Thursday, 15 January 2026

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार

 पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमणार

मंत्री डॉ.उदय सामंत

नागपूरदि. 12 : पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली समिती आहे. मात्र लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात येईलअसे मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.

पुणे महापालिका हद्दीतील वाहतूक कोंडीबाबत सदस्य भीमराव तापकीर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री डॉ. सामंत बोलत होते.

            मंत्री डॉ. सामंत म्हणाले कीपुणे महापालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक नियोजन विभाग आणि ट्रॅफिक प्लॅनर नेमण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीमध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल.

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

 राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते. यावेळी सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसीयांना तत्काळ सोपविण्यात येणार आहेज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा

 साडेसतरानळी येथील अॅमनोरा मॉल ते पाईपलाईन या १८ मीटर आर.पी. रस्त्यात अडथळा निर्माण करणारी झाडे छाटणे किंवा स्थलांतरित करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागितली असूनपरवानगी मिळाल्यानंतर झाडे छाटणेपुनर्रोपण व वृक्षारोपणाची कार्यवाही पथ विभागामार्फत करण्यात येणार आहे.

साडेसतरानळी गावाजवळील यश हॉस्पिटल परिसरात पावसाचे पाणी साचणे व रस्ता खराब होण्यामुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. तसेच लेबरशेड मजूरवस्तीची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने संबंधित मालकाशी ती ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू असूनजागा ताब्यात आल्यावर रस्ता विकासाची प्रक्रिया गतीमान केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हडपसर परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी गती देणार

 हडपसर परिसरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी गती देणार

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

नागपूरदि. १२ : हडपसर परिसरातील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असूनविविध प्रकल्पांची कामे गतीमान करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य उमा खापरे यांनी हडपसर परिसरातील नागरी समस्यांविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले कीस्वागत हॉटेल जवळील मार्वल ब्यूटी ते साधना बँक जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास पावसाळ्यात विलंब झाला होता. मात्रसध्या हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनचे आवश्यकतेनुसार काम पूर्ण झाले आहे. चढावाच्या भागाला योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठीचा बूस्टर पंप बसविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

 राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार

- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर, दि. १२ : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये आकृतीबंधानुसार पदभरती करणार असून वित्त विभागाकडे पाठपुरावा करून लवकर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सतिश चव्हाण यांनी कृषी विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती. लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल बोलत होते. यावेळी सदस्य अमोल मिटकरी आणि सदाभाऊ खोत यांनी चर्चेत सहभाग घेतला.

            सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसीयांना तत्काळ सोपविण्यात येणार आहेज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल. पुढील अधिवेशनात हा विषय पुन्हा उपस्थित करण्याची गरज भासणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हडपसर–लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरला गती

 हडपसरलोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरला गती

महामेट्रोकडून 11.8 कि.मी. लांबीच्या मेट्रोला मंजुरी दिली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. फ्लायओवर क्रॉसिंगसारख्या तांत्रिक अडचणींसाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले असून फिजिबिलिटी तपासणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहेअसेही त्यांनी सांगितले.

या कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवत प्रकल्पांच्या परवानग्याभूसंपादन आणि कामांची गती यावर नियतकालिक आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

सोलापूर- पुणे रस्त्या संदर्भात बैठक झाली असून हे काम करण्यात येईलअशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.

0000

रस्ते प्रकल्पांना वेग

 रस्ते प्रकल्पांना वेग

            पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी एमएसआयडीसीकडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसरयवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणेशिरूर या सहा पदरी रस्त्याला मंत्रिमंडळने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूरछत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.  तळेगावचाकणशिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहेअशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.

Featured post

Lakshvedhi