Saturday, 10 January 2026

एकत्रित आयुष्मान भारत–महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील उपचारांची संख्या २,३९९

 एकत्रित आयुष्मान भारतमहात्मा फुले जन आरोग्य योजनेतील

उपचारांची संख्या २,३९९

मुंबईदि. १८ : राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण आणि रुग्णहिताचे निर्णय घेतले आहेत. या सुधारणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना अधिक व्यापकदर्जेदार आणि कॅशलेस आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

या सुधारणांतर्गत उपलब्ध उपचारांची संख्या १,३५६ वरून थेट २,३९९ पर्यंत वाढविण्यात आली असून त्यात गंभीर तसेच विशेष उपचारांचा समावेश मोठ्या प्रमाणात झाला आहे. यासोबतच रुग्णालयांना शासनाकडून मिळणाऱ्या उपचारांच्या दरात वाढ करण्यात आली असून अनेक पॅकेजेसमध्येही सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णालयांचा सहभाग वाढून रुग्णांना अधिक चांगल्या सेवा मिळणार आहेत.

 

उपचारांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी एनएबीएच व एनव्यूएएस यांसारखी गुणवत्ता मानके पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना दावा रकमेवर अतिरिक्त १० ते १५ टक्के प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दर्जेदार उपचारांना चालना मिळणार आहे.

राज्यातील २१ जिल्ह्यांत सिकलसेल तपासणी विशेष मोहीम

  

राज्यातील २१ जिल्ह्यांत सिकलसेल तपासणी विशेष मोहीम

– आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि १८ : सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा मोहिमेअंतर्गत राज्यातील सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांतील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी झाली पाहिजे. एकही नागरिक सिकलसेल तपासणीपासून वंचित राहू नयेयाची काटेकोर दक्षता घेण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

 

आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या मंत्रालयीन दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक झाली. या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रनआरोग्य आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाडसहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाईत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दि१८ डिसेंबर ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल अभियानाची पूर्व तयारी करण्यात येईल. त्यानंतर दि. १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेदरम्यान सिकलसेल आजाराचे प्रमाण अधिक असलेल्या २१ जिल्ह्यांमध्ये एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नयेयासाठी सर्व यंत्रणांनी प्रभावी नियोजन करावे. सिकलसेल आजाराचे लवकर निदानरुग्णांना योग्य उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असूनराज्यात एकही सिकलसेल रुग्ण तपासणीपासून वंचित राहू नयेअसेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

औद्योगिक वसाहतीमध्ये हवा प्रदूषणाची

 औद्योगिक वसाहतीमध्ये हवा प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी फिरत्या वाहनाद्वारे वायू गुणवत्ता निरीक्षण केले जात आहे. तसेच वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेले सांडपाणी न पाठविणाऱ्या 53 उद्योगांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

००००.

छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये जल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया युनिट

 छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज औद्योगिक वसाहतीमध्ये जल प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया युनिट कार्यरत आहे. येथील सांडपाण्यावर 100 टक्के पुनर्वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे प्रक्रिया केलेले पाणी खाम नदीत न सोडता त्याचा पुनर्वापर होण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात यावीअसे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिल्या.

 

जालना औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उद्योगामुळे हवेत धुलीकणांमुळे प्रदूषण

 जालना औद्योगिक वसाहतीमध्ये स्टील उद्योगामुळे हवेत धुलीकणांमुळे प्रदूषण होत आहे. यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या  आहेत. या धुलिकणांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे धुलीकणांवर नियंत्रणासाठी संबंधित कंपन्यांनी प्राथमिक हवा प्रदूषण नियंत्रण संयत्रणांमध्ये सुधारणा करून घेण्यासंबंधी त्यांना कळविण्यात यावे. जे अशी यंत्रणा उभारणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.

जालन्यामधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

 जालन्यामधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

- पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

 

मुंबईदि. 18 : जालना व छत्रपती संभाजीनगरमधील प्रदूषण कमी करण्यासंदर्भात पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. जालनामधील हवा प्रदुषणासंदर्भात चिंता व्यक्त करून प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत. तसेच उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन प्रदूषण करणाऱ्या उद्योगांविरुद्ध तातडीने कारवाई करण्याच्या सूचना पर्यावरण मंत्री मुंडे यांनी यावेळी दिल्या.

 

            जालना औद्योगिक वसाहत तसेच छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंजशेंद्राऑरिक सिटी औद्योगिक वसाहतींमधील वायू व जल प्रदूषणासंदर्भात आज पर्यावरण मंत्री मुंडे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोजमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंगसहसंचालक (हवा प्रदूषण) सतीश पडवळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारीऔद्योगिक विकास महामंडळाचे व जिल्हा प्रशासनातील अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

 मुंबई (पूर्व) आरटीओत MH03FB नवीन नोंदणी मालिका सुरू

 

मुंबईदि.१८ : मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन MH03FB ही मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली MH03ES मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका २२ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.

 

या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावाओळखपत्रपॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित फी राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह Regional Transport Office, Mumbai (East) किंवा RTO, Mumbai (East) यांच्या नावे काढून २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

 

एकाच नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यासमहाराष्ट्र शासनाच्या ३० ऑगस्ट २०२४ च्या अधिसूचनेनुसार नियमीत फी व्यतिरिक्त सर्वांत जास्त रक्कमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास तो नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे.

 

आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक देण्याची सविस्तर कार्यपद्धती कार्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात आली असूनअनधिकृत व्यक्तीकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतःच आरटीओ कार्यालयात अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

 

अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयमुंबई (पूर्व)२ रा व ३ रा मजलाबी-२ इमारतवडाळा ट्रक टर्मिनलवडाळामुंबई ४०० ०३७ (इमेल : rto.03-mh@gov.inदूरध्वनी क्र. ०२२-२४०३६२२१) येथे संपर्क साधावा.

0000

संजय ओरके/विसंअ

Featured post

Lakshvedhi