‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे
२१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन
मुंबई, दि. ८ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम) २०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपम, येथे करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय परिषद भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (आयआयआयडीईएम) मार्फत, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाणार आहे.
भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असून, जगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी, भारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.
No comments:
Post a Comment