Saturday, 13 June 2026

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’

 महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीस्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण करेल. हे विधेयक  राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महाडीबीटी पोर्टल, पीएम किसान योजना, पीक कापणी प्रयोग, पीक पेरणी नोंदी, किड व रोग सर्वेक्षण, महाकृषी ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, विविध कृषि प्रकल्प

 कृषी विभागाच्या विविध योजना आणि उपक्रमांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमातून होत आहे. महाडीबीटी पोर्टल, पीएम किसान योजना, पीक कापणी प्रयोग, पीक पेरणी नोंदी, किड व रोग सर्वेक्षण, महाकृषी ॲप, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, हवामान व आपत्कालीन संदेश, निविष्ठा नियोजन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित कृषी उपक्रमांची माहिती क्षेत्रीय स्तरावरून ऑनलाइन अद्ययावत करावी लागते.

सध्या या कामासाठी क्षेत्रीय कर्मचारी मोबाईलचा वापर करत असून अनेक वेळा कार्यालयातील संगणकांवर अवलंबून राहावे लागते. तसेच गुगल स्प्रेडशीटसह विविध डिजिटल प्रणालींमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुका किंवा मंडळ कार्यालयात जावे लागत असल्याने कामकाजावर परिणाम होत होता.  या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कर्मचारी वर्गात लॅपटॉप पुरवठा करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना 2021 पासून तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना 2023 पासून करते आहे. या संघटनांसोबत आयुक्तालय स्तरावर तसेच मंत्रालय स्तरावर बैठका घेऊन त्यांची अडचण व मागणी समजावून घेण्यात आली आहे. या मागणीची दखल घेत शासनाने २०२५-२६ मध्ये या प्रस्तावाला प्राधान्याने मान्यता दिली.

या संदर्भात आवश्यक तांत्रिक विनिर्देश इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयाकडून निश्चित करण्यात आले आहेत. तसेच खरेदी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता राखण्यासाठी शासकीय ई मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबवून पुरवठा आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील १०,६२० सहाय्यक कृषी अधिकारी, ,७७० उपकृषी अधिकारी आणि ८८५ मंडल कृषी अधिकारी अशा एकूण १३,२७५ अधिकारी व कर्मचाऱ्यांना हे लॅपटॉप वितरित केले जाणार आहेत. या सुविधेमुळे क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सुलभ होणार असून योजनांची अंमलबजावणी, तपासण्या, माहिती संकलन व अहवाल सादरीकरण यामध्ये मोठ्या प्रमाणावर वेग आणि अचूकता येणार आहे.

 

चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने

 चित्रपटनिर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर लक्षात घेऊन एल अँड टी माइंडट्रीच्या सहकार्याने एआय फिल्ममेकिंग हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रकाश मगदूम यांनी यावेळी सांगितले.

महोत्सवाचे उद्घाटन व समारोप प्रभादेवी येथील रविंद्र नाट्य मंदिरात होणार आहे. एनएफडीसीच्या पाच प्रदर्शन स्थळांबरोबरच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT), तसेच बांद्रा आणि विलेपार्ले येथील दोन महाविद्यालयांमध्येही चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे.

 

महोत्सवात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागांमध्ये एकूण १८ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून एकूण पारितोषिक रक्कम ४५ लाख रुपये आहे. याशिवाय १० लाख रुपयांचा प्रतिष्ठेचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. यंदा व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्यावरील चरित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

फिल्मसिटी केवळ चित्रीकरण सुविधा पुरविण्यापुरती मर्यादित न राहता आशय निर्मिती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही

 फिल्मसिटी केवळ चित्रीकरण सुविधा पुरविण्यापुरती मर्यादित न राहता आशय निर्मिती आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही सक्रिय होत असून मोठ्या प्रमाणावर चित्रपट निर्मितीचे प्रकल्प हाती घेत असल्याची माहितीही म्हसे पाटील यांनी दिली.

१९९० मध्ये सुरू झालेल्या या द्वैवार्षिक महोत्सवाचे हे १९वे पर्व असल्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी सांगितले. यंदा महोत्सवासाठी १,४५९ चित्रपटांच्या नोंदी प्राप्त झाल्या. त्यापैकी स्पर्धा विभागात १४४ चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये ९२ भारतीय आणि ५२ आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे. तर स्पर्धाबाह्य विभागात २०२ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. या विभागात ४६ देशांतील चित्रपटांचा समावेश असून बेस्ट ऑफ फेस्टिव्हल्स’, ‘ऑस्कर विजेते चित्रपट’, ‘रेमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह’, ‘एनएफडीसी रिस्टोर्ड फिल्म्ससह, ‘इकोज फ्रॉम नॉर्थईस्टया नव्या विभागाची भर घालण्यात आली आहे.

महोत्सवातील प्रमुख आकर्षणांमध्ये ज्येष्ठ ॲनिमेशन दिग्दर्शक रेमंड क्रुमे यांचा रेट्रोस्पेक्टिव्ह आणि त्यांची विशेष मास्टरक्लास, तसेच प्रसिद्ध माहितीपट निर्माते डेव्हिड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दी निमित्त सीक्रेट्स ऑफ वाइल्ड इंडियाया चित्रपटाचे विशेष प्रदर्शन यांचा समावेश आहे.

महोत्सवादरम्यान १० मास्टरक्लास, नॉलेज सिरीज, भारतीय माहितीपट निर्माते संघटनेचा (IDPA) ओपन फोरम तसेच दुसऱ्या आवृत्तीतील वेव्हज् डॉक बाजारआयोजित करण्यात येणार आहे. डॉक बाजारसाठी १५५ प्रस्ताव प्राप्त झाले असून निवडक प्रकल्पांना मार्गदर्शन व उद्योग क्षेत्रातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

 मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र व्यासपीठ

 

मुंबई, दि. १२ : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) आयोजित १९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) १५ ते २१ जून दरम्यान मुंबईत होणार असून यंदाच्या महोत्सवात प्रथमच १९ निवडक मराठी माहितीपट आणि लघुपटांचे विशेष प्रदर्शनासोबत आयोजित करण्यात आले आहे.  निवडक माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. महोत्सवाचे आयोजन एनएफडीसी संकुलासह विविध ठिकाणी करण्यात आले असून यंदा एनएफडीसी व फिल्मसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. यावेळी पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होत्या.

फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि एनएफडीसी यांच्यातील सहकार्यामुळे मराठी चित्रपट, माहितीपट आणि सांस्कृतिक वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्यास मोठी मदत होणार आहे.

रविंद्र नाट्य मंदिरात १६ ते २० जून दरम्यान दररोज सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत सामाजिक जाणीव, महिला सक्षमीकरण, मानसिक आरोग्य, ग्रामीण जीवन, वारसा आणि मानवी नातेसंबंध या विषयांवरील चित्रपटांचा यात समावेश आहे.

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’

 महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी

महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधीस्थापन करणे, विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा यांचा देखील अभ्यास केला जावा. जिल्हा आणि तालुका व गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा असली पाहिजे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती असावी जेणेकरून या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियमित परीक्षण करेल. हे विधेयक  राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून कृषी क्षेत्रात लिंगसमतेच्या दिशेने एक नवा आदर्श निर्माण करेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

 योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी

- मंत्री जयकुमार रावल
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर महावाणिज्यदूत आणि मानद वाणिज्यदूतांसाठी विशेष योग सत्र
मुंबई, दि. 13 : योग ही भारताने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवनपद्धती असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज केले. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूतांसाठी आयोजित केलेल्या विशेष योग सत्राच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते.
राजशिष्टाचार विभाग आणि कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मरीन ड्राईव्ह येथील संस्थेच्या सभागृहात शनिवारी सकाळी हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. मंत्री श्री रावल यांच्या हस्ते योग सत्राचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक शंखनादाने करण्यात आली. त्यानंतर कैवल्यधाम संस्थेचे विश्वस्त निवित श्रीवास्तव यांनी मंत्री जयकुमार रावल यांचे स्वागत केले. कैवल्यधाम या भारतातील सर्वात जुन्या योग संशोधन व शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वामी कुवलयानंद यांच्या प्रतिमेस मंत्री श्री रावल आणि मान्यवरांनी पुषार्पण केले.
यावेळी मंत्री श्री रावल म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनाला संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेली जागतिक मान्यता ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे योगाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले. विविध देश, संस्कृती आणि परंपरांतून आलेल्या समाजास आरोग्य, शांतता आणि आनंद या समान मूल्यांनी जोडण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. योगाच्या शास्त्रीय परंपरेचे जतन आणि प्रसार करण्यासाठी कैवल्यधाम संस्थेने केलेल्या शतकोत्तर कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.
यावेळी कैवल्यधाम योग संस्थेच्या तज्ज्ञ प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यविषयक लाभ समजावून सांगितले. योग सत्रात युगांडा, अर्जेंटिना, न्यूझीलंड, बांगलादेश, ब्रिटन, घाना, जपान, युक्रेन, फ्रान्स, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, इजिप्त, नॉर्वे, ब्राझील, मॉरिशस, थायलंड, तुर्की, कॅनडा, आयर्लंड, येमेन, बेलारूस, मेक्सिको, श्रीलंका, दक्षिण कोरिया, पेरू आणि ग्रीस आदी 26 देशांचे महावाणिज्यदूत, वाणिज्यदूत, उच्चायुक्त तसेच त्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभर साजरा केला जातो. या उपक्रमामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिनिधींना भारतीय संस्कृती आणि योग परंपरेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करून योगाच्या जागतिक प्रसारासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

Featured post

Lakshvedhi