‘टोबॅको-फ्री स्कूल प्रोग्राम २०२६–२७’ अंतर्गत चार संस्थांना अनुदान देण्यात आले. त्यामध्ये बालाजी सेवा संस्थान, जनलोक कल्याण परिषद, धरती ग्रामोथान एवं सहभागी ग्रामीण विकास समिति आणि ग्रामीण स्वावलंबन समिति यांचा समावेश होता.
कार्यक्रमादरम्यान तंबाखूमुळे होणारे आजार, विशेषतः कर्करोगाचा वाढता धोका आणि लहान वयातच जनजागृतीचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी एनएसएफतर्फे राबविण्यात येणाऱ्या जनजागृती मोहिमांवर आधारित एक विशेष लघुपटही प्रदर्शित करण्यात आला. या कार्यक्रमास नरोटम सेखसरिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष जोशी, उपाध्यक्ष राजश्री कदम, सहाय्यक संचालक रीटा पावडे, तसेच गौरव अरोरा, दत्ता बालासाहेब आणि शिरीन भूटिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सलाम मुंबई फाउंडेशनच्या वतीने विविध राज्यांतील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.