Sunday, 1 February 2026

महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे

 महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे

- अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी

·        कृषि विभाग- एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन

आयोजित चर्चासत्रात महिला शेतकरी केंद्रस्थानी

मुंबई,दि.२३: महाराष्ट्रातील शेतीमध्ये महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहेमहिला शेतक-यांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असून शाश्वत शेतीसाठी कृषि विभागामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन कृषि विभागासोबत शेतकरी महिलांच्या विकासासाठी काम करत आहे, असे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सांगितले.

            महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे महिला शेतक-यांच्या विविध विषयाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी बोलत होते.

या कार्यक्रमात एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौम्या स्वामिनाथनशेतकरी महिला प्रतिनिधीविविध भागातून महिलांविषयक काम करणा-या स्वयंसेवी संस्थापशुसंवर्धनदुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामीसहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेकृषी आयुक्त सुरज मांढरेनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंगमहाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदच्या महासंचालक वर्षा लड्डाएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त कैलास पगारेउमेद- राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर,मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्रिया खानविधी व न्याय विभागाचे संयुक्त सचिव मकरंद कुलकर्णी तसेच महिला किसान अधिकार मंच यांच्या सीमा कुलकर्णी यांनीही आपले विचार मांडले.

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

 परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असल्याचे सांगताना उद्योगमंत्री डॉ.सामंत म्हणाले कीकेंद्र शासनाच्या सर्वेक्षणानुसार मागील वर्षी महाराष्ट्रात १.६४ लाख कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणुकीची नोंद झाली आहे. त्याचबरोबरउद्योग उभारणीसाठी किमान चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतोहे लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दावोस दौऱ्यावरील खर्चाबाबतही लवकरच सविस्तर माहिती जनतेसमोर मांडणार असल्याचे सांगूनबल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला नसून तो रायगडमध्येच उभारला जात असल्याचे उद्योगमंत्री डॉ.सामंत यांनी स्पष्ट केले. उद्योग विभागावर होणारी तथ्यहीन टीका थेट उद्योजकांपर्यंत पोहोचतेत्यामुळे राज्यात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन उद्योगमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी केली.

000

रायगड/पेण ग्रोथ सेंटर

 रायगड/पेण ग्रोथ सेंटर

दावोस दौऱ्यात ऑटोमोबाईलरिअल इस्टेटडिफेन्सफार्मा अशा सर्व क्षेत्रांतील गुंतवणूक महाराष्ट्रात येणार असूनतिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरसाठी एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ‘एमएमआर’ क्षेत्रात सुमारे २३ लाख कोटीमल्टीपल लोकेशन्समध्ये ७.७२ लाख कोटीकोकणात ३.१० लाख कोटीनागपूरमध्ये १.९५ लाख कोटीनाशिकमध्ये ३०,१०० कोटीछत्रपती संभाजीनगरमध्ये १७,७०० कोटीपुण्यात ३,२५० कोटी आणि अमरावतीत १,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.

दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी; ३७ लाख कोटींचे सामंजस्य करार,

 दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी३७ लाख कोटींचे सामंजस्य करार,

४३ लाख रोजगारनिर्मिती

– उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत

मुंबईदि. २३ : दावोस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आतापर्यंत एकूण ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असूनत्यातून राज्यात ४३ लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दावोस दौरा शंभर टक्के यशस्वी ठरलेला आहेअशी माहिती उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

उद्योगमंत्री डॉ.सामंत म्हणाले कीदावोसमध्ये एकूण ८१ करार झाले असूनत्यापैकी १६.६९ लाख कोटी रुपयांचे ५१ करार उद्योग क्षेत्रातील आहेत. एमएमआरडीए’ अंतर्गत २४ करार असून त्यांची किंमत १९.४३ लाख कोटी रुपये आहेतर सिडको अंतर्गत ६ करार १.१५ लाख कोटी रुपयांचे आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी सरासरी ८० टक्के थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहेअसे त्यांनी स्पष्ट केले.

मागील वर्षी दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये १५ लाख कोटींच्या सामंजस्य कराराची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी सुरू आहे. गडचिरोलीछत्रपती संभाजीनगररत्नागिरीरायगड आदी जिल्ह्यांत प्रत्यक्ष उद्योग उभे राहत असल्याचे उद्योग मंत्री डॉ.सामंत यांनी सांगितले.


भारत पर्व ' महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची

 पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी.एन.पाटील म्हणाले की, ‘भारत पर्व महोत्सवामध्ये महाराष्ट्र पर्यटन विभागाने सहभाग घेऊन राज्यातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या भागधारकांद्वारे पर्यटन सेवा-सुविधांची माहिती देण्यात आली. यामुळे विविध पर्यटन क्षेत्रातील भागधारकांना पर्यटन वाढीसाठी मदत मिळेल. तसेच सदर महोत्सवाच्या माध्यामातून महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन क्षेत्रातील आपली ओळख पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा

 पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय  खंदारे म्हणाले की, ‘भारत पर्व ’ महोत्सवाद्वारे राज्यातील पर्यटन आणि समृद्ध परंपरा जागतिक स्थरावर पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. राज्यातील गड-किल्लेसांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेथंड हवेची ठिकाणे आदी पर्यटनविषयक वैशिष्ट्ये असलेल्या स्थळांची माहिती जगभरात पोहोचविण्यासाठी विशेष फायदा झाला. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांना महाराष्ट्र पर्यटनाबाबत जाणून घेण्यास अधिक रुची दाखविली. याचा पर्यटन क्षेत्राला आर्थिक दृष्ट्या नक्कीच फायदा होईल.

सांस्कृतिक वारसा, समुद्रकिनारे, युनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत

 सांस्कृतिक वारसासमुद्रकिनारेयुनेस्को मान्यताप्रात्प गडकिल्ले अशा पर्यटन विषयक वैशिष्ट्य असलेल्या स्थळांची माहिती या दालनाद्वारे पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यात आली. राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभरात पोहोचविणे हा या दालनामागचा मुख्य उद्देश होता.

विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळीराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील भागधारक तसेच अनेक पर्यटकांनी पर्यटन विभागाच्या दालनाला भेट दिली. पर्यटन क्षेत्रातील विविध स्तरांमधील घटकांनी महाराष्ट्र पर्यटन आणि सेवांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यात रुची दाखविली. दालनाच्या सर्जनशील सादरीकरणाबाबत तसेच महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती व विविध पर्यटन क्षमता वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनेकांनी कौतुक केले.

Featured post

Lakshvedhi