Thursday, 11 June 2026

सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत

 सोलर प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या जमीन खरेदी व्यवहारांचीही चौकशी करण्याचे निर्देश देत महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, ज्या पात्र शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही, त्यांना तातडीने प्रलंबित रक्कम मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. यासाठी संबंधित सोलर ऊर्जा कंपनीच्या प्रतिनिधींची जिल्हास्तरावर बैठक घेण्यात यावी.  याबरोबरच प्रकल्प क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह झोन, अभयारण्य क्षेत्र तसेच अन्य संबंधित जमिनींबाबत अचूक माहिती संकलित करून त्याचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिले.

चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी

 चाळीसगाव येथील सोलर प्रकल्पातील अनियमिततेची चौकशी करावी

-         महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई, दि. १० : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात उभारण्यात आलेल्या सोलर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सखोल चौकशी करावी, तसेच प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचे झोनिंग करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

मंत्रालयात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आमदार मंगेश चव्हाण व जळगावचे जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 


माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

 माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना

परिक्षा शुल्क भरण्यास मुदतवाढ

 

            मुंबई, दि. 10 : माथाडी मंडळ आस्थापनेवरील पदभरतीकरिता उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1981 कलम 6 अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, 1969 कलम 6 अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र.युडब्लूए-2016/प्र.क्र.01/कामगार-5, दिनांक 11 फेब्रुवारी, 2021 नुसार खालील संवर्गातील एकूण 22 माथाडी मंडळे व 12 सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक संवर्गातील पदांच्या सरळसेवा पध्दतीने गट-क मधील रिक्त पदे भरती जाहिरात 13.05.2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

त्यानुसार उमेदवारांचे अर्ज 11.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत यशस्वीपणे दाखल झाले असतील अशा उमेदवारांना अर्जाचे परीक्षा शुल्क भरण्याकरिता 12.06.2026 रोजी 23.55 वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली होती. तथापि, शुल्क भरण्याकरिता काही तांत्रिक अडचणी उमेदवारांना येत असल्यामुळे शुल्क भरण्याच्या कालावधीमध्ये 18.06.2026 रोजी23.55 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.  ही मुदतवाढ 11.06.2026 रोजी पर्यंत अर्ज भरण्यात आलेल्या उमेदवारांना केवळ शुल्क भरण्याकरिता देण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

असे सह आयुक्त कामगार तथा सदस्य सचिव, माथाडी व सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया समिती, मुंबई यांनी कळविले आहे. 

अधिक माहितीकरीता https://mahakamgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी १ ते ३१ जुलैदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

 राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी

१ ते ३१ जुलैदरम्यान अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १० : कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक आधार देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून १ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुकांनी आपले सरकार या पोर्टलवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय ५० वर्षांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत दहा वर्षांची शिथिलता देण्यात आली असून त्यांच्यासाठी किमान वय ४० वर्षे ठेवण्यात आले आहे.

अर्जदाराने कला किंवा साहित्य क्षेत्रात किमान १५ वर्षे कार्य केलेले असावे; तसेच वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. ज्यांची उपजीविका केवळ कलेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही, असे कलाकार या योजनेसाठी पात्र ठरतील.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही महामंडळाच्या अथवा नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. तसेच अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

अर्ज करताना वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य किंवा केंद्र शासनाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास), तसेच नामांकित संस्था अथवा व्यक्तींची शिफारसपत्रे आणि अन्य आवश्यक पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी मुदतीत आपले सरकार पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सुभाष काकडे यांनी केले आहे.

मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

 मानखुर्द येथील चिल्ड्रन्स एड सोसायटीची जागा अतिक्रमणमुक्त करा

- पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबई, दि. १० : मानखुर्द येथील राज्य शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि टाटा पॉवरच्या ताब्यातील जमिनींवरील अतिक्रमणे हटवून ती जागा चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या मूळ उद्देशासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.

मानखुर्द येथील अतिक्रमित झालेल्या जागेसंदर्भात पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आज पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आढावा बैठक झाली. या बैठकीस माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह मुंबई महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महिला व बालविकास, टाटा पॉवर चे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, मानखुर्द परिसरातील महामार्गालगत नव्याने उभारली जात असलेली बेकायदेशीर गोदामे, उच्चदाब वीजवाहिन्यांखाली सुरू असलेली बांधकामे आणि विविध स्वरूपातील अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करुन ते हटविण्यात यावीत; तसेच या भागातील गॅस पाइपलाइन आणि उच्चदाब वीजवाहिन्यांच्या सुरक्षितता क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत वापरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. चिल्ड्रन्स एड सोसायटी, टाटा पॉवर, पीडब्ल्यूडी आणि शासकीय जमिनींच्या सीमा निश्चित करण्यासाठी सिटी सर्व्हे विभागाने तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून सर्व संबंधित विभागांच्या स्वाक्षरीसह अधिकृत नकाशे उपलब्ध करून द्यावेत.

मंत्री ॲड.शेलार यांनी मुंबई महानगरपालिकेला नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत कारवाईची प्रक्रिया गतीमान करण्यासंबंधी निर्देश दिले. तसेच विविध विभागांनी स्वतंत्र कारवाई करण्याऐवजी समन्वित पद्धतीने नोटिसा बजावून अतिक्रमणे हटविण्याचे सांगितले. त्याचबरोबर बेकायदेशीर गोदामांना देण्यात आलेले परवाने, अग्निसुरक्षा परवानग्या, वीजजोडण्या, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा तपासून आवश्यक त्या रद्द करण्याचेही निर्देशही देण्यात आले.

मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात

 मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, कोकणातील दशावतार महोत्सवांची संख्या वाढवून मुंबई आणि ठाणे येथेही शासनाच्या माध्यमातून विशेष दशावतार महोत्सव आयोजित करण्यात येतील. त्याचबरोबर दशावतार विषयक प्रशिक्षण कार्यशाळा अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्थानिक संस्थांशी समन्वय साधावा.

महाराष्ट्रातील लोककलांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याबाबत बालभारतीला पत्र पाठविण्याचे निर्देश मंत्री ॲड.शेलार यांनी कलाकारांच्या प्रवास सवलतीसाठी परिवहन विभागाशीही पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दशावतार कलाकारांच्या वाहनांवरील करसवलत, विश्रांतीगृहे, मुंबई-ठाणे परिसरात निवास व्यवस्था; तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीच्या मागण्यांवरही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री ॲड.शेलार यांनी यावेळी सांगितले.

कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार यांनी दशावतार कलाकारांची अधिकृत निर्देशिका (डिरेक्टरी) तयार करण्याच्या प्रस्तावालाही यावेळी मान्यता दिली.

Wednesday, 10 June 2026

दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक

 दशावतार कलेच्या संवर्धनासाठी शासन सकारात्मक

– सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

·         कलाकारांच्या मागण्यांवर विभागीय समन्वय बैठकीचे निर्देश

 

मुंबई, दि. १० : महाराष्ट्र शासनाकडून पात्र दशावतार कलापथकांना अनुदान दिले जाते; तसेच ज्येष्ठ कलावंत मानधन योजनेअंतर्गत दरमहा पाच हजार रुपयांचे मानधनही उपलब्ध आहे. मात्र, दशावतार नाट्यमंडळाच्या मागण्या ह्या विविध विभागांशी संबंधित असल्याने या मागण्यांबाबत मुख्य सचिवांच्या स्तरावर समन्वय बैठक घेण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.

कोकणातील पारंपरिक दशावतार लोककलेच्या जतन, संवर्धन आणि कलाकारांच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी येथे बैठक झाली. या बैठकीस आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार मंडळांचे प्रतिनिधी, कलावंत आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi