Thursday, 14 May 2026

पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

 पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास

अजितदादा पवारयांचे नाव देण्यास शासनाची मान्यता

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. १३ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गायींच्या मौल्यवान व दुर्मिळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची व स्मृतीची जपणूक करण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रास अजितदादा पवार यांचे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

संवर्धन, पेशवे स्मारक ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, कासव संवर्धन, पेशवे स्मारक ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे, पर्यटनच्या ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे त्या कामांना निधी पर्यटन विभागाकडून देण्यात यावीत. केंद्र शासनाकडे स्वदेश दर्शन योजनेसाठी पर्यटन विभागाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पर्यटनाच्या कामांना निधीची मागणी करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करावेत.

0000

रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना

 मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, रायगड जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचा जिल्हा असून जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाची कामे गतीने करण्यात यावीत. प्रादेशिक पर्यटन मधील जी प्रलंबित कामे आहेत त्याची सद्यस्थिती काय आहे हे लक्षात घेवून पर्यटन विभागाने वित्त विभागाकडे जिथे निधीची आवश्यकता आहे त्याची मागणी करावी. पर्यटन विभागाची कामे करण्यासाठी उपलब्ध निधीतून कामांची प्राथमिकता लक्षात घेवून निधी देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. व स्टार गेझिंगचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेला पाठविण्यात येईल. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे निवासी न्याहारीचे नोंदणीचे कॅम्प आयोजित करण्यासाठी कार्यवाही करावी. स्वदेश दर्शन योजना प्रस्ताव लवकरात लवकर केंद्र शासनाकडे पाठवावा असे निर्देश त्यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील

 वृत्त 1691

रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील

-पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि.१३: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

           मेघदूत शासकीय निवासस्थान येथे रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामासंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार सुनिल तटकरे, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, पर्यटन संचालनालयचे उपसंचालक रविंद्र पवार यासह रायगड जिल्ह्याचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठकीला उपस्थित होते.

प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना

 प्रधानमंत्री पीक विमा योजना ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येत असून, पिकनिहाय अधिसूचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ, मंडळगट किंवा तालुका याप्रमाणे निर्धारित केलेल्या विमा क्षेत्रात राबविण्यात येते. सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या कार्यपद्धतीनुसार विमा संरक्षणाच्या बाबींसाठी योजनेंतर्गत खरीप व रब्बी हंगामाकरिता पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक आपत्ती किंवा पीक उत्पादनावर विपरित परिणाम करणाऱ्या इतर बाबींमुळे हंगामाच्या शेवटी पीक कापणी प्रयोग आधारे व तांत्रिक उत्पादनाच्या आधारे, महसूल मंडळामध्ये पिकाच्या उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देय असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

खरीप हंगाम २०२५ पासून राज्यात सुधारित पीक विमा

 खरीप हंगाम २०२५ पासून राज्यात सुधारित पीक विमा योजना ही केवळ पीक कापणी प्रयोगावर उत्पादन आधारित राबविण्यात येत आहे. परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी भारतीय कृषी विमा कंपनी यांचेमार्फत करण्यात येत आहे.तर लातूर जिल्ह्यात  आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड यांच्यामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे.

Featured post

Lakshvedhi