Thursday, 8 January 2026

‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद

 ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रमात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा युवकांशी संवाद

भारतीय संस्कृतीचा वारसा जपत युवकांनी

भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे

-राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबईदि. ७ : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची व मोलाची आहे. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी युवकांनी विचारकृती आणि नव कल्पनांच्य माध्यमातून पुढे येऊन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२५-२६ राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून निवड झालेल्या युवकांशी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे,
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेराज्यपालांचे सह सचिव एस. राममूर्तीक्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरेसहाय्यक संचालक मिलिंद दीक्षितमुंबई विभागाच्या क्रीडा उपसंचालक सुवर्णा बारटक्के व
 राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.

राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग हा राज्यातील युवकांसाठी गौरवाची व प्रेरणादायी बाब असल्याचे गौरवोद्गार काढून दिल्ली येथील संवाद कार्यक्रमासाठी निवड झालेल्या युवकांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या.

२०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन

 २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विजव्दितीय टप्पा निबंध लेखन स्पर्धातृतीय टप्पा –विकसीत भारत पीपीटी चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राज्यामधून ४५ युवांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाविभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक विभागातून २८ कलाकारांची आणि डिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आली आहे. राज्यातून निवड झालेल्या युवक व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी  वर्गासह ८५ जणांचा चमू दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज मुंबई येथून रवाना झाला.

०००००

देश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती

 राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणालेदेश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून

स्टार्टअप्सआत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असूनतिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भरसमृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रमचिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.

या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन

 राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा’चे आयोजन

मुंबईदि. ०७ : १२ जानेवारी च्या राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५ -२६ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संविधानातील मूल्येमूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्वरूपात १५ दिवसांचे प्रशिक्षण राबविण्यात येणार असूनया प्रशिक्षणात संविधानासंबंधी सखोल माहिती व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी १० जानेवारी २०२६ पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.

 

हा राज्यस्तरीय उपक्रम महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग यांच्या वतीने राबविण्यात येत असूनभारतीय संविधानातील मूल्येमूलभूत अधिकार व कर्तव्यांची जाणीव युवकांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. युवकांनी संविधान समजून घेऊन जबाबदारसजग आणि लोकशाही मूल्यांवर आधारित नागरिक म्हणून घडावेयासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. "घर घर संविधान" या संकल्पनेतून ही जनजागृती चळवळ राज्यातील प्रत्येक घरापर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

 

ही प्रश्नमंजुषा राज्यातील इयत्ता ८ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली असूनसंपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ होईल.

 

प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीनागपूर येथील तज्ज्ञ प्राध्यापक मार्गदर्शन करणार असून आवश्यक अध्ययन साहित्य ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही स्पर्धा मराठीहिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने (प्रॉक्टरिंगसह) परीक्षा घेण्यात येईल. सहभागासाठी केवळ ९९ रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.

 

या स्पर्धेमध्ये यशस्वी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पारितोषिकांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पुरस्कार १ लाख रुपयेद्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये, तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये यासोबतच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिकांसह प्रमाणपत्रे देण्यात येणार असूनसहभागी सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या वतीने सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

 

हा उपक्रम आदिवासी विकास विभागअल्पसंख्यांक विकास विभागइतर मागास बहुजन कल्याण विभागउच्च व तंत्र शिक्षण विभागमहाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीनागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी)पुणे तसेच युवा करिअर क्लब यांच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येत आहे.

 

या उपक्रमाची संपूर्ण माहितीनोंदणी प्रक्रिया व अधिकृत सूचना www.yuvacareer.com या संकेतस्थळावर उपलब्ध असूननागरिकांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बनावट संकेतस्थळाला बळी न पडता केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच नोंदणी करावी असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त भाविकांसाठी सेवा सुविधा

 जिल्हाधिकारी राहूल कर्डिले म्हणाले कीमुख्य कार्यक्रम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर होणार असून मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छतेच्या कामासह मुख्य पेंडाल उभारणीसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण झालेली आहेत. विद्युत व पाणीपुरवठ्याची व्यवस्था लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.  भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळामहाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगरनिवास व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी 72 रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहोत. स्वच्छतेसाठी सध्या 100 शौचालयांची व्यवस्था उपलब्ध आहे. यासाठी इतर जिल्ह्यांचेही सहकार्य घेतले जाणार आहे. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून 15 जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत. तसेच होर्डिंग्सद्वारे मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थापार्किंग व सुरक्षा पासेस याबाबतच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली.

युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धाhttps://gurutegbahadurshahidi.com या

 युवकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच भाविकांच्या सोयीसाठी https://gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर रस्तेरेल्वेबसवाहतूक व्यवस्था तसेच कार्यक्रमासंदर्भातील सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समितीच्या समन्वयाने सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी पार पाडावीअसे आवाहनही त्यांनी केले.

मराठवाडविभागातील सर्व जिल्हेमहानगरपालिकाशाळा-महाविद्यालयेपोलीस यंत्रणा व परिवहन विभागाने समन्वयाने काम करत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोर कार्यवाही करावी.

 

श्री गुरु तेग बहादुर यांनी राष्ट्र व संस्कृतीच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान सर्वसामान्य जनतेपर्यंतविशेषतः गावपातळीवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वोत्तम संस्था आणि विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे

मेजवानीने जागतिक स्तरावरील शेफ भारावून गेले. तसेच, विदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी

 विदेशी पाहुण्यांनी महाराष्ट्राच्या श्रीखंडपुरणपोळीझुणका-भाकरी आणि कढी-मसालाभात यांसारख्या पारंपरिक मराठी व्यंजनांचा आस्वाद घेतला. या मेजवानीने जागतिक स्तरावरील शेफ भारावून गेले. तसेचविदेशी पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी हिंदी गाण्यांचा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होताज्यामध्ये भारतीय संगीताच्या तालावर हे सर्व मान्यवर मनसोक्त थिरकले.

Featured post

Lakshvedhi