Monday, 19 January 2026

सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

 सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतूजनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने  शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी ,खूप चांगली असल्याने अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार कुसुम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करुन आपण  प्रतिक्षा कालावधी कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारीतंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

 सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

 

 

छत्रपती संभाजीनगरदि.५:- देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले यावेळी उपस्थित होते.

नवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज

 कामगार मंत्री फुंडकर म्हणालेनवीन कामगार संहितांच्या प्रत्येक तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी विभागाने सज्ज असावे. या अंमलबजावणीचा नियमितपणे आढावा घेण्यात यावा. कामगार संहितेबाबत जनजागृती करण्यात यावी. राज्यात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले कामगार कायदे आणि नवीन कामगार संहिता यामधील बदल लक्षात घेऊन त्यानुसार अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी.

 

वेतन संहिताऔद्योगिक संबंध संहितासामाजिक सुरक्षा संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आरोग्य कामाची स्थिती संहिता या चार नवीन कामगार संहिता 21 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू करण्यात आल्या आहेत. राज्यामधील असलेल्या कामगार कायद्यांच्या तरतुदी आणि नवीन कामगार संहितांच्या तरतुदींचा विस्तृत आढावा सादरीकरणाद्वारे यावेळी घेण्यात आला.

0000

नवीन कामगार संहितेच्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

 नवीन कामगार संहितेच्या तरतुदींची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी

- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

नागपूरदि. 8 : केंद्र शासनाने चार नवीन कामगार संहिता देशभरात लागू केल्या आहेत. या संहितांच्या तरतुदींची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले आहेत.

 

ना. मे. लोखंडे श्रम विज्ञान संस्थानागपूर येथे नवीन कामगार सहितांच्या अंमलबजावणीबाबत आयोजित बैठकीत कामगार मंत्री फुंडकर यांनी आढावा घेतला.


महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय

 महाराष्ट्रातील लोकप्रशासनराज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्रइतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्येजडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.


महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा ‘लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर

 महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा

लोकराज्यमधील मागोवा लवकरच एका क्लिकवर

-  प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

 

नागपूरदि. ८ : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयामत्या - त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणेराज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.  

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसलेसंचालक (माहिती)( प्रशासन) किशोर गांगुर्डेनागपूर विभागाचे संचालक (माहिती) गणेश मुळेसंचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारीकक्ष अधिकारी युवराज सोरेगावकरजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sunday, 18 January 2026

सिकलसेल ॲनिमियाविरोधात ‘अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने ‘दिलखुलास’मध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत

 सिकलसेल ॲनिमियाविरोधात अरुणोदय’ जनजागृती मोहिमेनिमित्ताने

दिलखुलासमध्ये डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत

 

मुंबईदि. 16: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास’ कार्यक्रमात अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष जनजागृती मोहीमया विषयावर आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

दिलखुलास’ कार्यक्रमातील ही मुलाखत दि. 19 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार आहे. तसेचही मुलाखत ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवरूनही ऐकता येणार आहे. निवेदिका उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

Featured post

Lakshvedhi