भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असून, जगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 8 January 2026
‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे २१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन
‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे
२१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन
मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम) २०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम, येथे करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय परिषद भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (आयआयआयडीईएम) मार्फत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाणार आहे.
भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असून, जगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्य शासन २६ हजार ६८१ कोटी
ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी राज्य शासन २६ हजार ६८१ कोटी रुपये खर्च करत आहे. तसेच, एशियातील सर्वात मोठा १६,००० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहे. यामुळे २०३० पर्यंत महाराष्ट्राची ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांवर आधारित असेल. पीएम कुसुम योजनेत देशात स्थापित झालेल्या ११.९० लाख सौर पंपांपैकी ७ लाख ३८ हजार पंप एकट्या महाराष्ट्रात आहेत आणि एका महिन्यात ४५ हजार ९११ पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
ग्रीड स्टॅबिलाईज करण्यासाठी आवश्यक असलेल्या पंप स्टोरेजच्या निर्मितीसाठी महाराष्ट्रात ७६,००० मेगावॅटचे करार झाले आहेत. पुढील सहा महिन्यांत १ लाख मेगावॅट क्षमता निर्मितीचे लक्ष्य आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पामध्ये 7.5 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन च्या कामाची सुरुवात झाली आहे. या वर्षीसाठी 351 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत
शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी १५ हजार ७ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. रब्बी हंगामासाठी जाहीर केलेली १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाली आहे. कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरासरी उत्पादकता १२७७ किलो प्रति हेक्टरवरून २,३६८ किलो प्रति हेक्टर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून, कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यालाच व्हावा, बँकांना नव्हे, यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर १ जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना व धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मिहानमध्ये आयटी क्षेत्रातील ‘बिग सिक्स’ पैकी सहाही कंपन्या कार्यरत
रोजगार निर्मिती
रोजगार निर्मितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मिहानमध्ये आयटी क्षेत्रातील ‘बिग सिक्स’ पैकी सहाही कंपन्या कार्यरत असून, १ लाख २७ हजार २२५ लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. ‘महाभरती’ उपक्रम सुरू करून तीन वर्षांमध्ये १ लाख २० हजार शासकीय नोकऱ्या दिल्या असून, पुढील दोन वर्षांत तेवढ्याच नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर 'नवीन नागपूर' (आयबीएफसी) ची निर्मिती5 लाखांपेक्षा जास्त रोजगार
बीकेसीच्या धर्तीवर नवीन नागपूरची निर्मिती केली जाणार
नागपूरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर 'नवीन नागपूर' (आयबीएफसी) ची निर्मिती केली जाईल, जिथे 5 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून सुमारे 40 हजार रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आ
हे.
