Monday, 18 May 2026

महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम · ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

 त्त 1714

महाराष्ट्रात मतदार याद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम

·         ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

 

मुंबई, दि १४ : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये 'विशेष सखोल पुनरिक्षण' (एसआयआर) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

 

‘बीएलओ’च्या प्रत्यक्ष घरांना भेटी

महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९,८६,४४,४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (बीएलओ) नियुक्त करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले 'बूथ लेव्हल एजंट्स' (बीएलए) त्यांना सहकार्य करणार आहेत.

 

जनगणनेच्या कामाशी सांगड

सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.

 

महाराष्ट्रासाठीचे महत्त्वाचे वेळापत्रक

२० ते २९ जून २०२६ या कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.

 

राजकीय पक्षांना आवाहन

भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (बीएलए) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार

आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

 आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

 

मुंबई, दि. 14 : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२६-२७ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३+१ (या व्यतीरीक्त वेंकटगिरी करिता २ जागा कॉन्सुलिंगच्या घेणेबाबत नमूद आहे.) च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर /सोलापूर/मुंबई/छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यांत येत आहेत.

 

त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. १०/०६/२०२६ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी कळविले आहे.

0000

आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

 आयआयएचटी बरगढ / वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरिता प्रवेश सूचना

 

मुंबई, दि. 14 : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील २०२६-२७ या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता १३+१ (या व्यतीरीक्त वेंकटगिरी करिता २ जागा कॉन्सुलिंगच्या घेणेबाबत नमूद आहे.) च्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्याकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर /सोलापूर/मुंबई/छत्रपती संभाजीनगर यांचे मार्फत विहीत नमुन्यात प्रवेश अर्ज १० जून २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत मागविण्यांत येत आहेत.

 

त्याअनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज दि. १०/०६/२०२६ पर्यंत संबंधीत प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग आयुक्तालयाकडे सादर करावे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे http.www.dirtexmah.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे. असे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने यांनी कळविले आहे.

0000

खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावीत

 खरीप हंगामासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत द्यावीत

 -पालक मंत्री नितेश राणे

 

मुंबई, दि. १४ : शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीविषयक मार्गदर्शन वेळेत उपलब्ध होण्यासाठी सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करावे तसेच खरीप हंगामात कोणत्याही प्रकारची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

 

मंत्रालयातील दालनातून दूरदृश्य प्रणालीद्वारे कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यातील खरीप हंगाम २०२६ संदर्भातील आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कृषी अधीक्षक तसेच संबंधित तीनही तालुक्यांतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी पालक मंत्री राणे यांनी हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली असल्याचा उल्लेख करत शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. कमी पावसाच्या परिस्थितीत घाईने पेरणी करू नये तसेच कृषी विभागाच्या सूचनांनुसारच पेरणी करावी, असे त्यांनी सांगितले.

 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागासह सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना देत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि कृषी औषधांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

 

जिल्ह्यात उपलब्ध असलेला खत व बियाण्यांचा साठा योग्य नियोजनाद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले. तसेच लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या समस्यांची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना देत अवकाळी पावसामुळे फळबागांचे नुकसान झाल्यास तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

 

पावसाचे प्रमाण, कृषी औषधांचा साठा, बियाण्यांची उपलब्धता, माती नमुने तपासणी तसेच खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा सविस्तर आढावा यावेळी त्यांनी घेतला.


महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ८,००० जणांना मिळणार रोजगार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार

 महाराष्ट्रात १.१४ लाख कोटींची गुंतवणूक; ,००० जणांना मिळणार रोजगार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग

आणि एएम इंटेलिजन्स लॅब यांच्यात सामंजस्य करार

 

मुंबई, दि.१४ : राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि 'एएम इंटेलिजन्स लॅब्ज प्रायव्हेट लिमिटेड' समवेत १ लाख १४ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार  आज झाला.

 

मुख्यमंत्री समिती कक्षात झालेल्या या कराराच्या वेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.पी. अन्बळगण, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, सहसचिव लक्ष्मीकांत ढोके, एएम इंटेलिजन्स लॅब्जचे अध्यक्ष अनिल चलमलाशेट्टी, संचालक मौर्य पायदा, उपाध्यक्ष पंकज कुमार आदी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे राज्यात तब्बल ८ हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे.

 

या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात (MMR) 'इंटिग्रेटेड ग्रीन डेटा सेंटर पार्क' आणि 'एआय कॉम्प्युट हब' उभारला जाणार आहे. यासाठी कंपनी १,१४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असेल, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षणही होईल.उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा ८ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, डेटा सायंटिस्ट आणि ऑपरेशन्स टीमचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे २ हजार अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

 

हा प्रकल्प ५०० मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये २,५०,००० उच्च क्षमतेचे 'एआय चिपसेट्स' वापरले जातील. तसेच या प्रकल्पाचा दोन टप्प्यांत विकास करण्यात येईल. २०० मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा सन २०२८ पर्यंत तर ३०० मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्यात येणार उद्दिष्ट आहे.

 

हा प्रकल्प राज्याच्या माहिती तंत्रज्ञान धोरण २०२३ तसेच हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क धोरण २०२४ अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात राष्ट्रीय व जागतिक स्तरावर अग्रस्थानी नेण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे.

Chief Minister Reviews Exhibition; Appreciates Innovations

 

Chief Minister Reviews Exhibition; Appreciates Innovations

Chief Minister Devendra Fadnavis also visited the exhibition of innovative projects and technologies set up under Pune Agri Hackathon-2026. He interacted directly with researchers and young entrepreneurs at various stalls, understood their concepts, appreciated their research, and encouraged them.

The Chief Minister took keen interest in projects related to modern agricultural technologies, AI-based solutions, smart irrigation systems, drone technology, soil testing, automated equipment, and other farmer-centric research initiatives. Appreciating the creativity of young innovators, he underlined the need for large-scale transformation in agriculture through technology.

He also observed the functioning of several devices and asked encouraging questions to researchers. After reviewing multiple projects, he noted that such initiatives are providing a major platform for youth in the state to pursue innovation and research in agriculture.

000


Winners and Runners-up Honoured by Chief Minister Devendra Fadnavis Across Nine Categories

 

Winners and Runners-up Honoured by Chief Minister Devendra Fadnavis Across Nine Categories

Soil Health and Management

  • Winner: Kisan Saathi
  • Runner-up: Nano Vita

Smart Water Management and Automation

  • Winner: IOH Engineers Group
  • Runner-up: Far More

Agricultural Mechanisation (Artificial Intelligence and Robotics)

  • Winner: Agritech Nexus
  • Runner-up: Team VNMKV

Agricultural Processing and Value Chain

  • Winner: Win Win Bites
  • Runner-up: SilkScan Innovators

Renewable Energy and Agricultural Waste Management

  • Winner: Proto Feeds
  • Runner-up: Eco Extract

Crop Protection and Pest Management

  • Winner: Smart Bio Delivery
  • Runner-up: Krishi Netra

Climate-Resilient and Digital Farming

  • Winner: Deep Ang Bot
  • Runner-up: Modern Village Future Innovations

Geospatial and GIS-Based Crop Survey System

  • Winner: Crop Gen AI
  • Runner-up: Green Minds

Artificial Intelligence for Smart Agricultural Administration

  • Winner: E-Pik Audit AI
  • Runner-up: Krishi Prabandh

Featured post

Lakshvedhi