Friday, 17 April 2026

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनः' हा विकसित भारत

 भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषाभाषानृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होतेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनःहा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्यइतिहासवारसास्वातंत्र्यलढासंस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी 'म्हारो राजस्थानहे राजस्थानचे व 'बंदे उत्कल जननीहे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.    

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकरसमितीचे सदस्यपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली.  विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य  'केसरीचा बालमाया गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई  नृत्य   लोकगीतासह सादर केले.   

भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये

 मंत्री लोढा म्हणाले की, सिंगापूरच्या प्रगतीचे रहस्य त्यांच्या 'एज्युकेशनल रिफॉर्म्स' आणि 'स्किल डेव्हलपमेंट'मध्ये दडलेले आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा शिक्षण आणि तंत्रज्ञान आहे. सिंगापूरमध्ये जिथे केवळ २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून संपूर्ण अर्थव्यवस्थेला गती देणारे प्रकल्प उभे राहतात. तिथे १०० टक्के रोजगाराची हमी दिली जाते. आपल्यालाही महाराष्ट्रात हेच 'सिंगापूर मॉडेल' कौशल्य विकासाच्या माध्यमातून आणायचे आहे.

यावेळी आयडिशेन कॉम्पिटिशन सहित विविध स्पर्धातील विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. राजेश तलवारे यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत, 'सर्वोत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.     

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर

 मंत्री लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण नवीन शैक्षणिक धोरणातून 'कौशल्यावर आधारितशिक्षण देत आहोत. राज्यात मुख्यमंत्री महाफंड योजनेअंतर्गत तीन टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेतून राज्यात २ लाख उद्योजक  घडविणार आहोत आणि ५० हजार स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे.निवडक स्टार्टअप्सना सरकारकडून आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. राज्यातील ४१७ आयटीआयमध्ये मुख्यमंत्री महाफंड योजनेतून उद्योजक घडविण्यासाठी आयटीआयजवळ जागा उपलब्ध करून दिली जाईल. प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक कामाला सन्मान यामुळे मिळेल.आपण एक कुटुंब आहोतविद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शासन पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी उभे आहे असेही ते म्हणाले

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी होणार -

 रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा ५० ठिकाणी होणार

-         मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १७ : सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली.

            एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याप्रसंगी मंत्री लोढा बोलत होते. या कार्यक्रमाला रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलराज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनीराज्य नाविन्यता सोसायटीचे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकांत पाटील, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सुर्यवंशीआयुषचे नॅशनल रिसर्च प्रोफेसर प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 महाराष्ट्र लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिन साजरा

 मुंबई, दि. 17 : महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत शुक्रवारी लोकभवन येथे राजस्थान आणि ओडिशा राज्यांचा राज्य स्थापना दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने सादर करण्यात आला.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राजस्थान व ओडिशा राज्यांच्या लोकगीत व नृत्याला राज्यपालांनी शाबासकी दिली.  विद्यार्थ्यांनी राजस्थानचे चरी नृत्य  'केसरीचा बालमाया गीतासह सादर केले तसेच ओडिशाचे संबलपुरी ढलकाई  नृत्य   लोकगीतासह सादर केले.   

भारत सरकारच्या 'एक भारत श्रेष्ठ भारतउपक्रमाचा भाग म्हणून राजस्थान आणि ओडिशा राज्य स्थापना दिवस लोकभवन येथे आयोजित करण्यात आला होता.

भारतातील प्रत्येक राज्याची वेशभूषाभाषानृत्य व खाद्य संस्कृती वेगळी आहे. ही विविधता हीच देशाची शक्ती आहे. संपूर्ण देश फुलांच्या हराप्रमाणे एका सांस्कृतिक धाग्याने बांधला आहे. 'एक भारत श्रेष्ठ भारतया उपक्रमामुळे प्रत्येक राज्याला इतर राज्यांची संस्कृती समजण्यास मदत होतेअसे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विकसित भारत म्हणजे केवळ आर्थिक दृष्टीने समृद्ध भारत असे नसून 'सर्वे भवन्तु सुखिनःहा विकसित भारत या संकल्पनेमागील विचार असल्याचे राज्यपालांनी सांगितले. शासन आणि समाजाने खांद्याला खांदा लावून काम केल्यास विकसित भारत निश्चितपणे साकार होईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी दोन्ही राज्यांचे सौंदर्यइतिहासवारसास्वातंत्र्यलढासंस्कृती आणि पर्यटन स्थळे दर्शविणारे माहितीपट दाखवण्यात आले. यावेळी 'म्हारो राजस्थानहे राजस्थानचे व 'बंदे उत्कल जननीहे ओडिशाचे राज्यगीत ऐकविण्यात आले.    

कार्यक्रमाला मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरोडकरसमितीचे सदस्यपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शिक्षण) डॉ.अविनाश ढाकणेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ निशिकांत देशपांडे व पालिकेच्या उपायुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर उपस्थित होते. 

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी स्वागतपर भाषण केले तर अवर सचिव (प्रशासन) करुणा वावडणकर यांनी आभार प्रदर्शन केले.

००००

दिलखुलास’,‘जय महाराष्ट्र’मध्ये आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत ‘सुपोषित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी आसीडीएस योजनांचे महत्त्व अधोरेखित

 दिलखुलास,जय महाराष्ट्रमध्ये

 आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत

सुपोषित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी आसीडीएस योजनांचे महत्त्व अधोरेखित

मुंबईदि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएसयोजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत राज्यातील महिला व बालकांच्या आरोग्यपोषण आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, 18, सोमवार, 20, मंगळवार, 21 आणि बुधवार, 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएसयोजना ही देशातील सर्वात महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना असूनबालकांचे पोषण व आरोग्य सुधारणापूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती व स्तनदा मातांची काळजी घेणे ही तिची प्रमुख उद्दिष्टे आहेत. राज्यातील गरजू महिला व बालकांसाठी टेक होम रेशन (टीएचआर), गरम ताजा आहारडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनाप्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि पाळणाघर (क्रेच) योजना यासारख्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 कुपोषणमुक्त महाराष्ट्र’ राष्ट्रीय पोषण सप्ताह आणि सुवर्णमयी 1000 दिवस’ उपक्रमअतीतीव्र (एसएएमव मध्यम (एमएएमकुपोषण तसेच महिलांमधील ॲनिमिया कमी करण्यासाठी विभागाने निश्चित उद्दिष्टे ठरवून त्यानुसार प्रभावी उपाययोजना याशिवाय पोषण भी पढाई भी’, ‘आनंदी बालशिक्षण’, ‘जादुई पिटारा’ आणि खेळणी-आधारित अध्यापनशास्त्र या प्रशिक्षण उपक्रमांमुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला कशा प्रकारे चालना देण्यात येत आहे आणि या उपक्रमांची अंमलबजाणी कशा प्रकारे करण्यात येत आहेयाबाबत आयुक्त सरदेशमुख यांनी 'दिलखुलासआणि 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

Featured post

Lakshvedhi