Thursday, 5 February 2026

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील

 कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणालेनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या टप्प्यात शाश्वत व हवामान परिणामांना सक्षमपणे सामोरे जाणाऱ्या शेतीला अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात यावा. जो शेतकरी केवळ शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून असतो अशा शेतकऱ्यास  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मधील विविध योजनेचा लाभ मिळवून देउन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. या योजनेच्या लाभापासून मूळ लाभार्थी वंचित रहाणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

 

हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

 हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० प्रभावीपणे राबवावा

-कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

 

मुंबईदि. ४: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० मुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० योजना योजना विभागाने प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावीअसे निर्देश कृषीवित्त व नियोजनमदत व पुनर्वसनकामगार आणि विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले.

 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी कार्यालयाच्या सभागृहात कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० चा आढावा  घेतला. यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंहकृषी विभागाचे उप सचिव श्री. चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Accident on Yashwantrao Chavan Expressway

 

Accident on Yashwantrao Chavan Expressway

MSRDC Immediately Activates Emergency Response Plan (ERP)

• Drinking water and biscuits distributed to commuters stranded in traffic
• Expert team completely stops gas leakage at two points; third leak largely brought under control

Mumbai, February 4: Following information about the accident on the Yashwantrao Chavan Expressway, the Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) immediately activated its Emergency Response Plan (ERP), MSRDC informed.

Drinking water and biscuits were distributed to passengers stranded in traffic through IRB MPPL. Considering the inconvenience faced by commuters, temporary toll-free entry and exit facilities were provided at the concerned toll plazas.

carriageway will be restored

On February 4, 2026, a team of chemical experts completely stopped gas leakage at two locations on the tanker, while the third leakage has also been largely brought under control. At 5:00 pm, the process of transferring gas from the damaged tanker into a safe tanker was initiated. After completion of this process, the accident-hit tanker will be removed and traffic on the Mumbai-bound carriageway will be restored, MSRDC said.

The incident occurred on February 3, 2026, at around 5:00 pm at Km 41/200 on the Mumbai-bound carriageway of the Yashwantrao Chavan Expressway, near the Adoshi tunnel (Bor Ghat section), when a tanker carrying chemical gas from Pune to Mumbai overturned. The tanker was loaded with highly inflammable propylene gas. After the accident, three valves on the trailer were damaged, resulting in gas leakage.

Quick Response Vehicles, ambulances, Delta Force, patrolling staff, firefighting equipment and required machinery were immediately deployed at the site. Additional fire tenders were arranged from Tata Steel and Khopoli Municipal Council. As the gas is highly inflammable, traffic on the Mumbai-bound carriageway was temporarily suspended with the help of Highway Safety Police to ensure passenger safety.

To avoid traffic congestion, at 7:30 pm the central barrier between both carriageways of the expressway was removed and one lane from the Pune-bound carriageway was opened for Mumbai-bound vehicles. Pune-bound traffic was continued through the remaining two lanes. Light vehicles heading towards Mumbai were diverted from Magic Point via Khopoli (old highway) route.

The chemical experts’ team reached the spot at 8:30 pm, while the National Disaster Response Force (NDRF) arrived at 10:20 pm. However, due to extensive damage to the tanker valves, it was not possible to completely stop the leakage at that time.

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे पर दुर्घटना एमएसआरडीसी द्वारा आपातकालीन प्रतिक्रिया योजना (ERP) तुरंत लागू

 यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे पर दुर्घटना

एमएसआरडीसी द्वारा आपातकालीन प्रतिक्रिया योजना (ERP) तुरंत लागू

• ट्रैफिक जाम में फंसे यात्रियों को पीने का पानी और बिस्कुट वितरित

• विशेषज्ञों की टीम ने दो स्थानों पर गैस रिसाव पूरी तरह रोकातीसरा रिसाव भी काफी हद तक नियंत्रण में

 

मुंबई, 4 फरवरी : यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे पर हुई दुर्घटना की सूचना मिलते ही महाराष्ट्र राज्य सड़क विकास निगम (एमएसआरडीसी) ने अपनी आपातकालीन प्रतिक्रिया योजना (ERP) तुरंत सक्रिय कर दीऐसा एमएसआरडीसी ने बताया है।

ट्रैफिक जाम में फंसे यात्रियों के लिए आईआरबी एमपीईपीएल के माध्यम से पीने का पानी और बिस्कुट वितरित किए गए। यात्रियों की असुविधा को ध्यान में रखते हुए संबंधित टोल नाकों पर अस्थायी रूप से टोल-मुक्त प्रवेश और निकास की सुविधा प्रदान की गई।

दुर्घटनाग्रस्त टैंकर को हटाकर यातायात पुनः शुरू करनेकी प्रक्रिया जोरोंपर

4 फरवरी 2026 को रासायनिक विशेषज्ञों की टीम ने टैंकर में दो स्थानों पर हो रही गैस रिसाव को पूरी तरह रोक दिया हैजबकि तीसरे रिसाव को भी काफी हद तक नियंत्रण में लाया गया है। शाम 5 बजे दुर्घटनाग्रस्त टैंकर से गैस को सुरक्षित टैंकर में स्थानांतरित करने की प्रक्रिया शुरू की गई। यह प्रक्रिया पूरी होने के बाद दुर्घटनाग्रस्त टैंकर को हटाकर मुंबई लेन पर यातायात पुनः शुरू किया जाएगाऐसा एमएसआरडीसी ने बताया।

यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे की मुंबई लेन पर किलोमीटर 41/200 परअडोशी सुरंग के पास (बोरघाट खंड में), 3 फरवरी 2026 को शाम करीब 5 बजे पुणे से मुंबई जा रहा रासायनिक गैस से भरा टैंकर पलट गया। टैंकर में अत्यंत ज्वलनशील प्रोपाइलीन गैस भरी हुई थी। दुर्घटना के बाद ट्रेलर पर लगे तीन वाल्व क्षतिग्रस्त हो जाने से गैस रिसाव शुरू हो गया।

क्विक रिस्पॉन्स वाहनएम्बुलेंसडेल्टा फोर्सपेट्रोलिंग स्टाफअग्निशमन उपकरण तथा आवश्यक मशीनरी तुरंत घटनास्थल पर तैनात की गई। इसके साथ ही टाटा स्टील और खोपोली नगर परिषद से अतिरिक्त फायर ब्रिगेड भी उपलब्ध कराई गई। गैस अत्यंत ज्वलनशील होने के कारण यात्रियों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए हाईवे सुरक्षा पुलिस की मदद से मुंबई लेन पर यातायात अस्थायी रूप से बंद कर दिया गया।

यातायात जाम से बचने के लिए शाम 7.30 बजे एक्सप्रेसवे की दोनों लेनों के बीच का मध्य बैरियर हटाकर पुणे लेन की एक लेन मुंबई जाने वाले वाहनों के लिए खोल दी गई। पुणे की ओर जाने वाला ट्रैफिक शेष दो लेनों से चालू रखा गया। साथ ही मुंबई की ओर जाने वाले हल्के वाहनों को मैजिक पॉइंट से खोपोली (पुराना हाईवे) मार्ग से डायवर्ट किया गया।

रासायनिक विशेषज्ञों की टीम रात 8.30 बजे और राष्ट्रीय आपदा प्रतिक्रिया बल (एनडीआरएफ) रात 10.20 बजे घटनास्थल पर पहुंचा। हालांकिटैंकर के वाल्वों को भारी नुकसान होने के कारण उस समय गैस रिसाव पूरी तरह रोकना संभव नहीं हो सका

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपी) तत्काळ कार्यान्वित

 यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत

एम.एस.आर.डी.सी कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपीतत्काळ कार्यान्वित

  • वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण
  • तज्ज्ञांच्या पथकाने दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली, तिसरी गळतीही नियंत्रणात

 

मुंबई दि.४ : यशवंतराव चव्हाण महामार्गावरील अपघाताबाबत घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आर.डी.सी.) कडून आपत्कालीन प्रतिसाद योजना (ईआरपीतत्काळ कार्यान्वित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.

वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी आय.आर.बी.एम.पी.ई.पी.एल.मार्फत पिण्याचे पाणी व बिस्किटांचे वितरण करण्यात आले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित टोल नाक्यांवर तात्पुरत्या स्वरूपात टोलमुक्त प्रवेश व निर्गमन सुविधा देण्यात आली.

अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक पूर्ववत सुरु करण्याची प्रक्रिया वेगात

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रासायनिक तज्ज्ञांच्या पथकाने टँकरवरील दोन ठिकाणची वायू गळती पूर्णपणे थांबवली असून तिसरी गळतीही मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता अपघातग्रस्त टँकरमधील वायू सुरक्षित टँकरमध्ये स्थानांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर हटवून मुंबई वाहिनीवरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईलअसे एम.एस.आर.डी.सी.कडून कळवण्यात आले.

यशवंतराव चव्हाण महामार्गावरील मुंबई वाहिनीवर कि.मी. ४१/२०० येथेअडोशी बोगद्याजवळ (बोरघाट विभागात) दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारा रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या टँकरमध्ये अत्यंत ज्वलनशील असा प्रॉपिलीन वायू भरलेला होता. अपघातानंतर टँकरच्या ट्रेलरवरील तीन व्हॉल्व्हना नुकसान झाल्याने वायू गळती सुरू झाली. क्विक रिस्पॉन्स वाहनेरुग्णवाहिकाडेल्टा फोर्सपेट्रोलिंग कर्मचारीअग्निशमन उपकरणे तसेच आवश्यक यंत्रसामग्री घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आली. यासोबतच टाटा स्टील आणि खोपोली नगरपरिषद येथून अतिरिक्त अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्यात आले. वायू अत्यंत ज्वलनशील असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीने मुंबई वाहिनीवरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजता महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांमधील मध्य बॅरीअर हलवून पुणे वाहिनीवरील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी खुली करण्यात आली. पुण्याकडे जाणारी वाहतूक उर्वरित दोन लेनमधून सुरू ठेवण्यात आली. तसेच मुंबईकडे जाणारी हलकी वाहतूक मॅजिक पॉइंट येथून खोपोली (जुना महामार्ग) मार्गे वळविण्यात आली.

रासायनिक तज्ज्ञांचे पथक रात्री ८.३० वाजता तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफरात्री १०.२० वाजता घटनास्थळी दाखल झाले. मात्रटँकरच्या व्हॉल्व्हचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्या वेळी गळती पूर्णपणे थांबवणे शक्य झाले नाही.

Wednesday, 4 February 2026

मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर सतत

 


@ चौकट :-
● मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर सतत होणारी वाहतूक कोंडी यावर वने मंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाहतूक शाखेला उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहे.
● शिरसाड नाका ते अंबाडी कडे जाणारा रस्ता खोदलेला असून ग्रामस्थाना नाहक त्रास होत आहे.
● वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत गोखीवरे चौकावर असलेले झाडे स्थलांतरित करणे, तसेच पेल्हार येथे होणारी वाहतूक कोंडी
या विषयावर परखडपणे त्यांनी आपली मते मांडली.

--
Regards,

Shahrukh Mulani
Call / WhatsApp no :– 9867733766

भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय ; आमदार विलास तरे यांच्या ठरावस सर्वानुमते मंजुरी

 भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय ; आमदार विलास तरे यांच्या ठरावस सर्वानुमते मंजुरी




पालघर. (प्रतिनिधी) – पालघर जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जडणघडणीत मोलाची भर घालणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभारण्याचा ठराव आमदार विलास तरे यांनी मांडला असून, या ठरावास सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. या ऐतिहासिक निर्णयामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार विलास तरे यांनी ठराव मांडताना सांगितले की, भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात केलेला संघर्ष, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेले बलिदान आणि सामाजिक जागृतीचे कार्य हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मात्र, त्यांच्या स्मृती जतन करणारे ठोस स्वरूपाचे स्मारक पालघर जिल्ह्यात अद्याप अस्तित्वात नाही. आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणे ही काळाची गरज असून, यामुळे त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या ठरावास आमदार शांताराम मोरे यांनी अनुमोदन दिले. त्यांनीही भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, आदिवासी समाजाच्या इतिहासाला आणि स्वाभिमानाला चालना देणारा हा निर्णय असल्याचे मत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शविला आणि कोणताही विरोध न होता हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

बैठकीदरम्यान हा ठराव मंजूर होताच सभागृहात समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्मारक उभारल्यास, जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थी-युवकांना आणि पर्यटकांना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख होईल. तसेच आदिवासी समाजाच्या इतिहासाला शासकीय पातळीवर मान्यता मिळाल्याचा हा ठोस पुरावा ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्याशी संबंधित इतर विकासात्मक व नागरी समस्यांवरही चर्चा झाली असली, तरी भगवान बिरसा मुंडा स्मारकाचा ठराव हा बैठकीचा केंद्रबिंदू ठरला. सामाजिक समरसता, ऐतिहासिक जाणीव आणि आदिवासी अस्मितेला बळ देणारा हा निर्णय पालघर जिल्ह्याच्या इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

आमदार विलास तरे यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, हा ठराव केवळ स्मारक उभारण्यापुरता मर्यादित नसून, आदिवासी समाजाच्या संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाला दिलेला सन्मान आहे. प्रशासनाने तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करून स्मारक उभारणीचे काम सुरू करावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Featured post

Lakshvedhi