Sunday, 29 December 2024

रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे

  रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे



अध्यक्ष जयद्रथ भगत, कार्याध्यक्ष सुभाष घासे, सरचिटणीस मारुती आडकर, सरचिटणीस हिरामण भोईर, हरिश्चंद्र शिंदे, दत्ता पाटील यांनी खासदार श्री सुनिल तटकरे, धैर्यशिलदादा पाटील, आमदार श्री.रविशेट पाटील यांची या हंगामात होणाऱ्या कुस्ती स्पर्धा विषयी सदिच्छा भेट घेतली

Saturday, 28 December 2024

विषय जरी "दारु" असला तरी, कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल II*

 *।। विषय जरी "दारु" असला तरी, कविता सुंदर आहे. न घेणाऱ्यालाही हसवेल II*


।। पिऊन थोडी चढणार असेल

।। तरच पिण्याला अर्थ आहे

।। एवढी ढोसून चढणार नसेल

।। तर आख्खा खंबा व्यर्थ आहे


।। मी तसा श्रध्दावान

।। श्रावण नेहमी पाळतो

।। श्रावणात फक्त दारू पितो

।। नॉनव्हेज मात्र टाळतो


।। ज्याची जागा त्याला द्यावी

।। भलती चूक करू नये

।। पिताना फक्त पीत रहावं

।। चकण्यानं पोट भरू नये


।। वेळच्या वेळी आपण ओळखावी

।। आपली आपली आणिबाणी

।। लाज सगळी सोडुन देऊन

।। ग्लासात घ्यावं लिंबुपाणी


।। पिऊन तर्र झाल्यानंतर

।। काय खातोय ते कळत नाही

।। खाल्ल्यानंतर बिलामधली

।। टोटल कधी जुळत नाही


।। अशीही वेळ असते जेंव्हा

।। कोणीच आपला नसतो

।। म्हणून आपण प्यायला जातो

।। तर नेमका ड्राय डे असतो


।। आपला पेग आपण भरावा

।। दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये

।। आपला ग्लास, आपली बाटली

।। दुसर्‍याच्या हातात देऊ नये


।। असं उगीच लोकांना वाटतं

।। की दुःख दारूत बुडून जातं

।। दुःख असतं हलकं हलकं

।। अल्कोहोलसोबत उडून जातं!


।। एकदा प्यायला बसल्यानंतर

।। तुझं-माझं करू नये

।। तुझी काय, माझी काय

।। नशा कधी सरू नये


।। तुला जायचंच असेल तर निघून जा ,

।। जाण्यासाठी भांडू नकोस

।। प्यायची नसेल तर पिऊ नको ,

।। पण दारू अशी सांडू नकोस


।। स्कॉच प्यावी कोरी, कच्ची

।। बर्फ नको, सोडा नको

।। उंच आभाळी उडण्यासाठी

।।पंख हवे... घोडा नको !


।। फॉरीन लिकर कितीही प्यावी

।। काही केल्या चढत नाही

।। देशी आपली थोडीशीच प्यावी

।। दोन दोन दिवस उतरत नाही


।। पिणं असतं आगळा उत्सव

।। त्याचा उरूस होऊ नये

।। प्यायला नंतर आपला कधी

।। वकार युनूस होऊ नये


।। घरी बसून दारू प्यायचे

।। खूप सारे फायदे असतात

।। हॉटेलमधे, बिल भरायचे

।। काटेकोर कायदे असतात


।। आम्ही कधीच दारूमधे

।। दुःख आमचं बुडवत नाही

।। दारू नेहमी शुध्दच ठेवतो

।। भेसळ आम्हाला आवडत नाही


।। हवा तसा मी चालतो आहे

।। कोण म्हणतंय ' जातोय तोल ? 

।। माझ्या मित्रा, माझ्या इतकी

।। पचवून दाखव, नंतर बोल!


।। प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे

।। काही ' न ' पिणारे मित्र

।। पार्टीनंतर आपल्याला 

।। आपल्या घरी नेणारे मित्र


।। पिणाऱ्यांनी समाजाचा

।। कुठलाच कायदा पाळू नये

।। जेंव्हा, जिथे, जशी वाटेल

।। प्यायचा मोह टाळू नये


।। ग्लासी लागेल ते ढोसत असतो

।। पानी लागेल ते चरत असतो

।। जेंव्हा माझं बिल कोणी

।। दुसराच माणूस भरत असतो


।। काय होतंय, कुठे होतंय

।। काही केल्या कळत नाही

।। एकदातरी वेळ अशी

।। पिणाऱ्यांना टळत नाही


।। प्रत्येकानंच आपला आपला

।। जसा घ्यायचा असतो श्वास

।। तसा प्रत्येकानं  आपला

।। सांभाळायचा असतो ग्लास....


।। समस्त दारू पिणा-यांना सादर अर्पण 

   🍺🥃


*लवकर तारीख कळवा; थोड्याच तारखा शिल्लक आहेत... 😜*

Friday, 27 December 2024

28/12/2024 व 29/12/2024 या दिवशी वाहतूक बंदीपोयनाड, पेझारी, अलिबाग, चोंढी, नागाव, रेवदंडा

 पुढील काही दिवसांसाठी महत्वाची माहिती.


पोयनाड, पेझारी, अलिबाग, चोंढी, नागाव, रेवदंडा येथे वाहतूक कोंडी होवु नये, व अवजड वाहनांमुळे अपघात होवु नये याकरिता धरमतर ब्रिज ते अलिबाग, अलिबाग ते मांडवा जेट्टी, अलिबाग-रेवस-मुरुड या मार्गावर अवजड वाहनांना दि. 28/12/2024 व 29/12/2024 या दिवशी वाहतूक बंदी करण्याचे आदेश मा. जिल्हाधिकारी साहेबांनी काढलेले आहेत.



*31 st करिता रायगड जिल्ह्यात वाहतुकीचे नियोजन.*


माणगाव येथे वाहतूक कोंडी होवु नये याकरिता लांब पल्ल्याच्या बसेससाठी माणगाव शहराबाहेर एच.पी.पेट्रोल पंपाजवळ असलेल्या ग्राउंडवर तात्पुरता दि. 28/12/2024 ते 02/01/2025 पर्यंत एस.टी. थांबा हलविण्यात आला आहे.

माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन; सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

 माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे निधन;

सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

 

मुंबई,  दि. 27 :- माजी प्रधानमंत्री डॉ.मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून हा दुखवटा 26 डिसेंबर 2024 पासून 1 जानेवारी 2025 पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) पाळला जाईल. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तसेचत्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश-विदेशातील सर्व भारतीय दूतावासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.

सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी

 सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस

ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी

 

मुंबई, दि. २७ : नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यासत्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.

संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएसपी) उत्तीर्ण केला असणे आवश्यक आहे. 

किरकोळ व घाऊक औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमियोपॅथी नोंदणीकृत डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. तसेचकिरकोळ औषध विक्रेते हे डॉक्टरांद्वारे देण्यात आलेले प्रिस्क्रीप्शनवर औषध विक्री करू शकतात.

तथापि महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायिक यांच्या प्रिस्क्रीप्शनवर औषधांची विक्री करण्यापूर्वी रजिस्ट्रेशन क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) ही अर्हता प्राप्त केल्याबाबतचा सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याबाबत खात्री करूनच औषधांची विक्री करावी. ही जबाबदारी किरकोळ औषध विक्रेते यांची राहील. असेही आयुक्त अन्न व औषध प्रशासन श्री. नार्वेकर यांनी कळविले

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

 जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 27 :  सर्वोच्च न्यायालयाने  सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी अर्थात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचे निर्देश दिले आहेत.  त्यानुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वाहनांना ही नोंदणी क्रमांकाची पाटी असणे बंधनकारक असणार आहे. तसेच 1 एप्रिल 2019 नंतर खरेदी केलेल्या वाहनांवर उत्पादकामार्फत उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यात आल्यामुळे अशा वाहनधारकांना पुन्हा ही नंबर प्लेट लावण्याची आवश्यकता नाही.

नोंदणीकृत वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणेनंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटगिरी रोखणेवाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणेयासाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट महत्वाची आहे. तरी सर्व संबंधीत वाहनमालकांनी ही उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची नंबर प्लेट बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. या कामासाठी परिवहन विभागाकडून तीन कंपन्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फतच ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही अनधिकृत विक्रेत्याकडून लावलेल्या नंबर प्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये होवू शकणार नाही. ही नंबर प्लेट बसविण्याकरिता 31 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी. याविषयी काही अडचणतक्रार किंवा शंका असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर किंवा dytccomp.tpt-mh@gov.in या ईमेलवर संपर्क करावाअसे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले आहे.

०००००

बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार; 10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 बृहन्मुंबईमधील होमगार्डच्या 2771 रिक्त जागा भरणार;

10 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबईदि. 27 : बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरूष व महिला होमगार्डच्या 2771 जागा भरण्यात येणार आहे. यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रकनियम व अटी याबाबत विस्तृत माहिती व अर्ज https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1/php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या बृहन्मुंबईतील उमेदवारांनी नोंदणीकरीता अर्ज करावाअसे आवाहन समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्तसशस्त्र पोलीस ताडदेवमुंबई यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi