नदीच्या प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडले
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेणार
- मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 23 : नदीच्या नैसर्गिक पाणी प्रवाहामध्ये प्रक्रिया न करता शहरातील सांडपाणी सोडल्याने शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकावर दंडात्मक कारवाईसाठी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत दिली.
हवेली तालुक्यातील नदी तीरावरील शेतीला दूषित पाणी मिळत असल्यासंदर्भात आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले.