Tuesday, 10 February 2026

जीपीआर 2.0’ च्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणांची तर्कशुद्ध व एकात्मिक

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘जीपीआर 2.0’ च्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणांची तर्कशुद्ध व एकात्मिक स्वरूपात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून सर्व विभागांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दुसरा टप्पा 1 मे 2026 पर्यंत पूर्ण होणार असून या सुधारणा अंमलात आल्यानंतर नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभजलद व पारदर्शक पद्धतीने मिळतील यासाठी सर्वंकष काम करण्याची आवश्यकता आहे.

राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा

 राज्यातील प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

•          प्रशासकीय सुधारणांचा जीपीआर 2.0’ उपक्रम

•       प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले महाराष्ट्राचे कौतुक

 

मुंबईदि. 9 :- राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने व प्रभावीपणे काम करावेअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय सुधारणांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस राज्यमंत्री डॉ. पंकज भोमुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिवप्रधान सचिव व सचिव उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागामार्फत जीपीआर 2.0’ उपक्रमाच्या टप्पा एक व टप्पा दोनबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा

 स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसूनती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापरइंधन बचतवृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरितसुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणेही काळाची गरज आहे.


स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा

 स्वच्छ पर्यावरण हा केवळ सरकारचा किंवा एखाद्या संस्थेचा विषय नसूनती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येक स्तरावर घेतलेले छोटे निर्णय उद्याच्या मोठ्या संकटांना टाळू शकतात. पर्यायी ऊर्जेचा वापरइंधन बचतवृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक सवयी अंगीकारल्यास हरितसुरक्षित आणि समृद्ध भविष्यासाठी आपण भक्कम पायाभरणी करू शकतो. हीच खरी ऊर्जा क्रांती असून तिच्यात आपण सर्वांनी सहभागी होणेही काळाची गरज आहे.

घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता

 घरगुती पातळीवरही स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढवता येऊ शकतो. सौर पॅनल्सद्वारे वीज निर्मितीबायोगॅस प्रकल्पऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा वापर आणि विजेचा अपव्यय टाळणे या छोट्या गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. शाश्वत जीवनशैली स्वीकारणे म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हेतर पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित भविष्य घडवण्याच्या दृष्टीने या ऊर्जा क्रांतिकडे पाहायला हवे.

या दिशेने केंद्र व राज्य सरकारांकडून विविध अभियानांद्वारे जनजागृती केली जात आहे. सक्षमसारख्या मोहिमा नागरिकांना पर्यायी इंधनांचा स्वीकार करण्यासाठी प्रेरित करत आहेत. उद्योग क्षेत्रतसेच शहरे आणि ग्रामीण भागातही हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जात आहेत. यामध्ये संशोधननवतंत्रज्ञान आणि स्थानिक सहभाग आदिला विशेष महत्त्व दिले जात आहे.

कोळसा, पेट्रोल, डिझेल यासारखी पारंपरिक इंधने मर्यादित

 कोळसापेट्रोलडिझेल यासारखी पारंपरिक इंधने मर्यादित स्वरूपाची आहेत. त्यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइडकार्बन मोनॉक्साइड आणि इतर घातक वायू वातावरणात मिसळतात. यामुळे जागतिक तापमानवाढहवामानातील टोकाचे बदलपावसाचे असमतोल स्वरूप तसेच आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. श्वसनविकारहृदयविकार आणि त्वचारोग यांसारखे आजार याच प्रदूषणाशी थेट जोडलेले आहेत. यावर उपाय म्हणून नवी ऊर्जा क्रांती आकार घेत आहे. सौर ऊर्जापवन ऊर्जाजलविद्युतबायोगॅसबायो-इंधन आणि हरित हायड्रोजन यांसारखे पर्याय आज प्रभावीपणे पुढे येत आहेत. या ऊर्जास्रोतांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजेते अक्षय आहेत आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवतात.

 आणि पवन ऊर्जा निर्मितीमुळे इंधन आयातीवरील खर्च कमी होऊन देशाची आर्थिक बचतही होते. ऊसाच्या चिपाडापासून बनविल्या जाणाऱ्या इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाकडेही आपला देश गांभीर्याने पाहू लागला आहे.

स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!

 स्वच्छ पर्यावरणासाठी सक्षम अभियानाचा संकल्प!

             भारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितताशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ हे राष्ट्रीय अभियान १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (तेल आणि गॅस वाचवाहरित ऊर्जा स्वीकारा) या घोषवाक्यासह संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे त्यानिमित्त...

             जागतिक पातळीवर वेगाने बदलणाऱ्या हवामानामुळे आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवासमोर आज मोठे आव्हान उभे राहिले आहे. पारंपरिक इंधनांचा वापर दिवसागणिक वाढत गेल्याने निसर्गावर मोठा ताण पडत असूनत्याचे दुष्परिणाम आरोग्यपर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर ठळकपणे दिसू लागले आहेत. भविष्यात हे संकट आणखी भयावह होवू नये यासाठी समाजाने स्वच्छशाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे प्राधान्याने वळणेही काळाची गरज बनली आहे.

Featured post

Lakshvedhi