Saturday, 16 May 2026

सर्वोत्कृष्ट गृह संकुल या गटात प्रधानमंत्री आवास योजना

 सर्वोत्कृष्ट गृह संकुल या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रथम- ग्रामपंचायत ससेगाव, ता. कुही, जि. नागपूर, द्वितीय- ग्रामपंचायत अंतरोळी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर, तृतीय- ग्रामपंचायत गंधाली, ता. अमळनेर- जि. जळगाव हे ठरले.राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम- ग्रामपंचायत आसखेड खु., ता. खेड, जि. पुणे हे ठरले.

 

सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत या गटात प्रधानमंत्री आवास

 सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत या गटात प्रधानमंत्री आवास ग्रामीणमध्ये प्रथम- ग्रामपंचायत धनेगाव, ता. जामखेड जि. अहिल्यानगर, द्वितीय- ग्रामपंचायत वर्धामनेरी, ता. आरवी जि. वर्धा, तृतीय -ग्रामपंचायत धेकवड, ता. जि. नंदुरबार हे ठरले. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम -ग्रामपंचायत राजुरी, ता. राहता जि. अहिल्यानगर, द्वितीय -ग्रामपंचायत वाकन, ता. पोलादपूर जि. रायगड, तृतीय- ग्रामपंचायत बेलोरा बु.,ता. अकोट, जि. अकोला हे ठरले.

 

सर्वोत्कृष्ट ज़िल्हे तालुका ग्रामपंचायत

 सर्वोत्कृष्ट जिल्हे या गटात प्रधानमंत्री आवास ग्रामीणमध्ये प्रथम- गोंदिया, द्वितीय -पालघर, तृतीय -अकोला हे जिल्हे ठरले. तर राज्य पुरस्कृत आवास योजना मध्ये प्रथम- नांदेड, द्वितीय- अमरावती, तृतीय- वर्धा हे जिल्हे ठरले.

 

सर्वोत्कृष्ट तालुके या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये प्रथम- तालुका पातुर, जि. अकेाला, द्वितीय -अहिल्यानगर जि, अहिल्यानगर, तृतीय -तालुका मौदा, जि. नागपूर. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम -तालुका शिरपूर, जि.धुळे, द्वितीय- ता. कारंजा, जि. वर्धा आणि विभागून ता. खेड जि. पुणे, तृतीय- ता. माहुर, जि. नांदेड हे तालुके ठरले.

 

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींच्या गटात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रथम- ग्रामपंचायत मन्नेवाडी, ता. पाटण, जि. सातारा आणि ग्रामपंचायत लिंब, ता.जि. सातारा,  द्वितीय- ग्रामपंचायत डोंगरगाव, ता. सावली, जि. चंद्रपूर, तृतीय -ग्रामपंचायत वाईगोळ, ता. मनोरा, जि. वाशीम हे ठरले.

 

राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम- ग्रामपंचायत अजनसरा, ता. हिंगणघाट, जि. वर्धा, द्वितीय- ग्रामपंचायत दिक्षी, ता. निपाड, जि. नाशिक, तृतीय -ग्रामपंचायत देपूल, ता. वाशिम, जि. वाशिम, ग्रामपंचायत बलवडी ता. खानापूर जि. सांगली हे ठरले.

पाच लाख घरकुलांचे लोकार्पण

 पाच लाख घरकुलांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. 8 हजार 368 कोटी रुपयांच्या निधी उपलब्धतेचा आदेश केंद्रीय मंत्री चौहान यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रदान केला. महाअवास अभियान गौरव गाथा, महाआवास त्रैमासिक या पुस्तिकेचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

या कार्यक्रमामध्ये   महाआवान अभियान 2023-2024 : राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात  प्रथम- कोकण, द्वितीय- नाशिक, तृतीय- नागपूर हे विभाग ठरले. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये प्रथम- नागपूर, द्वितीय- अमरावती, तृतीय- नाशिक हे विभाग ठरले.

 

देशातील प्रत्येक बेघर माणसाला हक्काचे पक्के घर

 ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, देशातील प्रत्येक बेघर माणसाला हक्काचे पक्के घर हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महाराष्ट्राला एका वर्षामध्ये 30 लाख घरांचे उद्दिष्ट दिले, या उद्दिष्टपूर्तीसाठी ग्राम विकास विभागाने 45 दिवसात 28 लाख घरांना मंजुरी दिली आणि एका वर्षात 5 लाख 8 हजार घरे बांधून देशात उच्चांक केला आहे. या कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पाठपुरवा महत्वाचा ठरला आहे. या वर्षी 15 लाख घरे पूर्ण करणार आहोत. ज्या 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांकडे जागा नव्हती त्यापैकी 1 लाख 81 हजार लाभार्थ्यांना दिनदयाळ उपाध्ययाय योजनेतून आणि गायरान/गावठान जमीनी देऊन जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उर्वरित भूमिहिन लाभार्थ्यांनाही जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. योजनेतील प्रत्येक घराला सौर ऊर्जेवर आणण्यात आले आहे. बांधकामासाठी 20 हजारांची वाळू उपलब्ध करुन दिली आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारला जात आहे यापैकी 13 जिल्ह्यामध्ये मंजुरीही देण्यात आली आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विक्री झाली आहे. 50 लाख महिलांना लखपती दिदी बनविण्याचे उद्दष्ट पूर्ण झाले असून आत्ता 1 कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून

 सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील बेघरांना हक्काची घरे मिळाली, त्याबद्दल त्यांनी राज्य व केंद्र सरकारचे आभार मानून  साताऱ्यातील साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. साखर कारखाने व ऊस उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर बैठक घ्यावी व सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहनही केले.

देशाचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी ‘एक देश एक निवडणूक

 देशाचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी ‘एक देश एक निवडणूक’ या तत्वानुसार सर्व राज्यांच्या विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक एकाच वेळी घेण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला सर्वांनी पाठिंबा द्यावा. संकटाच्या वेळेत देश म्हणून सर्वांनी एकत्र उभे रहावे, वेळोवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही आवाहन चौहान यांनी केले.

 

साताऱ्यासारख्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वितरण होणे आणि मुदतीपूर्वी घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट गाठणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे, असे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, आज  याठिकाणी 16 लाख  घरांचा दुसरा हप्ता दिला जात आहे, ज्यामुळे थांबलेल्या कामांना गती मिळेल.  सातारा हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा आहे. येथे अनेक सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांनी उभे केले आहेत. गेल्या चार वर्षांपासून 'एफआरपी'चे दर वाढत आहेत, जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले आहे; परंतु त्याचे लिंकिंग 'एमएसपी'शी (साखर विक्रीचा किमान दर) केलेले नाही. त्यामुळे साखर विक्रीचा किमान दर वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. जर केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवली, तर कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी देणे सोपे होईल, असे सांगून घरकुल उद्दिष्टांबद्दल आभार मानताना  ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नव्हती, त्यांना जागा घेण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत मदत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय मैलाचा दगड ठरला आहे, असेही ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi