शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी १५ हजार ७ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. रब्बी हंगामासाठी जाहीर केलेली १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाली आहे. कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरासरी उत्पादकता १२७७ किलो प्रति हेक्टरवरून २,३६८ किलो प्रति हेक्टर करण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून, कर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यालाच व्हावा, बँकांना नव्हे, यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर १ जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना व धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment