Tuesday, 14 April 2026

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

 

राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

मुंबईतील 12 अग्निशमन अधिकारी,जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान

 

मुंबईदि. 14:- राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुंबई अग्निशमन दलएमआयडीसी व महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील 12 अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले.

            गेल्या काही दशकांत अग्निशमन दलासमोरील आव्हाने अनेक पटींनी वाढली आहेत. नागरीकरणउंच इमारतीभूमिगत व भुयारी मेट्रोतसेच वाढते औद्योगिक क्षेत्र यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे स्वरूप गुंतागुंतीचे झाले आहे. मोठाली गोदामे आणि डेटा सेंटर्स ही काळाची गरज झाली आहेत. त्यामुळे औद्योगिक आगींपासून ते अत्याधुनिक डेटा सेंटर्स संबंधित आगीपर्यंत विविध प्रकारच्या आव्हानांना अग्निशमन दलांना सामोरे जावे लागत आहेअसे राज्यपालांनी सांगितले.

            अग्निशमन सेवा केवळ आग विझविण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधाऔद्योगिक संपत्ती आणि सार्वजनिक ठिकाणांचे संरक्षण करणे ही देखील तिची जबाबदारी झाली आहेअसे ते म्हणाले.

            अलीकडच्या काळात गॅस व रासायनिक आगीतसेच ई-कार्स आणि इतर विद्युत उपकरणांमधील लिथियम-आयन बॅटरीमुळे आगींच्या घटना घडल्या आहेत. आग प्रतिबंधशोध आणि कारणांचे विश्लेषण आदी क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक आहेअसे राज्यपालांनी सांगितले. बदलत्या परिस्थितीत अग्निशमन सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौशल्य वर्धनप्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सातत्याने अद्ययावत करणे गरजेचे आहेअसे त्यांनी सांगितले.

अभी न जा ओ chodke


 

आशा भोसले, एक दुर्मिक फोटो pl share

 


व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार

 व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि सबंध वृद्धिंगत करणार-

राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 13 :- महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगांसाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूकव्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईलअसे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्वांग बिएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

 

मंत्री जयकुमार रावल म्हणालेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या मार्गदर्शानाखाली शासन गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य सुरळीत पार पडावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. हे सहकार्य महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील परस्पर विश्वास व समान आर्थिक दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या बळावर समृद्धीच्या नव्या पर्वाची आम्ही अपेक्षा करतोअसे त्यांनी सांगितले.

 

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत

 जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत

-     

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोनचलनव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. तसेच गोल्ड स्टँडर्ड’ आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ रुपी’ या प्रबंधातून रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला.  १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्त्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.


जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत

 जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत     

 

दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबईदि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचितपीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मानसमान संधीन्यायाचा मार्ग मिळाला आहे.   संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहेअसे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारविधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढासांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलारमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेमहापौर रितू तावडे उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणालेस्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षणसंपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असूनया निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावाअसे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1मे पासून मराठीभाषा आवश्यक

 परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी 1मे पासून मराठीभाषा आवश्यक

 


 

मुंबईदि. 14 एप्रिल : येत्या 1 मेमहाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या 59 प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येते कायाची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतीलअशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले कीमोटार परिवहन विभागामार्फत रिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचेम्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणेहा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्रमुंबई महानगर क्षेत्रछत्रपती संभाजीनगरनागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाहीतसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतातअशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.

मंत्री सरनाईक म्हणाले कीज्या प्रदेशात आपण राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहेतितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे असल्याचेही ते म्हाणाले.

म्हणूनच 1 मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता येणे व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईलअसेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

Featured post

Lakshvedhi