
  • 12.35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु
  • प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गतच्या पाच लाख घरांचे लोकार्पण

 

सातारा दि. 15 : महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले असून, हा देशातील आतापर्यंतचा उच्चांक आहे. घरांसाठी नऊ हजार कोटी मिळाले आहेत. 30 लाख घरांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत अत्यंत गतीने काम करत पाच लाख बेघर लोकांना घरांच्या चाव्या सुपुर्द करत आहोत. पुढील वर्षी 15 लाख लोकांना चाव्या सुपुर्द करु. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरे या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करुन येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्के घर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली

मुंबई क्लायमेट वीक २०२६’मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात

 मुंबई क्लायमेट वीक २०२६मध्ये १०० हून अधिक हवामान उपाययोजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. उष्णतेशी मुकाबला करणाऱ्या उपाययोजना, सौर ऊर्जा, पुनरुत्पादक शेती, कचऱ्याचे पुनर्वापर तंत्र, शहरी जंगल, कूल रूफ्स, हवामान अर्थसंकल्प यांसारख्या संकल्पनांना विशेष प्रतिसाद मिळाला.

 

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंजमध्ये ग्लोबल साऊथमधील ३५० हून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला. ऊर्जा, पाणी, शेती, कचरा व्यवस्थापन आणि हवामान डेटा या क्षेत्रांतील ३४ अंतिम स्पर्धकांमधून आठ विजेते निवडण्यात आले. या उपक्रमात माजी अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते.

 

‘मुंबई क्लायमेट वीक २०२६’चा मुख्य उद्देश हवामान बदलासंदर्भातील चर्चा

 मुंबई क्लायमेट वीक २०२६चा मुख्य उद्देश हवामान बदलासंदर्भातील चर्चा केवळ परिषदांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृती आणि अंमलबजावणीवर भर देणे हा होता. तीन दिवसांच्या या उपक्रमात शहरी लवचिकता, अन्न व्यवस्था आणि ऊर्जा संक्रमण या तीन प्रमुख विषयांवर केंद्रित चर्चा झाली. सरकार, वित्तीय संस्था, उद्योग समूह, संशोधक, नवोन्मेषक, नागरी संस्था, शैक्षणिक संस्था आणि स्थानिक समुदाय अशा विविध स्तरांतील घटक एकाच व्यासपीठावर आले. या उपक्रमात ३० हून अधिक देशांतील चार हजारांपेक्षा अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. एकूण १३५ कार्यक्रमांच्या माध्यमातून सरकार, वित्तीय संस्था, उद्योग, संशोधक, नागरी संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि स्थानिक समुदाय एकत्र आले.

 

या उपक्रमातून सात सामंजस्य करार करण्यात आले, तर दहापेक्षा अधिक धोरणात्मक साधने आणि उपक्रम सुरू करण्यात आले. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, युनिसेफ, वर्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट, सी ४० प्लस सिटीज, महिंद्रा कंपनी यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही सहभाग नोंदवला. शहरी उष्णता नियंत्रण, महानगर नियोजन, हवामान डेटा, कमी-कार्बन पायाभूत सुविधा आणि हवामान प्रशासन या क्षेत्रांमध्ये राज्याची क्षमता वाढविण्यासाठी या भागीदाऱ्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे

 मुंबई क्लायमेंट वीकच्या निष्पत्ती व परिणामकारकता अहवालाचे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

दुसरा मुंबई क्लायमेट वीकफेब्रुवारी २०२७ मध्ये होणार

 

मुंबई, दि. १ : हवामान बदलाच्या प्रश्नांवर जागतिक स्तरावरील चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या परिणाम आणि प्रभाव अहवालाचे (आउटकम अँड इम्पॅक्ट रिपोर्ट’) प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आले. मुंबई क्लायमेंट वीकच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन २२ ते २६ फेब्रुवारी २०२७ दरम्यान मुंबईत करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

 

प्रोजेक्ट मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात असून, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे यजमान संस्थांमध्ये सहभागी आहेत. अहवाल प्रकाशनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक शिशिर जोशी आदी उपस्थित होते.

 

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य सरकार आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली. नागरिकाभिमुख आणि प्रगतीशील हवामान उपाययोजना उभारण्यावर आमचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढPl share

 वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

- दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे

 

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाने विशेष सहाय्य अनुदान योजनांअंतर्गत लाभ घेणाऱ्या, परंतु वैश्विक ओळखपत्र नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अशा लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी दिली.

मंत्री अतुल सावे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे यूडीआयडी कार्ड नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. कोणताही पात्र लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचाही समावेश असून, अलीकडे ‘युडीआयडी’ कार्ड अनिवार्य करण्यात आल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे अनुदान थांबले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, १ एप्रिल २०२६ पूर्वी या योजनांचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना मुदतवाढ दिली आहे. संबंधित तहसीलदारांनी जुन्या वैद्यकीय प्रमाणपत्र असलेल्या लाभार्थ्यांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वैश्विक ओळखपत्र कार्ड मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच, १५ जून २०२६ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांकडून स्वावलंबन पोर्टलद्वारे वैश्विक ओळखपत्र साठी अर्ज करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्ज क्रमांक एसएएस पोर्टलवर अद्ययावत करण्यासह तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

याशिवाय, आधार कार्ड आणि युडीआयडी कार्ड मधील माहितीतील तफावत दूर करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. तहसीलदारांनी लाभार्थ्यांची गावनिहाय यादी प्रसिद्ध करून बनावट व अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे व कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनाही या योजनेचा नियमित आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले असून, युडीआयडी कार्ड निर्गमित करणाऱ्या यंत्रणांमार्फत विशेष मोहीम राबवून सर्व लाभार्थ्यांना वेळेत कार्ड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाने निर्गमित केला असून तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

0000

इज ऑफ डूईंगच्या अत्यावश्यक सेवा तातडीने दिल्या गेल्या

 महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, महसूल हा नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण केले जाते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने वेगवेगळ्या भागात पूर्वनियोजन करून स्वतःहून गेले पाहिजे. इज ऑफ डूईंगच्या अत्यावश्यक सेवा तातडीने दिल्या गेल्या पाहिजेत, तसेच त्यांच्याकडे आलेल्या प्रकरणांचा निपटारा देखील तातडीने झाला पाहिजे. स्थानिक समस्या त्याच पातळीवर सोडविल्या गेल्या पाहिजेत असे सांगून शासनापर्यंत येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे

  

अधिकाऱ्यांनी लोकभिमुख प्रशासनाचे मॉडेल उभारावे

-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

·         मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामाचा आढावा

 

मुंबई, दि. १५ : महसूल विभागाने लोकाभिमुख होऊन काम करणे अपेक्षित आहे. याअनुषंगाने शासकीय पदाचा लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करुन गतिमान आणि पारदर्शक कामांचे नाविन्यपूर्ण मॉडेल सादर करावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचा सर्वसमावेशक आढावा घेतला. कौशल्यविकास मंत्री तथा जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi