Sunday, 18 January 2026

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

 देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

 

मुंबई, दि. 16 :- महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदलमानसिक ताणहॉर्मोन असंतुलनहाडांचे आजारझोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून  राज्य शासनाने महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईचे युवा उद्योजक आकाश शहा यांना स्टार्टअप्स

   तसेचमुंबईचे युवा उद्योजक आकाश शहा यांना स्टार्टअप्स आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील विशेष योगदानासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीत स्टार्टअप्स महत्त्वाची भूमिका बजावत असतानाआकाश शहा यांनी या क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल राष्ट्रपती भवनाकडून घेण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा 'अॅट होमहा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो.

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील अरविंद गुलाब चौधरी

 जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील अरविंद गुलाब चौधरी यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री आवास योजने'चा लाभ घेऊन आपले हक्काचे घर मिळवणाऱ्या यशस्वी लाभार्थ्यांचे प्रतिनिधित्व ते या सोहळ्यात करणार आहेत. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात कसा बदल असल्याचे उदाहरण ठरले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल

 वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील विख्यात तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडे यांना ही विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून एम डी पदवी प्राप्त केल्यानंतरशहरात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अतिमागास आणि डोंगराळ अशा मुखेड भागाची रुग्णसेवेसाठी निवड केली. गेल्या 30 वर्षांपासून त्यांनी सर्पदंशावरील उपचारांत क्रांती घडवून आणली आहे. 1988 मध्ये मुखेड परिसरात सर्पदंशामुळे होणारा 25 टक्के मृत्यूदर आज डॉ. पुंडे यांच्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे शून्य टक्क्यांवर आला आहे. त्यांच्या या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओदखल घेऊन त्यांची निवड 'राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती'मध्ये केली आहे.

77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होम' सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

 77 वा प्रजासत्ताक दिन: राष्ट्रपती भवनातील 'अॅट होमसोहळ्यासाठी

महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

            नवी दिल्ली दि. 16 : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठित 'अॅट होमस्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे चंद्रशेखर भडसावळेनांदेडचे सर्पदंश तज्ज्ञ डॉ. दिलीप पुंडेजळगावचे अरविंद गुलाब चौधरी आणि मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा यांना विशेष निमंत्रण पाठविण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातील सगुणा बागचे संस्थापक आणि सुप्रसिद्ध 'कृषिरत्नश्री. चंद्रशेखर हरि भडसावळे यांच्या  शेतीनैसर्गिक शेतीशून्य-नांगरणी तंत्र (एसआरटी), जलसंवर्धनकृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील  उल्लेखनीय कामगिरीची दखल या निमित्ताने घेण्यात आली आहे. 1976 पासून शेती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भडसावळे यांनी नेरळ येथील 'सगुणा बाग'ला एकात्मिक शेतीचा एक जागतिक दर्जाचा आदर्श नमुना म्हणून विकसित केले आहे. मत्स्यव्यवसायवनशेतीफलोत्पादनगो-पालन आणि पर्यटन यांची सांगड घालणारे हे मॉडेल आज देशभरातील शेतकरी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरले असूनशेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे 'टीसीएस'कडून जतन

 महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे 'टीसीएस'कडून जतन

 

 वारसा जतन आणि संवर्धनात खासगी क्षेत्राला सहभागी करून घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र

  फडणवीस यांच्याकडून चालना

 मुंबईतील राजाबाई टॉवरग्रंथालय इमारतवस्तुसंग्रहालयाचे संवर्धन

 

मुंबईदि. 17 : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन व  संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या सहकार्यामुळे (टीसीएस) अधिक प्रभावीपणे होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी क्षेत्राला वारसा जतन आणि संवर्धनात सहभागी करून घेण्याच्या धोरणाला चालना दिली आहे. महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्मारके आणि नैसर्गिक परिसंस्थांच्या संरक्षणात 'टीसीएसआणि टीसीएस फाउंडेशन सक्रिय भूमिका बजावत आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून गेल्या दशकात मुंबईतील ऐतिहासिक राजाबाई क्लॉक टॉवर आणि मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय इमारतीच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवण्यात आला आहे.

मुंबईतील 156 वर्षे जुन्या राजाबाई टॉवरच्या बाह्य प्रकाशव्यवस्थेचे आधुनिकीकरण तसेच ग्रंथालयातील फर्निचरची दुरुस्ती व पुनर्स्थापना या कामांना शासनस्तरावर मिळालेल्या पाठबळामुळे गती मिळाली. या प्रकल्पासाठी 'टीसीएस'ने 8.90 कोटी रुपयांचे योगदान दिले असूनयुनेस्कोने 2018 च्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत या उपक्रमाची दखल घेतली आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (सीएसएमव्हीएस) यांच्या संवर्धन व पुनर्संचयितीकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. 'टीसीएस'ने या प्रकल्पासाठी टप्प्याटप्प्याने एकूण 24.79 कोटी रुपयांचे योगदान दिले. सन 2022 मध्ये युनेस्कोच्या आशिया-पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संवर्धन पुरस्कारांत अवॉर्ड ऑफ एक्सलन्स’ मिळवणारा हा प्रकल्प वास्तुशास्त्रीय व अभियांत्रिकी दृष्टिकोनातून आदर्श ठरला. गेल्या 100 वर्षांतील हे संग्रहालयाचे पहिले मोठे पुनर्संचयितीकरण कार्य ठरले आहे.

००००

कुतूहल, सर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया

 कुतूहलसर्जनशीलता आणि नवोपक्रमच देशाच्या प्रगतीचा पाया -   डॉ. अजय कुमार सूद

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात केंद्र सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार डॉ. अजय कुमार सूद म्हणाले कीभारतीय युवक हा जागतिक स्तरावर परिवर्तनाचा वाहक ठरत असूनकुतूहलसर्जनशीलता व नवोपक्रम यांचा संगम असलेले शिक्षण हे भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरणार आहे.

शिक्षण पद्धतीत कुतूहल-केंद्रित अध्यापनसंकल्पनात्मक समज आणि प्रत्यक्ष प्रयोगाधारित शिक्षण या तीन बदलांची गरज आहे. दर्जेदार शिक्षणरोजगारक्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती यामुळे भारताला जागतिक नेतृत्व प्राप्त होत असल्याचे डॉ. सूद यांनी सांगितले.

डॉ. सूद यांनी एस-लाइफ फ्रेमवर्कची संकल्पना मांडत विज्ञानाचे दैनंदिन जीवनाशी नातेप्रयोगशाळांचा पुनरुज्जीवनसंशोधनाचे अभ्यासक्रमात एकत्रीकरणविज्ञान महोत्सवांचे आयोजन आणि तरुणांचा डिजिटल सहभाग यावर भर दिला.भारत सरकारचा वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ (ONOS) उपक्रम संशोधन क्षेत्रात लोकशाहीकरण करत असूनदेशातील लाखो विद्यार्थी जागतिक दर्जाच्या संशोधनापर्यंत पोहोचू असल्याचेही ते म्हणाले. तसेचकृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित DPI 2.0 च्या माध्यमातून आरोग्यशेती आणि शाश्वत विकास क्षेत्रात परिवर्तन घडवण्याचे आवाहन त्यांनी केले.

महात्मा गांधीडॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार पटेल यांसारख्या दिग्गजांच्या पाऊलखुणांवर चालतआजचा युवक धैर्यसर्जनशीलता आणि वचनबद्धतेच्या बळावर सक्षम भारत घडवेलअशा शब्दांत डॉ. सूद यांनी नवस्नातकांना प्रेरित केले.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) रविंद्र कुलकर्णी यांनी अहवालाचे वाचन केले.

Featured post

Lakshvedhi