Friday, 9 January 2026

संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळखकांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात

 संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा

 

मुंबईदि.4 — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची  जगात ऐतिहासिक ओळख  निर्माण झाली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रमसिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  माजी मंत्री कृपा शंकर सिंहमाजी खासदार गोपाळ शेट्टीआमदार अमित साटमआमदार अतुल भातखळकरआमदार प्रवीण दरेकरसंतमत अनुयायी आश्रम ट्रस्टचे सचिव राधेश्याम यादव यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसंतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली.संतमत परंपरेत मानवसेवासमताप्रेम व सद्भावना ही केवळ तत्त्वे नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. या मूल्यांच्या प्रसारासाठी श्री सद्गुरु  शरणानंदजी महाराज परमहंस यांच्या अनुयायांच्या माध्यमातून संतमत अनुयायी आश्रमद्वारे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू आहेत.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रत्येकाने नेमून दिलेली जबाबदारी पार पाडावी

 - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

·         २५ समित्यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे नियोजन

·         हिंद-दी-चादर शहीदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासन सज्ज

 

नांदेडदि. ५ :हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शासकीय अधिकारीकर्मचारीगुरुद्वारा प्रशासन तसेच विविध समाजातील अशासकीय सदस्यांचा सहभाग असलेल्या २५ विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धनियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक समितीने नेमून दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.

शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने

 शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपीया गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.

"राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल"असा इशारा अन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

 दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्थांनी ३१ जानेवारीपर्यंत नोंदणी करावी

 

             मुंबईदि. ६ : मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात अनेक संस्था विना नोंदणी कार्य करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अशा संस्थांची कायद्यानुसार नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व संस्थांनी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगर रविकिरण पाटील यांनी केले आहे.

 

              दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली ७ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांची नोंदणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग कल्याण आयुक्तांना सक्षम अधिकारी घोषित करण्यात आले असूनत्यांच्यामार्फत संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.

 

            दिव्यांग क्षेत्रात कार्य करण्यासाठी दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ नुसार संस्थेची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानुसार मुंबई उपनगर जिल्ह्यातील ज्या संस्थांना दिव्यांग क्षेत्रात कार्य करायचे आहेत्यांनी संस्थेच्या नोंदणीचा प्रस्ताव संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारीमुंबई उपनगर कार्यालयाकडे सादर करावा.

नोंदणी न करता कार्यरत असलेल्या संस्थांवर दिव्यांग हक्क अधिनियमनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

0000

इराणमधील तणावपूर्ण स्थिती ; भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी

 इराणमधील तणावपूर्ण स्थिती ;

भारताने जारी केली ट्रॅव्हल ॲडव्हायजरी

 

नवी दिल्लीदि.६ इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या  संघर्षामुळे  परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सध्या इराणमध्ये असलेल्या आणि तिकडे प्रवासास जाण्याचा विचार करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी अधिकृत  प्रवास मार्गदर्शक सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायजरी) जारी केल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसारइराणमधील सद्यस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत इराणचा कोणताही बिगर-जरुरी प्रवास टाळावा. जे भारतीय नागरिक कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी सध्या इराणमध्ये वास्तव्य करत आहेतत्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः ज्या भागात हिंसक आंदोलने किंवा मोठी गर्दी जमली आहेअशा ठिकाणांपासून भारतीयांनी लांब राहावेअसे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

भारत सरकारने इराणमधील भारतीयांना स्थानिक बातम्या आणि घडामोडींवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. तसेचतेहरानमधील भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. जे भारतीय नागरिक निवासी व्हिसावर तिथे राहत आहेत आणि ज्यांनी अद्याप दूतावासाकडे आपली नोंदणी केलेली नाहीत्यांनी तातडीने आपली माहिती नोंदवावीजेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे सोपे होईल.

इराणमध्ये गेल्या आठवडाभरात सरकारविरोधी आंदोलन सुरु असूनआंदोलक आणि सुरक्षा दलांमधील चकमकी वाढल्या आहेत. या अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

भारत युवाओं का देश है। युवाओं में देश के विकास को नई

 भारत युवाओं का देश है। युवाओं में देश के विकास को नई गति देने की क्षमता हैऐसा विश्वास व्यक्त करते हुए राज्यपाल ने कहा कि भारत का विकास केवल आर्थिक या भौतिक प्रगति तक सीमित नहीं हैबल्कि संस्कृतिसभ्यतापरंपरा और नैतिक मूल्यों का संरक्षण भी उतना ही महत्वपूर्ण है। वसुधैव कुटुम्बकम्’ की भावना भारत की पहचान है और संत-महात्माओं के माध्यम से भारत ने मानवता का संदेश पूरे विश्व में पहुचाया है।

राष्ट्रीय युवा महोत्सव में सहभागिता राज्य के युवाओं के लिए गौरवपूर्ण और प्रेरणादायी

 राष्ट्रीय युवा महोत्सव में सहभागिता राज्य के युवाओं के लिए गौरवपूर्ण और प्रेरणादायी विषय हैऐसा उल्लेख करते हुए राज्यपाल आचार्य देवव्रत ने दिल्ली में आयोजित संवाद कार्यक्रम के लिए चयनित युवाओं को शुभकामनाएं दीं।

 

युवाओं से संवाद करते हुए राज्यपाल ने कहा कि यह उपक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की संकल्पना से संचालित किया जा रहा है। स्वामी विवेकानंद की जयंती के अवसर पर प्रतिवर्ष आयोजित होने वाले राष्ट्रीय युवा महोत्सव को नया स्वरूप दिया गया है, तथा देश के सभी राज्यों के विद्यार्थियों के लिए प्रतियोगी परीक्षाएं आयोजित की गईं। इनमें से चयनित तीन हजार मेधावी युवाओं को इस महोत्सव के माध्यम से सीधे प्रधानमंत्री से संवाद करने का अवसर मिलेगा। मेहनतपरिश्रम और गुणवत्ता के बल पर चयनित युवाओं की राज्यपाल ने सराहना की और कहा कि यह चयन विकसित राष्ट्र के निर्माण में उनकी भूमिका की स्वीकृति है।

Featured post

Lakshvedhi