Saturday, 10 January 2026

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

 जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा

-मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

 

मुंबईदि. ३० :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी  दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते.

बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीपमत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडेमित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते.

निर्यात प्रक्रिया सुरू करण्यासाठी लागणारी सर्व  मदत विभाग करेल असे सांगून मंत्री राणे म्हणाले कीकोकणातील उत्पादने लवकरात लवकर आणि सहज निर्यात होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. बंदराला जोडणी होण्यासाठी कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गतीने हाती घेण्यात येत आहे. उत्पादन तपासणी प्रयोगशाळा १५ जानेवारीपर्यंत सुरू करावी. यंदाच्या हंगामात काजू जयगड बंदरातून निर्यात होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी तयारी करावी. उत्पादकांमध्ये जागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करावे असेही मंत्री राणे यांनी सांगितले.

वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहनcons.caracas@mea.gov.in

 वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी'

नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली 4: वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहताभारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावेअसे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसारजे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेतत्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावेअशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेचकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असूननागरिक cons.caracas@mea.gov.in  या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावेअसे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

 नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे सहज उपलब्ध व्हावीतयासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यात अधिक विस्तारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णांवरील औषध खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

 क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तपासणी मोहीम व्यापक करणेउपचारांमध्ये सातत्य राखणे आणि रुग्णांना पोषण सहाय्य देणेनिक्षय मित्र यांचे मार्फत फूड बास्केट देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यातील क्षय रोगाच्या रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनामार्फत 96 अतिरिक्त हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन राज्याला देण्यात येणार आहेत.

संतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे

 मुख्यमंत्री  म्हणाले कीसंतमत अनुयायी आश्रमांचे कार्य समाजाला  सेवेकडे आणि प्रेमाकडे नेणारे आहे. मानवसेवासमताप्रेम व सद्भावना या मूल्यांच्या जपणुकीसाठी आश्रमाचे योगदान अमूल्य असूनहेच संतमत परंपरेचे खरे स्वरूप आहे.

संतमत परंपरेतील परमहंस महाराजांनी जात-पात व भेदभावाला विरोध करून मानवधर्म प्रधान मानला. त्यांनी आत्मज्ञानअहंकार,त्याग व मानवसेवेचा संदेश दिला. भारतीय संस्कृतीतील गीता ही केवळ विचारधारा नसूनसंस्कृती व सभ्यता जपत उत्तम जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृती जपण्याचे महान कार्य संतपरंपरेने केले आहेअसेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळी, घसा, आवाज

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास’ मध्ये मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणेनिदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

           

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तलाळ ग्रंथीनाकसायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावरगिळण्यावरश्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवरमुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणेवेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या

 पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 

मुंबईदि.५ : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावेअसे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजन दिले जाते. तरी. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे १२ ते १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील सीडीएस ६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :-

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

व) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यानी प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे ,ayjnihh-mum@nic.in

 सचिव मुंढे म्हणालेअली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल तसेच संस्थेच्या अधिकृत तपासणीवर आधारित नसलेले अहवाल राज्य व केंद्र शासनाच्या विविध सवलती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडे सादर केले जात असल्याचेही काही ठिकाणी आढळून आले आहे.

   

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्राधिकरणांनी यूडीआयडी कार्ड या संस्थेमार्फत जारी केल्याचे दर्शविण्यात येणारे सर्व श्रवण व भाषण तपासणी अहवाल पडताळणीसाठी संस्थेच्या अधिकृत ayjnihh-mum@nic.in ई-मेल पत्त्यावर पाठविणे अनिवार्य असल्याचे प्रसिद्धीपत्रक अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटने काढले आहे. त्यानुसार कार्यालयांनी तत्काळ कार्यवाही करावी तसेच चुकीची माहिती देऊन दिव्यांगांचे प्रमाणपत्र अथवा लाभ घेऊ नये असे आवाहन सचिव मुंढे यांनी केले आहे.

Featured post

Lakshvedhi