Sunday, 14 June 2026

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

 गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

 

-मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

 

मुंबई, दि. १४ : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूगर्भात मुरवणे आणि वाहून जाणारी माती थांबवणे ही गरज ओळखून 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' या मोहिमेत प्रत्येक नागरिकाने राज्य शासनासोबत एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

 

मृद व जलसंधारण विभाग गेल्या काही वर्षांपासून राज्यभर भरीव काम करीत आहे. सध्या आम्ही 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती मंत्री श्री.राठोड यांनी दिली.

 

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

 आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी

आरोग्य क्षेत्रात बँकेच्या सीईंग इज बिलिव्हिंगया प्रमुख उपक्रमांतर्गत चार लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, ही केंद्रे आता स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे १.६ कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होत आहे. जिल्हा अंधत्व नियंत्रण संस्था आणि आयुष्मान भारत यांसारख्या शासकीय योजनांशी समन्वय साधून या उपक्रमांचा विस्तार करण्यात आला आहे.

रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना

 रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना

रोजगारक्षमतेच्या क्षेत्रात ६५९८ युवकांना कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले आहे. या कार्यक्रमातील ६१ टक्के लाभार्थी महिला असून, ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना विशेष आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले आहे. याशिवाय ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांनाही मदत करण्यात आली आहे.

जलसुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना

 जलसुरक्षेसाठी व्यापक उपाययोजना

जलसुरक्षा उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लीटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएमची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील गावांसह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे; तसेच आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन उपाययोजना आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या दिशेने सात लाख वृक्षांची लागवड हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.

 

फूड सेफ्टी ऑन व्हील्स’द्वारे व्यापक जनजागृती

 फूड सेफ्टी ऑन व्हील्सद्वारे व्यापक जनजागृती

·         अन्न व औषध प्रशासनाचा सुरक्षित अन्न, निरोगी समाजासाठी पुढाकार

मुंबई, दि. 10 :  ‘फूड सेफ्टी ऑन व्हील्सया विशेष उपक्रमांतर्गत बृहन्मुंबई परिसरात १ ते १५ जून पर्यंत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांमध्ये सुरक्षित अन्नाविषयी जागरूकता निर्माण करणे, अन्नभेसळीमुळे होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे आणि  जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रेल्वे स्थानके आणि इतर गर्दीच्या परिसरांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. फिरत्या अत्याधुनिक प्रयोगशाळेद्वारे विविध अन्नपदार्थांचे ६९ नमुने जागेवरच तपासण्यात आले. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, अन्नविक्रेते आणि अन्न व्यवसायिक यांच्याशी थेट संवाद साधून अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी, अन्न साठवणूक, अन्नपदार्थांवरील लेबलची माहिती, कालबाह्य अन्नपदार्थ टाळण्याचे महत्त्व तसेच भेसळयुक्त अन्न ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा

 सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे पट्टे वाटपाची कार्यवाही तातडीने पूर्ण करा

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. १० :-  राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष अभय योजना-२०२५ ला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असल्याने सिंधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनींचे पट्टे वाटप शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार तातडीने पूर्ण  करावे, असे  निर्देश  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

सिंधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयातील दालनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली.

 

बैठकीस महसूल विभागाचे संबंधित अधिकारी आणि सिंधी समाज संघटनेचे  प्रतिनिधी उपस्थित होते. तर  नंदुरबार, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, अमरावती व चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी व अन्य संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे  बैठकी सहभागी झाले होते.

 

राज्य शासनाने सिंधी विस्थापितांना  निवासी व वाणिज्यिक जमिनींच्या शर्तभंगाचे नियमानुकूलन करण्यासाठी १५ मे २०२५ रोजी विशेष अभय योजना-२०२५ लागू केली आहे. या योजनेत नागपूर आणि अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी चांगले काम केले असून  इतर जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे या योजनेत काम करावे, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा महत्वाकांक्षी उपक्रम असल्याने कोणताही पात्र लाभार्थी या योजने बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले,  शासन निर्णयानुसार या जमिनींचे पट्टे वाटप करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून त्यांनी आपल्या अधिकारांचा प्रभावी वापर करून ही प्रक्रिया मुदतीत पूर्ण करावी. सिंधी विस्थापितांच्या जमिनींचे  पट्टे वाटपासाठी  एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येणार असून  संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणांचा प्राधान्याने निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करावे

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी -मंत्री जयकुमार रावल आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठी विशेष योग सत्र

 योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी -मंत्री जयकुमार रावल

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठी विशेष योग सत्र

मुंबई, दि. 13 : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूतांसाठी आयोजित केलेल्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राजशिष्टाचार विभाग आणि कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन ड्राईव्ह येथील संस्थेच्या सभागृहात शनिवारी सकाळी हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मंत्री श्री रावल यांच्या हस्ते योग सत्राचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शंखनादाने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त निवित श्रीवास्तव यांनी मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत केले. कैवल्यधाम या भारतातील सर्वात जुन्या योग संशोधन व शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्या प्रतिमेस मंत्री श्री रावल आणि मान्यवरांनी पुषार्पण केले.

यावेळी मंत्री श्री रावल म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली जागतिक मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.  देशांचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध देश, संस्कृती आणि परंपरांतून आलेल्या समाजास आरोग्य, शांतता आणि आनंद या समान मूल्यांनी जोडण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. योगाच्या शास्त्रीय परंपरेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी कैवल्यधाम संस्थेने केलेल्या शतकोत्तर कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.

यावेळी कैवल्यधाम योग संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यविषयक लाभ समजावून सांगितले. योग सत्रात युगांडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड, बांगलादेश, ब्रिटन, घाना, जपान, युक्रेन, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, इजिप्त, नॉर्वे, ब्राझील, मॉरिशस, थायलंड, तुर्की, कॅनडा, आयर्लंड, येमेन, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, दक्षिण कोरिया, पेरू आणि ग्रीस आदी 26 देशांचे महावाणिज्यदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि योग परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. इजिप्त, नॉर्वे, ब्राझील, मॉरिशस, थायलंड, तुर्की, कॅनडा, आयर्लंड आदी देशाच्या महावाणिज्य दुतानी मंत्री श्री रावल यांच्याकडे या उपक्रमाचे कौतुक करून योगाच्या जागतिक प्रसारासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा प्रभावी मार्ग आहे. आज जगभरातील विविध देशांमध्ये योगाचा स्वीकार वाढत असून, मानवतेच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांततेसाठी योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

-मि.जोसे मौरो दा फोन्सेका कोस्टा कुटो

(ब्राझीलचे महावाणिज्य दूत)                

000

Featured post

Lakshvedhi