Thursday, 15 January 2026

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने

 मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेलअशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावीतसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावीअशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नयेअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. 

शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

 शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास

पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही

 

मुंबईदि. 15: बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईलअसे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.

बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाहीयाबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत.

मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्‍य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेलअशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावीतसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावीअशा सूचना यापूर्वी देखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नयेअसे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. 

समृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी इंधन स्थानके व स्नॅक्स सेंटर

   राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितलेसमृद्धी महामार्गावर सध्या २२ ठिकाणी इंधन स्थानके व स्नॅक्स सेंटर स्वच्छतागृहासह कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून २१ ठिकाणी प्रत्येकी २० असे एकूण ४२० एफआरपी स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याची देखभाल व स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. महामार्गावर सात ठिकाणी तात्पुरत्या हॉटेलची व्यवस्था करण्यात आली असून उर्वरित ठिकाणी महामार्ग सुविधा विकसित करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

नागपूर - मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग विदर्भ

 राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्यानागपूर - मुंबई हा ७०१ किलोमीटर लांबीचा  समृद्धी महामार्ग विदर्भ मराठवाड्याला समृद्ध करणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना करण्यास सर्वोच्य प्राधान्य दिले आहे. तसेच  या महामार्गावर विविध पार्क उभारून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार; एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन

 समृद्धी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार

एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन

- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

          नागपूरदि. १२ :- नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत व उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. तसेच अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळावी यासाठी नागपूर ते मुंबईदरम्यानच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविल्या जाणार आहेत. या महामार्गावर एअर ॲम्बुलन्स सेवा सुरू करण्याचे विचाराधीन असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.

खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा

 खारघर सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) हा खारघर सेक्टर- १६ येथील डीएव्ही स्कूल येथे सुरू होऊन सीबीडी बेलापूर मार्गे सीवूड्स सेक्टर-५२ मधील डीपीएस शाळेजवळ पाम बीच रोडला जोडला जाईल. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नवीन पनवेल रोडसाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उत्तरेकडील रस्ता उपलब्ध असून हा रस्ता जोड रस्त्यामार्फत खारघर कोस्टल रोडला जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन  असल्याचे राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

          तसेच विकास प्रकल्पांच्या कामात सदस्यांनी सुचविलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले.


विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडको, पीएमसी, लोकप्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित

 विकास प्रकल्पांच्या देखरेखीबाबत सिडकोपीएमसीलोकप्रतिनिधींची

संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासन उचित निर्णय घेईल

- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

नागपूर दि. १२ :-  सिडकोपीएमसी हद्दीतील विकासकामाचे नियोजनप्रगतीपथावर असलेल्या विकासकामांवर देखरेखनियंत्रण यासाठी महानगरपालिका प्रतिनिधीसिडको प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर उचित निर्णय घेण्यात येईलअसे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत सांगितले.

          सदस्य विक्रांत पाटील यांनी या संदर्भात विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या चर्चेत सदस्य प्रविण दरेकर यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi