मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील प्रत्येक कुटुंबासाठी आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि उपजीविका सुधारणे याला शासनाचे प्राधान्य आहे. या भागीदारींमुळे विविध कल्याणकारी शासकीय योजना अधिक लोकोपयोगी होण्यास मदत होणार आहे. शासनाच्या योजना लोक चळवळीच्या स्वरूपात पुढे येत आहे. टाटा ट्रस्टचे सहकार्याने विविध विभागांच्या माध्यमातून सकारात्मक प्रभाव पाडण्यात यशस्वी होऊ. समाजातील सर्व घटकात उत्पन्न वाढून जगण्याचा स्तर उंचावण्यास यामुळे निश्चितच मदत होईल. दुर्धर आजारांवर महागड्या उपचार पद्धतीमुळे सामान्य नागरिकांना मर्यादा येतात मात्र राज्यात यापुढे उपचाराविना कुणीही मृत्यू पावणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करण्यात येत आहे. टाटांची मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत असून यामुळे आपण गरजू रुग्णांना निश्चित स्वरूपाची मदत देऊ शकतो.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 12 February 2026
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन
स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबतच्या करारांमुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास महाराष्ट्रभर पोहोचविणार
• टाटा ट्रस्ट सोबत १२ व नाम फाउंडेशन सोबत एक सामंजस्य करार
मुंबई, १२ : महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत करण्यात आलेल्या करारावेळी व्यक्त केला. टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन सोबत झालेल्या करारामळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहचविणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक
नवीन कामगार संहितेच्या नियमांमध्ये
सिने कलाकारांसाठी तरतुदी समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक
- कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
मुंबई, दि. ११ : नवीन कामगार संहिता केंद्र शासनाकडून तयार करण्यात आली असून, सदर संहितेअंतर्गत नियमावली तयार करण्यात येत आहे. नियमावलीची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापूर्वी जनतेकडून सूचना व हरकती मागविण्यात येणार असल्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले.
सद्यस्थितीत सिने क्षेत्रातील कलाकारांसाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांबाबत नवीन कामगार संहितेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या नियमांमध्ये तरतूदी करण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम-पाटील, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लो यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी महिला सशक्तीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची प्रभावी व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यावर भर दिला. आदिशक्ती अभियानाचा मुख्य उद्देश महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे, त्यांची सुरक्षितता, स्वावलंबन व आत्मविश्वास वाढविणे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचविणे असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानामुळे महिलांचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील सहभाग अधिक बळकट होणार असून त्यासाठी ग्राम पातळीपासून राज्यस्तरापर्यंत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अभियानाची अंमलबजावणी गांभीर्याने करावी तसेच ठरविण्यात आलेल्या उद्दिष्टांची वेळेत पूर्तता करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा · सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना
आदिशक्ती अभियानाचा महिला व बाल विकास
मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून आढावा
· सर्व ग्रामपंचायतींनी शंभर टक्के सहभाग घेण्याच्या सूचना
मुंबई, दि. ११ : आदिशक्ती अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व राज्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत त्यांनी आदिशक्ती अभियानाच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस सचिव डॉ. अनुप कुमार यादव, आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कैलास पगारे, राज्य महिला आयोगाचे सचिव नंदिनी आवडे, विभागाचे सहसचिव विलास ठाकूर व उपसचिव आनंद भोंडवे उपस्थित होते. उपायुक्त जामसिंग गिरासे यांनी सादरीकरण केले. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रमाधिकारी व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऑनलाईन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.
पशुप्रदर्शन ऐतिहासिक
पशुप्रदर्शन ऐतिहासिक
या प्रदर्शनात पशुपालकांना गायी, म्हशी, घोडे, शेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळणार आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालन, आहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.
मुख्यमंत्री १५ ऐवजी १४ तारखेला परळीत
मुख्यमंत्री १५ ऐवजी १४ तारखेला परळीत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदर्शनाच्या समारोपाला म्हणजे रविवारी १५ तारखेला येणार होते, परंतु ते आता शनिवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वा. येणार आहेत.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...