Sunday, 7 June 2026

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई,दि.६: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहात पार पडले.

हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अलौकिक नेतृत्व आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून, तो महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवतो. या ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते. तसेच भूमिपुत्र स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) द्वारे विकसित करण्यात आलेल्या या स्मारकामध्ये ८ फुटांच्या भव्य चबूतऱ्यावर १२ फुटांचा कांस्य धातूचा अर्धपुतळा (बस्ट) बसवण्यात आला आहे. नवी मुंबईतील 'आकार आर्ट अँड स्कल्पचर'चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला असून, महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) मध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे.

आठ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत पूर्ण झालेली ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील एक प्रमुख आकर्षण ठरणार आहे. तसेच विमानतळावर येणाऱ्या देशी-विदेशी प्रवाशांसाठी आणि अभ्यागतांसाठी हे स्थान सांस्कृतिक महत्त्वाचे एक मुख्य केंद्र बनेल यात शंका नाही.

                                                                 000

वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनचे आवाहनः

 वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णालयांना अन्न व औषध प्रशासनचे आवाहनः

सर्व डॉक्टर, रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांना आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनी औषधे, सर्जिकल ग्लोव्हज (Surgical Gloves) किंवा अन्य कोणतीही वैद्यकीय उपकरणे खरेदी करताना ती केवळ परवानाधारक आणि अधिकृत उत्पादक/पुरवठादाराकडूनच खरेदी करावीत, असे आवाहन केले आहे. सदर उत्पादनांचा वापर मोठ्या प्रमाणावर रुग्णालयात होत असतो त्यामुळे पुरवठा करण्यात आलेल्या खात्रीशीर गुणवत्ता नसलेल्या उत्पादनांच्या वापरामुळे रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. वैद्यकीय उपकरणे किंवा औषधे खरेदी करताना त्यावर परवाना क्रमांक (License Number), बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट व्यवस्थित छापलेली आहे की नाही याची खात्री करावी. शस्त्रक्रिया किंवा तपासणीसाठी वापरले जाणारे ग्लोव्हज Medical Devices Rules 2017 च्या मानकाप्रमाणे आहेत की नाही हे तपासावे. पॅकिंग फाटलेले असल्यास ते वापरणे टाळावे, असे आवाहन केले

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, कारागीर, स्वयंरोजगार गट आणि नवउद्योजकांना या हेल्पलाईनचाउद्योजक +918308809334 या क्रमांकावर कॉल किंवा WhatsApp करून या सुविधेचा लाभ

 महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात MSME क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा असून रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ, निर्यात वाढ आणि स्थानिक अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणामध्ये या क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्र RAMP कार्यक्रमाच्या माध्यमातून MSME क्षेत्राची स्पर्धात्मकता वाढविणे, बाजारपेठ उपलब्ध करून देणे, संस्थात्मक क्षमता मजबूत करणे आणि उद्योगांच्या शाश्वत विकासाला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्यातील सर्व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, महिला उद्योजिका, कारागीर, स्वयंरोजगार गट आणि नवउद्योजकांना या हेल्पलाईनचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

            नवीन उद्योग सुरू करणे, व्यवसाय विस्तार, वित्तीय सहाय्य, सरकारी खरेदी प्रक्रियेत सहभाग, निर्यात व्यवसाय सुरू करणे किंवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी या मोफत सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ यांनी केले आहे.

एमएसएमई’ची हेल्पलाईन सुरू; उद्योजकांना तज्ज्ञ मार्गदर्शन

 एमएसएमईची हेल्पलाईन सुरू; उद्योजकांना तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई, दि. 6 : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ सल्ला सहज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमांतर्गत MSME हेल्पलाईनची सुरूवात करण्यात आली आहे. या हेल्पलाईनद्वारे राज्यभरातील उद्योजकांना पूर्णतः मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MoMSME), भारत सरकार आणि जागतिक बँक यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम महाराष्ट्रात महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मार्फत कार्यान्वित करण्यात आला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (MCCIA) यांच्या माध्यमातून ही हेल्पलाईन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

राज्यातील कोणत्याही भागातील उद्योजक +918308809334 या क्रमांकावर कॉल किंवा WhatsApp करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. उद्योग क्षेत्रातील विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, वित्तीय सल्ला, बाजारपेठ उपलब्धता तसेच व्यवसाय विकासासाठी आवश्यक सहाय्य या माध्यमातून मिळणार आहे.

या हेल्पलाईनद्वारे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, उद्यम नोंदणी (Udyam Registration), GST नोंदणी व करसंबंधित सल्ला, वित्तीय नियोजन, कर्ज व पतपुरवठा, विविध अनुदान योजनांची माहिती, GeM पोर्टलवरील नोंदणी, मार्केटिंग व ब्रँडिंग, आयात-निर्यात व्यवसाय, प्रकल्प अहवाल तयार करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.

शासनाच्या अनेक योजना आणि सुविधा उपलब्ध असूनही अनेक उद्योजकांना वेळेवर योग्य माहिती व तज्ज्ञ सल्ला मिळत नसल्याची बाब लक्षात घेऊन ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून उद्योजकांच्या अडचणी दूर करून त्यांच्या व्यवसायवृद्धीस चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

विशेषतः नवउद्योजक, महिला उद्योजिका, स्टार्टअप्स, ग्रामीण भागातील उद्योग, कारागीर, स्वयंरोजगार गट तसेच विद्यमान उद्योगांच्या विस्ताराची योजना आखणाऱ्या उद्योजकांना या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले.

००००

'टाईमलाईन' समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक

 'टाईमलाईन' समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'टाईमलाईन' पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि 6 : टाईमलाईन हे पुस्तक समाजमाध्यमावरील पोस्टसचे संकलन आहे. मात्र यामध्ये नकारात्मक विचार शोधूनही आढळणार नाही. टाईमलाईन हे समाजमनात सकारात्मकता पेरणारे पुस्तक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

रविंद्र नाट्यमंदिर येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या 'टाईमलाईन' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष अॅड राहुल नार्वेकर,  गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, दिग्दर्शक मधुर भांडारकर, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. अमित मायदेव, सुलेखनकार अच्युत पालव व विजय दर्डा हे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ श्री राजेंद्र दर्डा यांनी याआधीही झुंबर, माझी भिंत यासारखी विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके लिहिली आहेत. नकारात्मकतेने ग्रासून टाकणाऱ्या जगातही सकारात्मक राहता येते हे शिकवणारे हे पुस्तक आहे. बदलत्या काळानुसार आपण सुसंगत राहिले पाहिजे हे त्यांनी या पुस्तकातून आवर्जून सांगितले आहे. लोकमत समूहही काळाबरोबर चालत आहे. श्री राजेंद्र दर्डा यांनी लिहिलेल्या पोस्ट आजही सुसंगत आहेत. समाजमाध्यमे ही अभिव्यक्तीची साधने झाली आहेत हे खरे, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार होता कामा नये यासाठी समाजमाध्यमाची आचारसंहिता सर्वानीच पाळणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाजातील सर्व स्तरातील लोकांची अभिव्यक्ती या पुस्तकाच्या माध्यमातून पहावयास मिळते. या पुस्तकात आत्मपरीक्षणही पहावयास मिळते. हे पुस्तक नव्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार म्हणाले, साहित्य, संस्कृती, कला, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आहे. टाईमलाईन हे पुस्तक समाजमाध्यमाची ताकद दर्शविणारे आहे. नव्या  धाटणीचे हे पुस्तक समाजमाध्यमाला दिशा देणारे आहे. समाजमाध्यमावरील लेखनाचे मार्गदर्शन या पुस्तकात मिळते असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड शेलार यांनी सांगितले.

लोकमत समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा मनोगतात म्हणाले, सोशल मीडिया या माध्यमाशी मी स्वतःला जोडून घेतले. नवीन पिढीशी जोडला गेल्याचा आनंद वाटतो. या माध्यमात मी कटुता टाळली. सकारात्मकता जपली. टाईमलाईनमधील घटना प्रेरणा देणा-या आहेत. समाजासाठी काम करणाऱ्यांवर मी लिहिले असल्याचेही श्री दर्डा यांनी सांगितले.

Saturday, 6 June 2026

जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रियेमुळे पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगार निर्मिती

 जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रियेमुळे

पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगार निर्मिती

- वस्त्रोद्योग मंत्री सावकारे

मुंबई, दि. ५ : जुन्या कपड्यांवरील पुनर्प्रक्रिया आणि अपसायकलिंग केल्याने पर्यावरण संवर्धनासह महिलांसाठी रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांच्या व्हिडिओ संदेश प्रदर्शित करण्यात आला.

रिफायबर आणि ओटेररी यांच्या वतीने मुंबईतील वापरानंतर टाकून दिल्या जाणाऱ्या कपड्यांच्या कचऱ्याचे संकलन व अपसायकलिंग करण्यासाठी मुंबर्ठत सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री सावकारे यांचा संदेश प्रदर्शित करण्यात आला.

या उपक्रमाचा उद्देश वस्त्रकचऱ्याचे संकलन, पुनर्वापर आणि मूल्यवर्धन करून पर्यावरणपूरक व शाश्वत वस्त्रव्यवस्था निर्माण करणे हा आहे. ५ ते १२ जून या कालावधीत मुंबईभर वस्त्र संकलन मोहीम राबविण्यात येणार असून नागरिक, संस्था आणि विविध गटांना वापरलेले कपडे संकलन केंद्रांवर किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Featured post

Lakshvedhi