Thursday, 8 January 2026

शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत

 शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीशेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजपैकी १५ हजार ७ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. रब्बी हंगामासाठी जाहीर केलेली १० हजार रुपयांची अतिरिक्त मदत ९१ लाख शेतकऱ्यांना मिळाली आहे. कापूस खरेदीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरासरी उत्पादकता १२७७ किलो प्रति हेक्टरवरून २,३६८ किलो प्रति हेक्टर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला असूनकर्जमाफीचा फायदा थेट शेतकऱ्यालाच व्हावाबँकांना नव्हेयासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर १ जुलैपर्यंत कर्जमाफीची योजना व धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जेष्ठ नागरिकांनी साठी

 


मिहानमध्ये आयटी क्षेत्रातील ‘बिग सिक्स’ पैकी सहाही कंपन्या कार्यरत

 रोजगार निर्मिती

रोजगार निर्मितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले कीमिहानमध्ये आयटी क्षेत्रातील बिग सिक्स’ पैकी सहाही कंपन्या कार्यरत असून१ लाख २७ हजार २२५ लोकांना अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे. महाभरती’ उपक्रम सुरू करून तीन वर्षांमध्ये १ लाख २० हजार शासकीय नोकऱ्या दिल्या असूनपुढील दोन वर्षांत तेवढ्याच नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर 'नवीन नागपूर' (आयबीएफसी) ची निर्मिती5 लाखांपेक्षा जास्त रोजगार

 बीकेसीच्या धर्तीवर नवीन नागपूरची निर्मिती केली जाणार


नागपूरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर 'नवीन नागपूर' (आयबीएफसी) ची निर्मिती केली जाईल, जिथे 5 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


मराठवाड्यात सुमारे 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून सुमारे 40 हजार रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, कोल्हापूर या भागातही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आ

हे.


सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये

 गडचिरोली जिल्हा ठरणार गुंतवणुकीचा नवीन मॅग्नेट

गडचिरोली जिल्हा हा एक गुंतवणुकीचा नवीन मॅग्नेट तयार झालेला आहे. सर्वाधिक गुंतवणूक आता गडचिरोलीमध्ये येत आहे. अवकाश आणि संरक्षण साहित्य निर्मिती क्षेत्रामध्ये विदर्भामध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. त्यातून दहा ते पंधरा हजार रोजगार होणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्मितीसेमीकंडक्टरसोलर पॅनल आणि मॉड्यूल याच्यामध्ये 1,55,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आलेली आहे. त्यातून 65 हजार प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. कोल गॅसिफिकेशनची सर्वात मोठी गुंतवणूक विदर्भात आली असून सोलरमध्येही विदर्भ प्रथम क्रमांकावर राहणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, स्टील आणि कोल गॅसिफिकेशनमध्ये मोठी गुंतवणूक

 विदर्भ व मराठवाड्यात गुंतवणुकीचा ओघ

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीविदर्भात इलेक्ट्रॉनिक्ससंरक्षणस्टील आणि कोल गॅसिफिकेशनमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मराठवाडा ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत आहेज्यात टोयोटास्कोडाएथर यांसारख्या मोठ्या ब्रँड्सची गुंतवणूक झाली आहे. मिहानमध्ये 31 कंपन्या कार्यरत असून नवीन 22 कंपन्या सुरू होत आहे. यातून 1 लाख 27 हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. अमरावती विमानतळावर एशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था सुरू होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.       

गडचिरोली जिल्हा

राज्याची आर्थिक स्थिती मजबूतराज्यांचा विचार केल्यास आजही सर्व निकषांवर

 राज्य शासनाच्या योजना पुढील पाच वर्षेही चालणार

राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘लाडकी बहीण’ योजनाशेतकऱ्यांसाठी मोफत वीज यांसह सर्व योजना सुरू असून त्या पुढील पाच वर्षेही सुरू राहतीलअसे ठामपणे त्यांनी सांगितले.

राज्याची आर्थिक स्थिती मजबूत

राज्याची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीदेशातील मोठ्या राज्यांचा विचार केल्यास आजही सर्व निकषांवर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पात्र ठरते. राज्याच्या विकासासाठी कर्ज उभारणे आवश्यक असते आणि राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज उभारण्याची परवानगी असतानाकेवळ १८.८७ टक्के कर्ज घेतले आहे. राजकोषीय तूटही (Fiscal Deficit) तीन टक्क्यांच्या आत राखण्यात यश आले असूनलाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांना मदत देऊनही हे शक्य झाले. कॅगने घालून दिलेल्या तिन्ही आर्थिक अटी पूर्ण केल्या असूनकेंद्र सरकारने घालून दिलेल्या निकषांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक महाराष्ट्राने केली आहे.

Featured post

Lakshvedhi