मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीवर आहे. आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे. केंद्र शासनाचे यात सहकार्य मिळत असून या प्रकल्पांना गती मिळणार आहे. नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 14 January 2026
महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य
महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार
• करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मितीत वाढ होणार या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार
• पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार
नागपूर, दि. १० : राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६,११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे.महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५,८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे. या प्रकल्पात २३,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११,५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
थोडक्यात विकास आराखडा
थोडक्यात विकास आराखडा
स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय, 82 आसनी क्षमतेचा 10 डी शो सभागृह, प्रशासकीय इमारत, ग्रंथालय, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, 350 मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत.
समाधी स्थळ वढू बु येथे संग्रहालय, प्रशासकीय इमारत, स्मरणिका दुकाने, प्रवेशद्वार, १२० मीटर लांबीचा नदी घाट, वाहनतळ, शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत. तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची ' व्हिविंग गॅलरी' असणार. तसेच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भीमा नदीवरील पुलाची
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, भीमा नदीवरील पुलाची रुंदी वाहतुकीला पर्याप्त असावी. पूल आणि व्हिविंग गॅलरी येथे येणाऱ्या प्रत्येकाने बघावी, अशा पद्धतीने निर्मित करावी. प्रस्तावित तुळापूर ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी. छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथे महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुन्हा येण्याची इच्छा होईल, अशा पद्धतीने विकास करावा.
भीमा नदीवरील हा पूल 'व्हिवींग गॅलरी'सह
भीमा नदीवरील हा पूल 'व्हिवींग गॅलरी'सह असावा. पुलाची रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील इतिहासाची आठवण करून देणारी असावी. पूल दर्जेदार निर्मित करून नदीच्या घाटाचे कामही इतिहासाची आठवण करून देणारे असावे. नदी घाट आणि पुलावर प्रकाश योजना आणि सौंदर्यीकरण दर्जेदार असण्याबरोबर या ठिकाणी गाईडना प्रशिक्षण देण्यात यावे. त्यांना संपूर्ण ऐतिहासिक संदर्भांची माहिती असावी. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण येथे येणाऱ्या प्रत्येकाला व्हावी, अशा पद्धतीने विकास कामे करावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाला नमन करण्यासाठी तुळापूर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाला नमन करण्यासाठी तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत. त्यामुळे तुळापूर - वढू बु. रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात यावा. सध्या 14 किलोमीटरचा रस्ता असून नागरिकांना तुळापूरहून वढू बुद्रुक येते येण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागतो. भीमा नदीवरील पूल केल्याने हा रस्ता साडेसहा किलोमीटरचा होईल. त्यामुळे दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता; तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता;
तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात
ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तुळापूर व मौजे वढू बु. विकास आराखडा शिखर समिती बैठक
नागपूर, दि. 10 : स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर (ता. हवेली) व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक (ता. शिरूर) दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पूल विकासकामांचा अंतर्भाव असलेल्या 532.51 कोटी किमतीच्या विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे. या दैवताचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...