Sunday, 10 May 2026

इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक जाहीर 8 मे पर्यंत सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांची नोंदणी

 इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक जाहीर

  • 8 मे पर्यंत सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांची नोंदणी

 

मुंबईदि. 8 : राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून8 मे 2026 पर्यंत एकूण सात लाख 74 हजार 918 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग- 1 भरून नोंदणी केली आहे.

 

इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहिती व सूचनांनुसार ऑनलाईन अर्ज सादर करावेतअसे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेऱ्याओपन टू ऑल चौथी फेरीमुलींकरीता विशेष पाचवी फेरी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

 

            शून्य फेरी मध्ये 8 ते 20 मे या कालावधीत विद्यार्थ्यांना नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणेतात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणेहरकती/ दुरुस्ती मागण्यासर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणेविविध कोट्यासाठी यादी देऊन रिक्त जागा प्रत्यार्पित करणे तसेच पहिल्या फेरीकरीता जागा प्रदर्शित करणे ही प्रक्रिया होईल.

 

            नियमित कॅप फेरी-1 अंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणीभाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरण्याची प्रक्रिया 21 आणि 22 मे रोजी होईल. विद्यार्थ्यांना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कॅप फेरी-1 ची अलॉटमेंट प्रक्रिया 23 ते 26 मे दरम्यान पार पडणार असून26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनद्वारे प्रवेशासाठी वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होणार असूनएसएमएसद्वारेही संदेश पाठविण्यात येणार आहेत.

 

प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी व शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर 29 मे रोजी रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार असून30 मे रोजी दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.

 

विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेतील माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावीअसे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी support@mahafyjcadmissions.in या ई-मेलवर संपर्क साधता येणार असून8530955564 हा हेल्पलाईन क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

 टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी

-कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

 

कौशल्य विकासरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी टेक वारी’ उपक्रमामुळे प्रशासन अधिक भविष्यवेधी बनत असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रशासन जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी सज्ज होत असूनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःला फ्युचर रेडी’ बनविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी प्रास्ताविकात चार मेपासून आयोजित विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली. डीपीडीपीनवीन तंत्रज्ञानसायबर सुरक्षा आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या विकासासाठी टेक वारीचे महत्त्व याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कर्मयोगी भारत 2 एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या सप्ताहात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

या कार्यक्रमास राज्यातील पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचारी तसेच मंत्रालयातील विविध विभागांचे अतिरिक्त मुख्य सचिवप्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञान, संस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

 विकसित महाराष्ट्रासाठी तंत्रज्ञानसंस्कृती आणि प्रशासनाचा संगम आवश्यक

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी टेक वारीची तुलना पंढरपूरच्या वारीशी करताना सांगितले कीवारीमध्ये जशी शिस्तसातत्यअध्यात्म आणि सामूहिकता आहेत्याचप्रमाणे प्रशासनात तंत्रज्ञान आत्मसात करण्याची वृत्ती विकसित होणे आवश्यक आहे. डिजिटल साक्षरता ही आजच्या काळातील खरी साक्षरता बनली असूनप्रशासनातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले पाहिजेअसे त्यांनी नमूद केले.

 

ते पुढे म्हणाले की, ‘टेक वारी 2.0’ ही केवळ कार्यशाळा नसून प्रशासनाच्या भविष्यकालीन तयारीचा भाग आहे. विरासत से विकास तक’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सांस्कृतिक वारसा जपत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचारी प्रत्यक्ष आणि नऊ लाखांहून अधिक कर्मचारी ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमाशी जोडले गेले असूनहा देशातील सर्वांत मोठा तंत्रज्ञानाधारित प्रशिक्षण उपक्रम ठरल्याचे त्यांनी सांगितले.

Saturday, 9 May 2026

राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार

 राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्याखाजगी बाजार समित्या व थेट पणन परवाना धारकांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सहकार्य करावेअसे आवाहनही पणन मंत्री रावल यांनी केले.

00000

बी.सी. झंवर/विसंअ

अन्नधान्य, फळे किंवा भाजीपाल्यामध्ये भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय

 अन्नधान्यफळे किंवा भाजीपाल्यामध्ये भेसळ अथवा घातक रसायनांचा वापर झाल्याचा संशय आल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय साधून अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भेसळ करणाऱ्या परवाना धारकांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाहीही करण्यात येईलअसे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला दर्जेदार शेतमाल ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि

 पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले कीशेतकऱ्यांनी उत्पादित केलेला दर्जेदार शेतमाल ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. काही ठिकाणी फळे कृत्रिमरित्या पिकविणेत्यांची गोडी वाढविण्यासाठी रसायनांचा वापर करणेफळे व भाजीपाल्यांना कृत्रिम रंग देणे तसेच अन्नधान्य अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी बाजार समित्यांनी नियमित तपासण्या करून कठोर उपाययोजना कराव्यातअसे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच भाजीपालाफळे आणि अन्नधान्याच्या साठवणूक व वाहतुकीमध्ये कमी जाडीच्या प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरास प्रतिबंध करून पर्यावरणपूरक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार

 शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार फळे व भाजीपाल्यात

 भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार

                            -पणन मंत्री जयकुमार रावल

 

·         फळेभाजीपाला व इतर शेतमाल भेसळखोर पणन च्या रडारवर

 

मुंबईदि.८: राज्यातील शेतकरी दर्जेदार फळेभाजीपाला तसेच इतर शेतमालाचे उत्पादन करतात. मात्रकाही ठिकाणी फळांची गोडी वाढविण्यासाठीकृत्रिमरित्या पिकविण्यासाठी किंवा अधिक आकर्षक दिसण्यासाठी घातक रसायनांचा वापर केला जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

 

यासंदर्भात कृषि उत्पन्न बाजार समित्याखाजगी बाजार समित्या तसेच थेट पणन व्यवस्थेद्वारे होणाऱ्या शेतमाल खरेदी-विक्रीमध्ये भेसळ आणि घातक रासायनिक प्रक्रियांना आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार पणन संचालनालयाने राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्याखाजगी बाजार समित्या आणि थेट पणन परवाना धारकांना महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे.

Featured post

Lakshvedhi