Saturday, 10 January 2026

दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

 दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

-         सचिव तुकाराम मुंढे

·         बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई

 

            मुंबईदि. ०५ : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडीहे शासकीयनिमशासकीय नोकरीतील आरक्षणविविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्रअलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 

चुकीचे किंवा बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गुन्हा असूनअशा प्रकरणांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम२०१६ मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्स, कच्चे पदार्थ आणि

 विविध फ्लेवर्सचे तयार हुक्का प्रॉडक्ट्सकच्चे पदार्थ आणि फ्लेवर्सचा ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपयांचा साठा जप्त करून कंपनी सील करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३(५)१२३२२३२७४२७५ आणि अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ च्या विविध कलमांनुसार (कलम ३०२६२७५९) नुसार आरोपींविरुद्ध अनिल कुमार चौहानअसिफ फाजलानीफैजल फाजलानीमे. सोएक्स इंडिया प्रा. ली. विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या 'अफजलब्रँडच्या हुक्का नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटिनचे प्रमाण आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.

शासनाने मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या सुगंधी तंबाखू आणि हुक्क्यावर बंदी घातली असल्याने ठाणे जिल्ह्यातील भिवंडीतील दापोडे परिसरातून १९ कोटी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये किमतीचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त करण्यात आला आहे. यात मे. हायस्ट्रीट इम्पेक्स एलएलपीया गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने ३० डिसेंबर २०२५ रोजी छापा टाकत त्याचा मोठा साठा जप्त केला होता.

"राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल"असा इशारा अन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

पोर्टल, कृषी सल्ल्यासाठी 'महाविस्तार ॲप' आणि

 शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरणही येथे करण्यात आले आहे. यामध्ये महाडीबीटी पोर्टलकृषी सल्ल्यासाठी 'महाविस्तार ॲपआणि राज्यामध्ये एकूण ३८ पिकांना मिळालेले जीआय मानांकन याविषयीची माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच संक्रांत सणानिमित्त वापरण्यात येणारे बोरऊसहरभरा आणि लहान मुलांच्या 'बोरनहान'साठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन रांगोळीच्या माध्यमातून आकर्षकरित्या मांडले आहे.

शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा

 राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले कीशहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभावमानवतासंविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. व कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून  नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी, असेही रामेश्वर नाईक म्हणाले.

15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत

 जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  म्हणाले कीमहाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या "हिंद दी चादर" कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापना करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळामहाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगरनिवासपाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.

संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व

 जथ्येदार साहेब भाई कुलवंत सिंग जीसंत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेअसे आवाहन त्यांनी केले

नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रम ऐतिहासिक करावा पत्रकार परिषदेत आवाहन

 नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रम ऐतिहासिक करावा

पत्रकार परिषदेत आवाहन

 

नांदेडदि. 9 :-  हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त  नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावाअसे आवाहन पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

 

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेतख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजीभाई राम सिंगजीभाई कश्मीर सिंगजीभाई गुरमीत सिंगजीसंत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजीसमिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंगसरजीत सिंग गिलराज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईकमहेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराजमहंत जितेंद्र महाराजराष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi