Wednesday, 14 January 2026

नक्षल चळवळीला विकासकामांनी उत्तर

 नक्षल चळवळीला विकासकामांनी उत्तर

गडचिरोली जिल्ह्यातील 17.30 किलोमीटर लांबीच्या धोडराज - निलगुंडा - कवंडे रस्त्याची निर्मिती करण्यात येणारकवंडेच्या पुढे कोरमा नाला पूल आणि बेद्रे पुलाची निर्मिती करण्यात येऊन पुढे बिजापूर पर्यंत रस्ता जोडणी देण्यात येणार येईल . इंद्रावती नदीवर दामरंचा ते सांद्रा मार्गावर ७५० मीटर लांबीच्या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात उत्तम संपर्क यंत्रणेसाठी 2022 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात 271 मोबाईल टॉवर त्यामध्ये भरीव वाढ होऊन 2023 ते 25 दरम्यान 521 नवीन मोबाईल टॉवरची निर्मिती करण्यात आली आहे.

००००

थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..

 ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी अभियानाची  पार्श्वभूमी सांगितली. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाला अभिनेते भारत गणेशपुरेसंदीप पाठकपृथ्वीक प्रतापअभिनेत्री शिवाली परबविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

थोडक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान..

ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतपंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्या स्तरावर केंद्रराज्य शासनाच्या सर्व योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्पर्धा व्हावीया स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतराज संस्थांना प्रोत्साहन देऊन त्यांची कार्यक्षमता वाढावीयासाठी तालुकाजिल्हामहसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर स्पर्धात्मक स्वरुपात सन 2025-26 या वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्‍यात येत आहे.

ग्रामपंचायत सक्षमसुशासनयुक्तजलसमृद्धस्वच्छ व हरित गाव निर्माण करणेमनरेगा व इतर योजनांशी अभिसरणउपजिविका विकास व सामाजिक न्यायलोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ हे या अभियानाचे मुख्य घटक आहेत. या अभियानांतर्गत विविध स्तरांवर पुरस्कार दिले जाणार आहेत.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज

 गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करावे. ग्रामपंचायत डिजिटलस्वयं अर्थपूर्ण असाव्याततसेच गावांचा  पर्यावरणपूरक  विकास करण्यात यावायासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामसभांना या अभियानासाठी सहकार्य करणारे कलाकार उपस्थित राहणार आहेतअसे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांमध्ये समृद्धीची स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी  अभियानात  सक्रिय सहभाग घेऊन अभियान यशस्वी करावेअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

मागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमागील दहा वर्षात राज्यामध्ये कुठल्याही अभियानाची यशस्वीता बघितलीतर त्यामध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे निदर्शनास येते. कुठलेही अभियान लोकसहभागाशिवाय यशस्वी होत नाही. जलयुक्त शिवार अभियान हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे जलसाक्षरता वाढून राज्य जलसंपन्न होण्यास मदत झाली. जलयुक्त शिवार अभियानाच्या अंमलबजावणीतून महाराष्ट्र रोल मॉडेलम्हणून देशात पुढे आले. यासोबतच नरेगा ११ कलमी कार्यक्रम,  मागेल त्याला शेततळे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीताचे लोकार्पण

 

नागपूरदि. १२ : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या पूर परिस्थितीमुळे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला होता. मात्र आता नव्याने अभियानाला सुरुवात करण्यात आली असून या अभियानाच्या अंमलबजावणीतून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधान भवन येथील मंत्रिपरिषद सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम पार पडला. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सरपंचग्रामविकास अधिकारीगटविकास अधिकारीमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान · दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग

 श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान

·         दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग

·         नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

·         २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

 

नांदेडदि. १३ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नयेयासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला.

 

या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील १,५०० विद्यार्थीॲकॅडमीचे ५०० विद्यार्थी  महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. श्रमदानाद्वारे मैदानावरील खडे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईकक्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुराजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळेतहसीलदार आनंद देऊळगावकरशिक्षणाधिकारी माधव सलगररेडक्रॉसचे हर्षद शहामनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवारउपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे आदी उपस्थित होते.

 

खालसा हायस्कूलराजर्षी पब्लिक स्कूलनागार्जुना हायस्कूलसचखंड पब्लिक स्कूल यासह पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थीविविध एनजीओसोल्जर ॲकॅडमीतोटेवाड फिजिकल ॲकॅडमीनांदेड फिजिकल व गरुडा फिजिकल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

 

या श्रमदानातून गुरुप्रती सेवासमर्पण व प्रेमाची अनुभूती अनुभवास मिळाली. नांदेड येथे सिख धर्मियांचे एक महत्त्वाचे तख्त असल्याने या शहीदी समागम कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्व  आहे. या कार्यक्रमात विविध धर्म व समुदायांचे भाविक सहभागी होणार आहेत. तरी सर्वांनी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले.

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

 पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

मुंबईदि. १३ :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार १३ जानेवारी २०२६  रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावी. तसेच सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावेअसे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.


Featured post

Lakshvedhi