Friday, 9 January 2026

संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळखकांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात

 संतपरंपरेमुळे भारताच्या संस्कृतीची जागतिक पातळीवर वेगळी ओळख

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा

 

मुंबईदि.4 — सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची  जगात ऐतिहासिक ओळख  निर्माण झाली असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रमसिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  माजी मंत्री कृपा शंकर सिंहमाजी खासदार गोपाळ शेट्टीआमदार अमित साटमआमदार अतुल भातखळकरआमदार प्रवीण दरेकरसंतमत अनुयायी आश्रम ट्रस्टचे सचिव राधेश्याम यादव यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीसंतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक व शैक्षणिक कार्याला दिशा मिळाली.संतमत परंपरेत मानवसेवासमताप्रेम व सद्भावना ही केवळ तत्त्वे नसून ती प्रत्यक्ष आचरणात आणण्याची जीवनपद्धती आहे. या मूल्यांच्या प्रसारासाठी श्री सद्गुरु  शरणानंदजी महाराज परमहंस यांच्या अनुयायांच्या माध्यमातून संतमत अनुयायी आश्रमद्वारे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य सुरू आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi