Tuesday, 3 February 2026

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

 हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

•       हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

•       वृक्ष लागवड मोहिमेत स्टार्टअपचा सहभाग घ्यावा

•       रोप निर्मितीसाठी खासगी नर्सरी व बचतगटांचा सहभाग घ्यावा

 

मुंबईदि. २ : पर्यावरण संवर्धनहवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञस्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

प्रस्तावित हरित प्राधिकरण - ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.


Fuel Conservation Capacity Festival to be implemented across the state

 Fuel Conservation Capacity Festival to be implemented across the state

– Umesh Kulkarni

 

State-Level Coordinator for Petroleum and Natural Gas Umesh Kulkarni said that the national campaign ‘SAKSHAM 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’, which is significant for India’s energy security, sustainable development, and environmental protection, is being launched nationwide from today. From February 1 to 152026, the campaign will be conducted across the country under the slogan “Conserve Oil & Gas, Go Green.” Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and in coordination with respective State Governments, various awareness programs are being organized by state-level coordinators of the oil industry.

 

Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas

 Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and with the cooperation of the State Government, various public awareness activities are being organized by state-level coordinators of the oil industry at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. As part of this, the ‘Saksham 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’ was inaugurated under the chairmanship of Minister Mangal Prabhat Lodha, who was speaking on the occasion.

Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

 Conservation of Natural Oil and Gas is Service to the Nation

Minister Mangal Prabhat Lodha

 

‘SAKSHAM 202526’ campaign launched from today to promote energy conservation

 

Mumbai, Feb 2: Conserving natural oil and gas is a service to the nation. Fuel conservation is a key objective envisioned by Prime Minister Narendra Modi under the goal of Viksit Bharat 2047, and with the participation of every citizen, the country will achieve this goal. Conserving oil and gas means adopting green energy, and participation in this initiative is a social responsibility of every individual, appealed Minister for Skill Development, Employment, Entrepreneurship and Innovation, Mangal Prabhat Lodha.

 

Under the guidance of the Union Ministry of Petroleum and Natural Gas and with the cooperation of the State Government, various public awareness activities are being organized by state-level coordinators of the oil industry at Ravindra Natya Mandir, Prabhadevi. As part of this, the ‘Saksham 202526 (Fuel Conservation Capacity Festival)’ was inaugurated under the chairmanship of Minister Mangal Prabhat Lodha, who was speaking on the occasion.

राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार - उमेश कुलकर्णी

 राज्यात संरक्षण क्षमता महोत्सव राबविणार - उमेश कुलकर्णी

        राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी म्हणाले कीभारत सरकारच्या ऊर्जा सुरक्षितताशाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या सक्षम २०२५-२६ (संरक्षण क्षमता महोत्सव)’ या राष्ट्रीय अभियानाची आजपासून देशभरात सुरुवात होत आहे. १ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत Conserve Oil & Gas, Go Green (तेल आणि गॅस वाचवाहरित ऊर्जा स्वीकारा) या घोषवाक्यासह हे अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि संबंधित राज्य शासनाच्या सहकार्याने तेल उद्योगातील राज्यस्तरीय समन्वयकांकडून विविध जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

सक्षम अभियानाच्या पंधरवड्यात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गटचर्चा व वादविवादमहाविद्यालयांमध्ये भित्तीचित्र व ग्राफिटी स्पर्धाइंधन-कार्यक्षम वाहनचालक स्पर्धालेखन स्पर्धादूरदर्शन व रेडिओवरील चर्चासत्रांचे आयोजन. या अभियाना दरम्यान शालेय विद्यार्थीयुवकएलपीजी वापरकर्तेवाहनचालकउद्योग क्षेत्रातील कर्मचारीशेतकरीगृहनिर्माण संस्थाग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था यांच्यापर्यंत पोहोचून इंधन संवर्धनाचे महत्त्वफायदे आणि उपाय योजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. इंधन-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी  दिली.

         

 

 राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी इंधन बचतीची शपथ दिली. यावेळी मायरा फाउंडेशनतर्फे इंधन बचतीचे पथनाट्य सादर करण्यात आले.

परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन · राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

 परळी वैजनाथमध्ये 13 फेब्रुवारीपासून अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शन

·         राज्यातील पशुपक्षी पालकांना सहभागी होण्याचे आवाहन

 

मुंबईदि. 2 : बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे 13 ते 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत 'अखिल भारतीय पशुपक्षी प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये देशभरातील विविध प्रजातींचे एक हजाराहून अधिक पशू सहभागी होणार असून प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. या पशुपक्षी प्रदर्शनात सहभागी व्हावेअसे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनात पशुपालकांना गायीम्हशीघोडेशेळ्या-मेंढ्या आणि विविध पक्ष्यांच्या दर्जेदार प्रजाती पाहायला मिळतील. केवळ महाराष्ट्रच नव्हेतर संपूर्ण देशातील प्रगतशील पशुपालक व शेतकरी या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. पशुपालकांना आधुनिक पशुपालनआहार व्यवस्थापन आणि आरोग्याविषयी सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहेअशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभागाचे सचिव (पदुम) डॉ. रामास्वामी एन.  यांच्या मार्गदर्शनाखाली  या प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे. परळी वैजनाथ येथे प्रदर्शनासाठी भव्य मैदान व पशुधनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. "या प्रदर्शनाच्या माध्यमातून पशुपालकांना पशुसंवर्धनाविषयीची संकीर्ण व अद्ययावत माहिती एकाच छताखाली उपलब्ध होईल. याचा मोठा फायदा पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी होईल," असा विश्वास पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी व्यक्त केला आहे.

 

नवीन तंत्रज्ञान व दर्जेदार पशुधनाची माहिती घेण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील जास्तीत जास्त पशुपालकांनी या तीन दिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावाअसे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी · सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी

·         सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

 

मुंबई, दि. 2 : तोतया व्यक्तींना पुढे करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्त नोंदणी करण्याचे प्रकार घडत असून, या पार्श्वभूमीवर जनसामान्यांनी मालमत्तेच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक यांनी केले आहे.

 

एका तोतया व्यक्तीने स्वतःला मूळ मालक म्हणून दर्शवत बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी केल्याचा गंभीर प्रकार अंधेरी येथील सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात 29 जानेवारी रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वतःला सलाउद्दीन आदम नाईक या मूळ मालकाच्या जागेवर भासवणारे मोहम्मद रफीक मोहम्मद इलियास यांच्याविरुद्ध जूहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सह जिल्हा निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री, गहाणखत, बक्षीसपत्र हक्कसोडपत्र, पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी, करारनामे, विकसन करारनामे आदी सामान्य नागरिकांची कामे नियमित स्वरूपात मोठ्या प्रमाणात केली जातात. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीद्वारे मूळ मालकांची फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी कोणतेही व्यवहार करतांना जागरुकता बाळगण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक रमेश पगार यांनी केले आहे.

 

Featured post

Lakshvedhi