Saturday, 14 February 2026

सहकार भवनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता

 सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर म्हणाले, सहकार भवनच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता व प्रशासकीय मंजुरीच्या प्रस्तावांबाबत जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी. सहकार भवनच्या माध्यमातून जिल्हास्तरावर सहकारी संस्थांना एकाच छताखाली कार्यालयीन सुविधा आणि समन्वयासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

नियोजित आराखड्यानुसार आणि निश्चित वेळापत्रकानुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा

 राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा

-सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबईदि. १३ : सहकार क्षेत्रातील विविध संस्थांना एकत्रित व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहकार भवनची उभारणी महत्त्वाची आहे. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बांधकामाधीन तसेच प्रस्तावित सहकार भवनाची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी दिले. याबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी जागा उपलब्धतेबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

सहकार राज्यमंत्री डॉ .भोयर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात विविध जिल्ह्यात बांधकामाधीन व प्रस्तावित सहकार भवनसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस सहकार व सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग

 राज्यभर पाणंद रस्त्यांची कामे सुरळीतपणे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि. सुरक्षितरित्या पोहोचवता येईल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच गावांच्या दळणवळण व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल. मातोश्री ग्रामसमृद्धी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू

 राज्यात मागील काही महिन्यांपासून एका गावात दहापेक्षा अधिक कामे सुरू करण्यास मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची कामे प्रलंबित होती. या पार्श्वभूमीवर  रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी पाणंद रस्त्यांच्या कामांना तातडीने गती देण्यास होकार दर्शवला असून राज्यात लागू असलेली मर्यादा लवकरच पूर्णपणे उठवली जाईलअसे आश्वासन यावेळी  दिले.

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा दहा कामांची मर्यादा हटणार

 ‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

दहा कामांची मर्यादा हटणार

            नवी दिल्ली दि. 13-ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली 'दहा कामांची मर्यादाआता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असूनयामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले.

पशुपालन हा व्यवसाय उद्योगात रुपांतरीत व्हावा

 पशुपालन हा व्यवसाय उद्योगात रुपांतरीत व्हावा यासाठी शासन पुढाकार घेत असून, विभागाचा कार्यभार स्वीकारल्यावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीसोबत परळी येथील पशु महाविद्यालय मंजूर करुन घेतले. असे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या पशू प्रदर्शनात देशातील विविध भागातील पशुधन येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या ठिकाणी देशातली सर्वात छोटी गाय तसेच विविध प्रजातींच्या गायीबैलघोडे आणि बकरे यांच्यासह विविध पक्षी विस्तीर्ण दालनांमध्ये आहेत. पशुपालन तंत्रात आलेले नवे बदल तसेच उत्पादकता वाढवणारी आणि पशुंवर उपचार करणारी औषधही या ठिकाणी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शपर व्याख्याने होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी येत असल्याचेही पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi