Wednesday, 14 January 2026

पोलीस बंदोबस्त

 पोलीस बंदोबस्त

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात  3 अपर पोलीस अधीक्षक, 63 पोलीस उप अधीक्षक, 56 पोलीस निरीक्षक, 858 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि 11 हजार 938 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर 42 हजार 703 होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण 57 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 

राजकीय पक्षांची बैठक

 राजकीय पक्षांची बैठक

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीची तयारीतसेच 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गच्या 125 पंचायत समितींच्या निवडणुकांची तयारी याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणीपोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदानमतमोजणीतसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत उपस्थित प्रतिनिधींना अवगत करण्यात आले.

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था

महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केली आहे.

बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील. काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असू शकतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने साधारणत: 4 मते देणे अपेक्षित आहे. काही ठिकाणी 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग असून यासह सर्व महानगरपालिका मिळून 893 प्रभाग आहेत. त्यात 2 हजार 869 जागांचा समावेश आहे. त्यासाठी 15 हजार 908 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

 महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

                                             

मुंबईदि. 14 : राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात 15 हजार 908 उमेदवार आहेततसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा 15 डिसेंबर 2025 रोजी केली होती. त्यानुसार बृहन्मुंबईछत्रपती संभाजीनगरनवी मुंबईवसई- विरारकोल्हापूरकल्याण- डोंबिवलीठाणेउल्हासनगरनाशिकपुणेपिंपरी- चिंचवडसोलापूरअकोलाअमरावतीनागपूरचंद्रपूरलातूरपरभणीभिवंडी- निजामपूरमालेगावपनवेलमीरा- भाईंदरनांदेड- वाघाळासांगली- मीरजकुपवाडजळगावधुळेअहिल्यानगरइचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदान होत आहे.

मतदान सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणीस संबंधीत ठिकाणी 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरवात होईल. मतदारांमध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिलातर 4 हजार 596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांपैकी एकूण 3 हजार 196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.

हिंद दी चादर: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्याग आणि बलिदानाची अमर गाथा

 हिंद दी चादर: श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या

त्याग आणि बलिदानाची अमर गाथा

 

            मानवतेच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्वे होऊन गेलीज्यांनी केवळ स्वतःच्या धर्मासाठी नव्हेतर दुसऱ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि मानवाधिकारांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे त्यापैकीच एक महान युगपुरुष आहेत. त्यांच्या ३५० व्या शहिदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या अतुलनीय बलिदानाचे स्मरण करणेहे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त राज्यातील नांदेडनागपूर व नवी मुंबई येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि "हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वी शहिदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समिती"शीख- सिकलीकरबंजारा लबानामोहियालसिंधी व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

            श्री गुरु तेग बहादुर हे शिख धर्माचे ९ वे गुरू होतेत्यांना हिंद दी चादर म्हणून ओळखले जाते. श्री गुरु तेग बहादुर यांनी शिख धर्मात प्रार्थनापरोपकारसेवासाधेपणाइतरांच्या सेवेला महत्‍त्व आणि निर्भीडपणा यांचा प्रचार केलात्यांचे प्रवचन व भजन यांचा "गुरु ग्रंथ साहिब" यामध्ये देखील समावेश आहे. श्री गुरु तेग बहादुर यांनी १७ व्या शतकामध्ये तत्कालीन शासनकर्त्यांच्या अन्याय व अत्याचाराविरूद्ध आवाज उठवून धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी बलिदान देऊन भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक अस्मितेचे रक्षण केले. त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण भारतात तसेच शिख धर्मात शौर्य आणि त्यागाची परंपरा अधिक मजबूत झाली. मुघल सम्राटांच्या विरोधात जाऊन भाई लकीशा बंजारा यांनी नववे गुरु तेग बहादूर यांच्या पवित्र शरीरास आपला तांडा व घर जाळून अग्नी दिला. या बाबीस भारतीय इतिहासात अनन्य साधारण महत्‍त्व आहे.

'हिंद दी चादरउपाधीचा अर्थ

गुरु तेग बहादूर यांना 'हिंद दी चादर' (भारताची ढाल) असे आदराने संबोधले जाते. जेव्हा मुघल शासकाच्या अत्याचाराने सीमा ओलांडली होती आणि बळजबरीने धर्मांतर सुरू होतेतेव्हा त्यांनी निधड्या छातीने उभे राहून भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.

अतुलनीय बलिदान आणि धैर्य

गुरुंना आणि त्यांच्या अनुयायांना दिल्लीत कैद करण्यात आले. त्यांना धर्मांतरासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. मनोधैर्य खचवण्यासाठी त्यांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या तीन प्रिय शिष्यांना क्रूरपणे शहीद करण्यात आले. तरीहीगुरु तेग बहादुरजी आपल्या तत्त्वांवर ठाम राहिले. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी दिल्लीतील चांदणी चौकात (आजचे शीशगंज साहिब) त्यांनी शीश दिलेपण आपला धर्म आणि तत्व (सार) सोडले नाही.

गुरु तेग बहादुर शिकवण : निर्भयता

गुरु तेग बहादूर यांची शिकवण आजही तितकीच प्रासंगिक आहे. त्यांनी संदेश दिला:

"भै काहू को देत नहिनहि भै मानत आन" (अर्थात: ना कोणाला भीती दाखवाना कोणापासून घाबरा.)

त्यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हतेतर ते धार्मिक स्वातंत्र्यमानवाधिकार आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचे प्रतीक होते.

 

३५० व्या शहिदी दिनाचे महत्त्व

            आज जेंव्हा आपण त्यांचा ३५० वा शहिदी दिवस साजरा करत आहोततेव्हा आपण केवळ एका ऐतिहासिक घटनेची आठवण काढत नाही आहोततर त्या विचारांना नमन करत आहोतज्यांनी भारताचा आत्मा जिवंत ठेवला. आजच्या समाजात जेव्हा द्वेष आणि असहिष्णुता डोकं वर काढतेतेव्हा गुरु तेग बहादुर साहिबजींचा त्याग आपल्याला आठवण करून देतो की, "दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणेहाच खरा धर्म आहे."

 

                                                       

महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन मुंबई शहर

 महिला लोकशाही दिनाचे १९ जानेवारी रोजी आयोजन

 

मुंबईदि. १४ : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर यांच्या वतीने महिला लोकशाही दिन दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार  महिला लोकशाही दिन सोमवार,  १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयमुंबई शहर येथे आयोजित करण्यात येणार आहेअसे मुंबई शहरच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

या उपक्रमांतर्गत पीडित महिलांना त्यांच्या तक्रारी व अर्ज सादर करण्यासाठी जिल्हा पातळीवर सुलभ व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय२१५ बी.बी.डी. चाळपहिला मजलावरळीमुंबई – ४०००२५ येथे तक्रार अर्जाचा नमुना उपलब्ध आहे.

तक्रार दाखल करताना अर्ज निर्धारित नमुन्यात भरावा. तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणेअपूर्ण अर्जधर्म व राजकारण विषयक बाबी अथवा वैयक्तिक स्वरूप नसलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीतअसेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी घेतली

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदिच्छा भेट

 

मुंबई,दि. १४ :  राज्यातील कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जपानमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून येत्या तीन महिन्यात याबाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जपानच्या होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी मंत्रालयात कौशल्य मंत्री लोढा यांची शिष्टमंडळासह भेट घेतली.

 यावेळी कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची जपानमध्ये मोठी मागणी असल्याच्या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या संधीबाबत चर्चा करण्यात आली. कौशल्य विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माव्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जपानच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे वरिष्ठ संचालक तोशिनोरी नाईतोपरदेशी मनुष्यबळ विभागाचे संचालक ईजी यामामोटो तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाचे संचालक माकोतो ताकाहाशीआंतरराष्ट्रीय व्यवसाय विनिमय विभागाच्या प्रमुख हिरोए मिकामी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाषांतराची जबाबदारी दुभाषी युका इगाराशी यांनी पार पाडली.

होक्काईडो हा जपानच्या उत्तरेकडील प्रांत असूनजपानचा जवळपास २२ टक्के भाग या प्रांताने व्यापला आहे. या प्रांतात कृषीमत्स्य, उद्योगबांधकाम आणि पायाभूत सुविधा तसेच नर्सिंग क्षेत्रात मनुष्यबळाची नितांत गरज आहे. त्यानुसार कुशल मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी होक्काईडो प्रांताने आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून या प्रांताच्या शिष्टमंडळाने कौशल्य, रोजगारउद्योजकता व नावीन्यता मंत्री लोढा यांची भेट घेतली.

कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले कीजागतिक स्तरावर भारतीय मनुष्यबळ क्रियाशील ठेवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा कौशल्य विकासावर अधिक भर आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील कौशल्य विभाग कार्यरत असून विविध देशांमध्ये राज्यातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. विद्याविहार येथील स्वामी विवेकानंद कौशल्य विकास प्रबोधनीद्वारे कौशल्य प्रशिक्षण आणि जपानी भाषेचे शिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचेही कौशल्य मंत्री लोढा यांनी सागितले.

जपानमध्ये कृषीवैद्यकीयविविध तंत्रज्ञबांधकाम आणि सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे. भारतीय युवक अधिक कार्यक्षमतेने काम करत असून भारतीय कौशल्य प्रशिक्षित तरुणांना जगभरात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे होक्काईडो प्रांताचे उपराज्यपाल कानो ताकायुकी यांनी सांगितले.

Featured post

Lakshvedhi