Friday, 10 April 2026

व्यापार, पर्यटन, शहरीकरण, पर्यावरण आणि तटीय संपर्क’ या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा

 परिषदेत व्यापारपर्यटनशहरीकरणपर्यावरण आणि तटीय संपर्क’ या महत्त्वाच्या विषयांवरही सखोल चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुजरातमहाराष्ट्र आणि गोवा या तिन्ही राज्यांचा विस्तृत सागरी किनारा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, ‘ब्लू इकॉनॉमी’ मजबूत करताना मच्छीमार समुदायाचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, ‘सर्क्युलर टुरिझम सर्किट’ सारख्या संयुक्त पर्यटन उपक्रमांमुळे राज्यांमध्ये आर्थिक सहकार्य वाढू शकतेअसेही त्यांनी नमूद केले. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईअहमदाबाद आणि पणजी यांसारखी शहरे स्मार्ट’ बरोबरच संवेदनशील’ आणि 'पर्यावरणपूरकबनविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

ही परिषद म्हणजे केवळ औपचारिक संवाद नसून एक सामूहिक संकल्प आहे.  सन - २०४७ च्या स्वर्णिम भारत’ निर्मितीत विभाग - 7 चा मोलाचा वाटा राहिलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेमुळे तिन्ही राज्यांच्या विधिमंडळांमध्ये नव्या कल्पनाधोरणे आणि सहकार्याचा नवा अध्याय सुरू होईलअशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते आणि या उपक्रमातून घडलेले विद्यार्थी आज विधिमंडळात

 सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले कीलखनऊ येथे झालेल्या पीठासीन अधिकारी परिषदेत या विभाग परिषद उपक्रमाची बीजे रोवली गेली आणि आज ती प्रत्यक्षात साकारली आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील राष्ट्रीय ध्येयाच्या पूर्ततेत युवा विधिमंडळ सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. नागपूर हिवाळी अधिवेशन कालावधीत आयोजित केल्या जाणाऱ्या संसदीय अभ्यासवर्ग’ उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले कीया माध्यमातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते आणि या उपक्रमातून घडलेले विद्यार्थी आज विधिमंडळात प्रतिनिधित्व करत आहेत. विधिमंडळ कामकाजातील युवा सदस्यांच्या सहभागाचे महत्व स्पष्ट करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उल्लेखनीय योगदान सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधोरेखीत केले.

पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती

 पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती

- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबईदि. 9 : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे घोंगरी येथील 86.08 हेक्टर शासकीय जमिनीवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात येईलअसे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

 

उद्योगमंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. बैठकीस मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड तसेच एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत म्हणाले या प्रस्तावित क्षेत्राची प्राथमिक स्थळ पाहणी 26 डिसेंबर 2023 रोजी करण्यात आली होती. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील भूमी निवड समितीमार्फत 19 ऑगस्ट 2024 रोजी सविस्तर स्थळपाहणी करण्यात आली. त्यानंतर 86.08 हेक्टर ई-श्रेणी शासकीय जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी योग्य असल्याचे निष्पन्न झाले.

 

विखरन येथील 250 मे.वॅ. सौर प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र ‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार

  

विखरन येथील 250 मे.वॅ. सौर प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र

‘एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार

- उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

 

मुंबईदि. 9 : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी उर्वरित क्षेत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास गती देण्यात द्यावीअसे निर्देश उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी दिले.

 

उद्योग मंत्री डॉ.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात झाली. बैठकीस पणन व रोजगार हमी मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावलमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.वेलारासुसहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगेउद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवारमहाजनकोचे संबंधित अधिकारी तसेच मे. टी.पी. कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

या बैठकीत सुमारे 1350 एकर एकूण क्षेत्रांपैकी अंदाजे 400 ते 500 एकर जमीन महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाकडे हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) च्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रस्तावावरील तांत्रिक व प्रशासकीय बाबींचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश डॉ.सामंत यांनी दिले.

संत वामनभाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज महंत विठ्ठल महाराज यांच्या

 पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्यागहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह कायमस्वरूपी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यजमानपदाखाली व्हावा व त्यांनी गडाचे पालकत्व घ्यावेदिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देतत्यांच्या विचारांवर आपण काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

आमदार धनंजय मुंडे म्हणाले कीसंत वामनभाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आज महंत विठ्ठल महाराज यांच्या जन्मगावी होत आहेहा योगायोग विशेष आहे.

 

दरम्यानआमदार सुरेश धस यांनी नगर-बीड महामार्गाच्या कामासाठी भरीव निधीची मागणी करतया रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. नारळी सप्ताह कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

0000

गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध

 गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी कटिबद्ध

 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         लाखो भाविकांच्या उपस्थितीत नारळी सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न

 

बीड दि. 9 : म्हसोबावाडी (ता. आष्टीजि. बीड) येथे पार पडलेल्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या ९४ व्या नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका मांडलीमी येथे मुख्यमंत्री म्हणून नाहीतर गहिनीनाथ महाराजांचा अनुयायी म्हणून नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. गडाच्या विकासासाठी रस्ता असो वा अन्य कोणताही प्रश्नतो सोडविण्यास मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

संत वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या या परंपरेचा समारोप गुरुवारी (दि. ९) काल्याच्या कीर्तनाने झाला. यावेळी गहिनीनाथ गडाचे विठ्ठल महाराजपर्यावरण मंत्री पंकजा मुंडेआमदार सुरेश धसआमदार धनंजय मुंडेमाजी आमदार भीमराव धोंडेमाजी आमदार साहेबराव दरेकरमाजी मंत्री जयदत्त क्षीरसागरबाळासाहेब आजबेप्रताप ढाकणेसरपंच शिवा शेकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा

 सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुल

भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.

Featured post

Lakshvedhi