Thursday, 15 January 2026

जिल्हा कक्षाची स्थापना

 जिल्हा कक्षाची स्थापना

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाभ मिळवण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पूर्वी मुंबईत यावे लागत असे. त्यामुळे वेळ आणि पैसा खर्च होत होता. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत

 मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत

 

मुंबईदि. 12 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व सकारात्मक बदलांचा परिणाम  स्पष्टपणे दिसून आला असून, डिसेंबर 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत राज्यातील 35 हजार 362 रुग्णांना 299 कोटी 43 लाख 52 हजार 400 वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे.

कक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करण्यात आली. भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत करता यावीयासाठी त्रिपक्षीय करारआरोग्य विषयक सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण आदी उपक्रमांमधून गरजू रुग्णांसाठी मदतीचे मार्ग आणखी सुलभ होणार आहेत.

आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प

 ब्रुकफिल्डचे वरिष्ठ गुंतवणूक अधिकारी  अंकुर गुप्ता म्हणाले आशिया खंडातील कार्यालय विकास क्षेत्रात नवा मापदंड ठरेल असा हा आयकॉनिक प्रकल्प आम्ही उभारत आहोत.   मुंबईत करण्यात आलेली गुंतवणूक आता अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. उच्च दर्जाचीशाश्वत आणि आधुनिक कार्यस्थळे निर्माण करण्यासाठी ब्रुकफिल्ड कटिबद्ध आहे.

ब्रुकफिल्ड ही भारतातील सर्वात मोठ्या कार्यालयीन मालक आणि ऑपरेटर कंपन्यांपैकी एक असून देशातील सात शहरांमध्ये सुमारे 55 दशलक्ष चौरस फूट क्षेत्राचे व्यवस्थापन करते. उच्च दर्जाच्याग्रेड-प्रकल्पांची विकास व संचालन क्षमता कंपनीने सातत्याने सिद्ध केली आहे. पवईतील प्रस्तावित प्रकल्पाला उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीसामाजिक सुविधा व मोठ्या प्रमाणातील कुशल मनुष्यबळाचा लाभ मिळणार आहे.

जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट

 मुख्यमंत्री म्हणाले की, ही उभारणी महाराष्ट्रातील गुंतवणूकदार-अनुकूल वातावरणाबाबत जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास अधोरेखित करणारी आहे. प्रकल्पासाठी 100 टक्के हरित उर्जेचा वापर करण्याचे उद्दिष्ट असून इमारत बाजारातील सर्वोत्तम शाश्वत बांधकाम मानकांनुसार उभारली जाणार आहे. यामुळे मुंबईचे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर हब म्हणूनचे स्थान आणखी मजबूत होणार आहे.

2024 मध्ये ब्रुकफिल्डने पुण्यात एका मोठ्या वित्तीय सेवा कंपनीसाठी बिल्ड-टू-सूट’ टॉवर उभारला होता. याच वर्षी MMRDA सोबत 12 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. जून 2025 मध्ये कंपनीने बांद्रा-कुर्ला संकुलात 2.1 एकर जागा खरेदी केली आहे.

मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास दृढ झाला

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया मोठ्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत जागतिक स्तरावर विश्वास  दृढ झाला आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्याबरोबरचस्थिर आणि सक्षम वातावरण पुरवण्यास राज्य शासन तत्पर आहे.

सदर प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण होणार असूनयामध्ये अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच 30,000 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) व ब्रुकफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली भागीदार  बी. एस. शर्मा यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार

 आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार

 

मुंबईदि.12: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील प्रतिभापायाभूत सुविधा आणि व्यवसाय-अनुकूल वातावरण या तीन घटकांमुळे महाराष्ट्र ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी अग्रगण्य ठरत आहे. यावर्षी जाहीर केलेले नवीन GCC धोरण राज्यात उच्च मूल्याच्याकौशल्याधारित रोजगारनिर्मितीस प्रोत्साहन देईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे एकर जागेवर 20 लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार 20 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील

 बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026 साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही या वृत्तात सांगितले जात आहे.

याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे कीमतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळेमाध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.


Featured post

Lakshvedhi