Wednesday, 15 April 2026

प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगती, निधी वितरण, मनुष्यबळ

 या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगतीनिधी वितरणमनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई  करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री  मुश्रीफ यांनी दिले.

 

रुग्णालयीन सुविधाआधुनिक वैद्यकीय उपकरणेविद्यार्थी वसतिगृहे आणि प्राध्यापकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा यांची उभारणी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पांच्या पूर्णत्वानंतर संबंधित भागातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध होतीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

बैठकीस वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारीवैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव संदीप ढाकणे उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृश्य  प्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी

  

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांना गती द्यावी

-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

·         अलिबागनंदुरबारगोंदियासातारासिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामांचा आढावा

 

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या अलिबागनंदुरबारगोंदियासातारा आणि सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांच्या प्रगतीचा  सविस्तर आढावा मंत्रालयामध्ये दूरदृष्य प्रणालीद्वारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला.

 

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कीराज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी ही वैद्यकीय महाविद्यालये अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे सर्व कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी.

 

या बैठकीत प्रत्येक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या बांधकामांची प्रगतीनिधी वितरणमनुष्यबळ नियोजन तसेच आवश्यक सुविधा उभारणी यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी कामांना गती मिळाली असली तरी काही प्रकल्पांबाबत तातडीने सुधारात्मक उपाययोजना राबवण्याचे आदेश मंत्री मुश्रीफ यांनी दिले.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास होत असलेल्या दिरंगाई बद्दल संबंधित कंत्राटदारांवर योग्य ती कारवाई  करण्याचे निर्देशही वैद्यकीय शिक्षण मंत्री  मुश्रीफ यांनी दिले.

जपानी मेंदूजवरनियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना,जनतेला आवाहन

 नियंत्रणासाठी व्यापक उपाययोजना

राज्यात नियमित लसीकरणविशेष मोहिमारक्त नमुना तपासणीडास नियंत्रणासाठी धूरफवारणीक्यूलेक्स डासांचे सर्वेक्षणजनजागृतीडासांच्या उत्पत्तीस्थळांवर गप्पी मासे सोडणे तसेच स्वच्छता मोहिमा राबविण्यात येत आहेत.

 

जनतेला आवाहन

जपानी मेंदूज्वर हा आजार विशेषतः लहान मुलांसाठी धोकादायक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावेडासांपासून संरक्षण करावे आणि ताप किंवा मेंदूशी संबंधित लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावाअसे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी उपचार सुविधा,

 निदान व उपचार सुविधा

राज्यात जपानी मेंदूज्वराच्या निदानासाठी नागपूरगडचिरोलीसेवाग्राम (वर्धा)भंडारा आणि गोंदिया येथे पाच सेंटीनेल केंद्रे कार्यरत आहेत. तसेच १६ जिल्ह्यांमध्ये बाल अतिदक्षता विभाग (PICU) सुरू असून रुग्णांना आवश्यक उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

 

विदर्भ भाग सर्वाधिक संवेदनशील

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार विदर्भ हा जपानी मेंदूज्वरासाठी सर्वाधिक संवेदनशील भाग आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात डासांची वाढतसेच डुक्कर व पक्ष्यांच्या संपर्कामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. काही शहरी व उपनगरी भागातही साथीचा धोका संभवतो.

जपाणी मेंदूजवर राज्यातील सद्यस्थिती लसीकरण मोहिमेची प्रगती

 राज्यातील सद्यस्थिती

राज्यात २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत रुग्णसंख्या तुलनेने कमी असली तरी काही जिल्ह्यांमध्ये काही प्रकरणे आढळली आहेत. २०२२ मध्ये २ रुग्ण२०२३ मध्ये ५ रुग्ण२०२४ मध्ये ५ रुग्ण व २ मृत्यू२०२५ मध्ये ७ रुग्ण व १ मृत्यू नोंदविण्यात आलेतर २०२६ च्या मार्चपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. नागपूरभंडाराचंद्रपूर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने रुग्ण आढळले आहेत.

 

लसीकरण मोहिमेची प्रगती

एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान लसीकरण मोहिमेत राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. पहिल्या डोसचे एकूण कव्हरेज ८९.२६ टक्के तर दुसऱ्या डोसचे ७८.६८ टक्के आहे. धाराशिव (९९.५९ टक्के)लातूर (९७.८४ टक्के) आणि सोलापूर (९५ टक्के पेक्षा जास्त) जिल्ह्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र रायगड ५५ टक्के पहिला डोस व ४८ टक्के दुसरा डोसपुणे आणि पीसीएमसी भागात दुसऱ्या डोसचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे दिसून आले आहे.

जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका

 जपानी मेंदूज्वराची वैशिष्ट्ये आणि धोका

महाराष्ट्रात जपानी मेंदूज्वर या आजाराबाबत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून लसीकरण व नियंत्रण उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. हा आजार प्रामुख्याने डासांद्वारे पसरतो आणि मेंदूवर परिणाम करून गंभीर गुंतागुंतझटके तसेच मृत्यू होण्याची शक्यता निर्माण करतो. या आजाराचा मृत्यूदर जास्त असून वाचलेल्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात.

 

जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग

 जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क;

लसीकरण मोहिमेला वेग

 -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबईदि. १ : जपानी मेंदूज्वरासारख्या संसर्गजन्य आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनालसीकरण आणि जनजागृती यावर विशेष भर दिला जात आहे. जपानी मेंदूज्वर  आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासन सतर्क असून लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी समन्वयाने काम करून या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. २०१५-१६ दरम्यान देशातील इतर राज्यांत जपानी मेंदूज्वरावरील लसीकरण मोहीम सुरू झाली होती. याच दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी मेंदूज्वराचे रुग्ण आढळले. मात्रमहाराष्ट्रात त्याची सुरुवात झाली नव्हती. ही बाब तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली. त्यांनी त्यावेळी केंद्र सरकाराला विशेष विनंती केली आणि जपानी मेंदूज्वर आजारांवरील लसीकरण मोहीमेला राज्यात सुरुवात केली. या प्रयत्नांमुळे आज रुग्णसंख्या जवळपास शून्यावर आली आहे.

Featured post

Lakshvedhi