Monday, 19 January 2026

महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा ‘लोकराज्य’मधील मागोवा लवकरच एका क्लिकवर

 महाराष्ट्राच्या सात दशकांतील ऐतिहासिक वाटचालीचा

लोकराज्यमधील मागोवा लवकरच एका क्लिकवर

-  प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह

 

नागपूरदि. ८ : महाराष्ट्राच्या स्थापनेपासून लोकप्रशासनाच्या माध्यमातून निर्माण झालेला आयामत्या - त्या काळानुरुप लोककल्याणाच्या माध्यमातून निर्माण झालेली धोरणेराज्यातील विविध ऐतिहासिक घटनांचा मागोवा लोकराज्य’ मासिकाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचिबद्ध झालेला आहे. हा बहुमोल ऐतिहासिक दस्ताऐवज आता डिजीटल फॉरमॅटमध्ये अंकनिहाय उपलब्ध होत असून लवकरच तो गुगल व इतर प्लॅटफॉर्मद्वारे वाचक व अभ्यासकांपर्यंत पोहोचवू, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.  

 

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने लोकराज्य’ च्या दुर्मीळ अंकाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पहिल्या टप्प्यात प्राथमिक स्तरावर डिजीटल स्वरुपात उपलब्ध केलेल्या ५० दुर्मीळ अंकाचे लोकार्पण प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. विधानभवन परिसरात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास प्रभारी उपसचिव अजय भोसलेसंचालक (माहिती)( प्रशासन) किशोर गांगुर्डेनागपूर विभागाचे संचालक (माहिती) गणेश मुळेसंचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारीकक्ष अधिकारी युवराज सोरेगावकरजिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi