Friday, 23 January 2026

प्रतिमा अभंगे यांची चित्रे भारतीय संस्कृतीचा आरसा

 प्रतिमा अभंगे यांची चित्रे भारतीय संस्कृतीचा आरसा



-निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला

 

नवी दिल्ली, दि.22 : जेव्हा एखाद्या कलाकाराची नाळ मातीशी जोडलेली असते तेव्हाच त्याच्या कलाकृतीला वैश्विक परिमाण प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांमध्ये दिसणारा भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचा संगम थक्क करणारा असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले.  

 

नवी दिल्लीतील ललित कला अकादमी येथे आयोजित प्रतिमा अभंगे यांच्या 'पूराकल्पया एकल कला प्रदर्शनाला आर. विमला यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्येक कलाकृतीचे बारकाईने निरीक्षण केले आणि संवाद साधला.

 

कलाकार जेंव्हा आपल्या सांस्कृतिक परंपरेशी आणि मुळांशी निष्ठेने जोडलेला असतोतेंव्हा त्याच्या कलाकृतींना वैश्विक उंची प्राप्त होते. प्रतिमा अभंगे यांच्या चित्रांत दिसणारा भारतीय तत्त्वज्ञानाचा सखोल आविष्कार आणि संस्कृतीचा सुंदर मेळ हा खरोखरच आश्चर्यचकित करणारा आहे. त्यांची प्रत्येक कलाकृती भारतीय वारशाचे जिवंत प्रतिबिंब असल्याची जाणीव या प्रदर्शनातून प्रकर्षाने जाणवते,अशी भावना महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी व्यक्त केली.

 

या प्रदर्शनाला महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुलसहायक निवासी आयुक्त नितीन शेंडेसहायक निवास आयुक्त स्मिता शेलारजनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे  यांनी भेट दिली.  प्रदर्शनाला दिल्लीतील कलाप्रेमीज्येष्ठ कलाकार आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभत आहे.   प्रदर्शनाचे उद्घाटन इंडिया टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक मुग्धा सिन्हा यांच्या हस्ते झाली. मुग्धा सिन्हा यांनीही "प्रयोगाचे धाडस हीच कलेची खरी ओळख" असल्याचे सांगत प्रतिमा यांच्या प्रवासाचा गौरव केला. हे प्रदर्शन 25 जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे.

0000

महाराष्ट्राच्या या चित्ररथाची रचना अत्यंत कलात्मक

 कसा असेल चित्ररथ?

महाराष्ट्राच्या या चित्ररथाची रचना अत्यंत कलात्मक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला एक भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपारिक वेशभूषेतील महिला राज्याच्या प्रबळ स्त्रीशक्तीचे दर्शन घडवेल. चित्ररथाच्या मध्यभागात गणपतीची देखणी मूर्ती साकारणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला गणेशभक्त दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असूनइतर सांस्कृतिक बाबींचेही बारकाव्यांसह दर्शन घडवण्यात आले आहे. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस पारंपारिक नऊवारी साडी परिधान केलेल्या महिलांचे लेझीम पथक असेल.

 

यंदाचा हा सोहळा 'जनभागीदारी'वर आधारित असूनसंचलनानंतर २६ ते ३१ जानेवारी दरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित होणाऱ्या 'भारत पर्व'मध्ये देखील देशवासियांना महाराष्ट्राच्या या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

0000

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार · गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' चित्ररथ सज्ज

 प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष निनादणार

·        गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीकचित्ररथ सज्ज

 

नवी दिल्ली, दि.२२: भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला असूनयंदा राज्याच्या वतीने गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार आहे. राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्'ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा विशेष ठरणार आहे. युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असूनत्यांच्या उपस्थितीत संचलनात सहभागी होणारा महाराष्ट्राचा हा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ परंपरा आणि वाढत्या आर्थिक सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला घडवेल.

 

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवातून ज्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवलीतिच चळवळ आज आधुनिक भारताला कशी 'आत्मनिर्भरबनवत आहेयाचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढालमूर्तिकार आणि सजावट कलाकारांना मिळणारा शाश्वत रोजगार आणि त्यातून विणली गेलेली आर्थिक साखळी या चित्ररथाच्या केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सव हा 'राज्य महोत्सवम्हणून साजरा करण्यास सुरुवात केली असूनया उत्सवामुळे केवळ सांस्कृतिकच नव्हेतर पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेसही कशी चालना मिळतेहे या चित्ररथातून ठळकपणे मांडण्यात आले आहे.

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास!

 मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमीचा विकास!

मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणार असून मुंबईतील पाणीहवा याचे प्रश्न यातून सोडविण्यात येतील. सर्व प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया झाली पाहिजेहा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. पुढे हीच संकल्पना सर्व मोठ्या शहरांमध्ये नेण्यात येईल. मुंबईत पुढच्या 2 ते 3 वर्षात हा परिणाम आपण दाखवू शकू. रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा याच दावोसमध्ये करण्यात आली. या ग्रोथ सेंटरमुळे एक बिझनेस डिस्ट्रीक्ट तयार होईल. यात 1 लाख कोटींची गुंतवणूक कालच आली आहेअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काही समूह हे भारतीय असले तरी त्यांची सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम काम्प्युटिंग, एआय, जीसीसी, डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन

 ही गुंतवणूक 3 ते 7 वर्षांत परावर्तित होत असतेअसे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीएसबीजीब्रुकफिल्डआर्सेलर मित्तलफिनमन ग्लोबलइस्सारस्कोडा ऑटोफॉक्सवेगनएसटीटी टेलिमीडियाटाटाअदानीरिलायन्सजेबीएलकोकाकोलाबॉशकॅपिटल लँडआयर्न माऊंटेन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत. काही समूह हे भारतीय असले तरी त्यांची सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम काम्प्युटिंगएआयजीसीसीडेटा सेंटर्सआरोग्यअन्न प्रक्रियाग्रीन स्टीलनगरविकासजहाजनिर्माणफिनटेकलॉजिस्टीकडिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे

कोकण, एमएमआरमध्ये 22 टक्के, विदर्भात 13 टक्के, तर 50 टक्के गुंतवणूक राज्याच्या इतर भागात pl share

 सर्वदूर गुंतवणूक

कोकणएमएमआरमध्ये 22 टक्केविदर्भात 13 टक्के, तर 50 टक्के गुंतवणूक राज्याच्या इतर भागात आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकजळगावधुळेअहिल्यानगर अशा सर्व भागात 50 हजार कोटीमराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये 55,000 कोटी रुपयेकोकण प्रदेशात 3,50,000 कोटीनागपूर आणि विदर्भात 2,70,000 कोटी अशी प्रमुख आकडेवारी आहे. जायकाजेबीआयसीयुनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेयुनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियास्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील स्टँडफोर्ड बायोडिझाईन असे अनेक संस्थात्मक करार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईनजीक · मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार

  

दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आणखी 10 लाख कोटींच्या कराराची प्राथमिक बोलणी पूर्ण

 

·         83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक

·         एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक

·         40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट

·         देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबईनजीक

·         मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार

 

दावोस, दि. 22 जानेवारी :दावोसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असूनआणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी पूर्ण झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. यातून 40 लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे असेही त्यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रातील पत्रकारांशी त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधलात्यावेळी ते बोलत होते. या करारांपैकी 83 टक्के करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असूनएकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येते आहे. 16 टक्के गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागिदारीत आहे. या 18 देशांमध्ये अमेरिकाइंग्लंडसिंगापूरजपानस्वित्झर्लंडस्वीडननेदरलँडनॉर्वेइटलीजर्मनीफ्रान्सऑस्ट्रियायुएईस्पेनकॅनडाबेल्जियम इत्यादींचा समावेश आहे. औद्योगिकसेवाकृषीतंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक येते आहे. सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर हा 75 टक्के आहे. गेल्या वर्षीचे करार हे 75 टक्के प्रत्यक्षात आलेले आहेतअशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

ही गुंतवणूक 3 ते 7 वर्षांत परावर्तित होत असतेअसे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीएसबीजीब्रुकफिल्डआर्सेलर मित्तलफिनमन ग्लोबलइस्सारस्कोडा ऑटोफॉक्सवेगनएसटीटी टेलिमीडियाटाटाअदानीरिलायन्सजेबीएलकोकाकोलाबॉशकॅपिटल लँडआयर्न माऊंटेन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत. काही समूह हे भारतीय असले तरी त्यांची सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे. क्वांटम काम्प्युटिंगएआयजीसीसीडेटा सेंटर्सआरोग्यअन्न प्रक्रियाग्रीन स्टीलनगरविकासजहाजनिर्माणफिनटेकलॉजिस्टीकडिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे.

Featured post

Lakshvedhi